बीड (प्रतिनिधी )दिं.२५ मे रोजी माझी भाची चिं.सौ.का.निशीगंधा हिच्या विवाह प्रंसगी कुठल्याही प्रकारचा हार तुरे फेटे आदिंचा सत्कार सोहळ्यावर खर्च न करता तो निधी एच आय.व्ही ग्रस्त मुलांचं संगोपन करणारे बारगजे दाम्पत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करुन देण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात मी माझी पुतणी अंकीता हिच्या दिं.१८ डिंसेबर २०१९ रोजी झालेल्या विवाह सोहळ्यालत करून इन्फंट या सामाजिक संस्थेला मदत केली होती. त्या नंतर यावर्षी माझा पुतण्या चिं. धिरज यांच्या दिं. १० मे २०२२ रोजी पार पडलेल्या विवाह सोहळ्यात अशाच प्रकारे सत्कार सोहळ्याच्या खर्चाला फाटा देत ढेकनमोह येथील दराडे सरांच्या अनाथ मुलं सांभाळणार्या सांप्रदाय प्रकल्पाला व कर्ण तांबे यांच्या राक्षस भुवन थांबा या.शिरुर येथील वृद्धाश्रमाला निधी दिला. विवाह सोहळ्याला आ. विनायकराव मेटे माजी मंत्री शिवाजीराव पंडीत दादा माजी मंत्री सुरेशराव नवले माजी आ.राजेंद्र जगताप माजी आ. सुनीता धांडे माजी आ.जनार्धन तुपे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षिरसागर शिवसेना जिल्हाप्रमुख अनील जगताप भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष नारायण काशीद तालुका दुध संघाचे चेअरमन विलास बापु बडगे मार्केट कमिटी चे सभापती दिनकरराव कदम सहकार खात्याच्या आयुक्त ज्योतीताई मेटे सह विवीध पक्ष संघटनेचे पदाधिकारी व समाजातील क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या सर्व मान्यवरांचे स्वागत शब्द सुमनाने केले.
सर्वांचे मनःपूर्वक आभार...!
No comments:
Post a Comment