Sunday, November 28, 2021

एस.टी.कर्मचारी आंदोलन दोन आंदोलनकर्त्या एस टी कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली.


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्यानंतर अनेक कर्मचारी आज कामावर रुजू झाले आहेत. लाल परी पुन्हा एकदा रस्त्याने धावताना दिसून आली. असं असलं तरी अनेक कर्मचारी अजूनही शासनात विलीनीकरण करा या मागणीवर ठाम आहेत. कामावर रुजू व्हावे यासाठी कर्मचाऱ्यावर दबावतंत्राचा वापर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. या दबावतंत्राचा वापर केल्यामुळे बस चालक बबन चव्हाण वय 55 वर्षे यांचा रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापूर्वी अर्धा तास आधी शितल त्र्यंबक कांबळे( वय 35 वर्ष) नामक महिला वाहकाची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांचाही अचानक रक्तदाब वाढला गेला. त्यामुळे त्यांना चक्कर आली. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे शासन आणखी किती कर्मचाऱ्यांचे बळी घेणार आहे असा प्रश्न विचारला जाऊ लागला असून दबावतंत्राचा वापर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करू नये अशी मागणी होऊ लागली आहे.

नगर पंचायत निवडणुकीसाठी शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांचा तीन तालुक्यात दौरा.


* पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे-जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव.

नगरपंचायत निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत त्यानुसार जिल्ह्यातील पाच नगरपंचायत निवडणुका होणार आहेत यापैकी शिरुर केज आणि वडवणी या तीन तालुक्यात शिवसेना नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे दिनांक 29 नोव्हेंबर सोमवार रोजी झंझावाती दौरा करणार असून शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात व्यापक बैठका आणि चर्चा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहेत वरील निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या माध्यमातून स्वबळावर निवडणूक लढवण्या संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी विचारविनिमय होणार आहे सोमवारी सकाळी 11 वाजता शिरूर सायंकाळी 5 वाजता केज आणि रात्री 8 वाजता वडवणी असा दौरा आयोजित करण्यात आला असून सर्व तालुका व जिल्हा पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, शिरूर तालुकाप्रमुख किरण चव्हाण,केज तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे,वडवणी तालुकाप्रमुख संदीप माने यांनी केले आहे

आजचे राशीभविष्य काय आहे, जाणून घ्या.कसा असेल आजचा दिवस.


मेष:-

आनंदी भावना वाढीस लागेल. धार्मिक कार्यात सहकार्य कराल. व्यवसायात नवीन बादल होतील. त्याचा नंतर फायदा मिळेल. आरोग्य बाबत जागरूक रहा.


वृषभ:-

कामात क्षुल्लक अडचणी येतील.नोकरवर्गा कडे लक्ष ठेवा. कौटुंबिक बाबतीत चालढकल करू नका. शेजारी सहकार्य करतील. सकारात्मक विचार करा.


मिथुन:-

जुनी कामे पूर्ण होतील. नवी गुंतवणूक कराल. कौटुंबिक दुरावा वाढू शकतो. वाहन विषयक अडचणी येऊ शकतात. घाई घाईने निर्णय घेऊ नका.


कर्क:-

अध्यात्माविषयी ओढ वाढेल. भौतिक सुखसोयी वाढतील. विवेक बुद्धीने कामे करा. इतरांच्या उणिवा काढू नका. अभिमान वाढू शकतो.


सिंह:-

मौल्यवान गोष्टी पासून लाभ होईल. गरीबांना मदत कराल. लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. कार्य क्षमतेत वाढा होईल. अध्यात्मात रस घ्याल.


कन्या:-

तुमचा प्रभाव वाढेल. दिवस मनाप्रमाणे घालवाल. अनावश्यक खर्चा सामोरे येतील. मनाला येईल तसे वागाल.. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

तूळ:-

मेहनतीमुळे तब्येत नरम राहील. चार चौघात संयमाने वागाल.. कुटुंबाकडून चांगली बातमी मिळेल. तुमच्या जबाबदारीत वाढ होईल. लोक तुमचे कौतुक करतील.


वृश्चिक:-

आजचा दिवस संमिश्र आहे. पोटाच्या तक्रारी जाणवतील. अनावश्यक खर्च होतील. त्यामुळे मन खट्टू होईल. मंगल कार्यालयात सहभाग घ्याल.


धनू:-

सामाजिक उपक्रमात वेळ घालवाल. भौतिक गोष्टीत फार अडकू नका. मन जवळच्या माणसापाशी मोकळे करा. आरोग्याकडे लक्ष ठेवा. रखडलेले पैसे मिळतील.


मकर:-

स्वत:चे निर्णय क्षमता वापरा. सामाजिक वादात अडकू नका. खर्च फायदेशीर ठरेल. परोपकाराची भावना जोपासाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.


कुंभा:-

नवीन संकल्प कराल. आध्यात्मिक आवड जोपासाल. घरात तुमच्या आमचे कौतुक होईल. कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. आवडते छंद जोपासाल.


मीन:-

नसत्या चिंता करू नका. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. बढतीसाठी प्रयत्न करा. बोलण्यातून प्रभाव पाडाल. नातेवाईकांची गाठ पडेल

नविन कोरोना व्हयरस व्हेरिएंटमुळे राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता.


मुंबई (प्रतिनिधी ) दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना व्हायरसच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे एकच खळबळ माजली आहे.

जगातले सर्वच देश सतर्क झालेत. कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग वाढू नये यासाठी कडक पावलं उचलण्यात येत आहेत. महाराष्ट्रातही सरकारनं नवीन नियमावली जारी केली आहे. राज्यातलं सरकारही सतर्क झालं आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतून सुरु असणाऱ्या विमान सेवेवर बंद घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यामुळे आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातल्या कोरोना परिस्थितीवर तसंच नव्या व्हेरिएंटमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतील. या बैठकीस राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित असतील.

Saturday, November 27, 2021

वैजनाथ मंदिर धमकी प्रकरणी दोन आरोपींना अखेर अटक.


परळी वैजनाथ ;- वैद्यनाथ मंदिर  विश्वस्त कमीटीस आलेल्या ५० लाख खंडणी  धमकीच्या प्रकारचा पोलिसांनी कसून तपास केला. शनिवारी बीड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली. श्वानपथकही बोलावण्यात आले होते. पत्रात उल्लेख असलेल्या नावाबाबत पोलिसांनी नांदेड येथे जाऊन दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. एक व्यक्ती विमा प्रतिनिधी असून एकजण बांधकाम व्यावसायिक आहे. दहशतवाद विरोधी पथकाने त्या आरोपींची चौकशी केली असता आमच्यासोबत खोडसाळपणा केला गेला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुढील दोन दिवसांत आमची कोर्टाची तारीख असून, त्यांच्याशी वाद चालू आहे त्याच व्यक्तींनी आमच्या नावाचा वापर करून पत्र लिहिले असल्याचा आरोपही ताब्यात घेतलेल्या दोघांनी केला आहे. ताब्यात घेतलेल्या लोकांकडून अधिकची माहिती घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

संविधानामुळेच महिला प्रत्येक क्षेत्रात आपले आस्तित्व निर्माण करू शकल्या.स्वातंत्र्य,हक्क आबाधित ठेवु शकल्या. - सौ.वर्षा मगर

 

परळी वैजनाथ ;- येथील कांतीकारी साथी,आईसाहेब जिजाबाई  सेवा संस्था,व जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या वतिने संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .भारत सरकारने 2015 पासून सर्व सामान्य लोकांना संविधानाचे महत्व समजण्याच्या हेतूने संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ असून त्याच्या माध्यमातून सर्व भारतीय जनतेस अमूल्य असे अधिकार प्रदान केले असून या दिवसाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीत केलेल्या योगदानाची आठवण करण्यासाठी स्मरण करण्यासाठी कांतीकारी साथी, आईसाहेब जिजाबाई सेवा संस्था,व जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या वतीने दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन आभिवादन करण्यात आले . व संविधान प्रास्तविकेचे वाचन करण्यात आले.यावेळी कांतीकारी साथीच्या मुख्यसंपादक. आईसाहेब जिजाबाई सेवा संस्थेच्या अध्यक्षा जय महाराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षा सौ.वर्षा मगर महिलाना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.यावेळी झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व सभासद संघटनेच्या सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

राज्यपाल, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन.


मुंबई, दि. 27 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून 13 वर्षापूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, जवान तसेच एनएसजी कमांडोजना आपली श्रद्धांजली वाहिली.

भावपूर्ण वातावरणात झालेल्या कार्यक्रमात पोलीस बँड तुकडीने ‘सलामी शस्त्र’ वाजविले. यावेळी सर्व मान्यवरांनी तसेच गणवेशातील अधिकारी व पोलीस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली. त्यानंतर राज्यपालांनी तेथे उपस्थित हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली.

कार्यक्रमाचे आयोजन मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले होते. यावेळी पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, पोलीस महासंचालक संजय पाण्डे व मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी देखील हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सेवा निवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित होते.


राज्यातील २७ हजार १३८ सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर.


प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोनामुळे गेले सुमारे दीड वर्षांपासून सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. शासनाने या निवडणुकांवरील स्थगिती उठवून या निवडणुका १ सप्टेंबरपासून घेण्याबाबत शासन निर्णय जारी केला. त्यानुसार प्राधिकरणाने ३१ डिसेंबर २०२० अखेर निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील एकूण एकूण ४५ हजार ४०९ सहकारी संस्थांचा ६ टप्प्यांचा समावेश असलेला ‘जिल्हा निवडणूक आराखडा’ तयार केलेला आहे. प्राधिकरणाने सप्टेंबरपासून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील अनुक्रमे ४ हजार ३६२ व १२ हजार ७२९ अशा एकूण १७ हजार ९१ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत.
* तिसऱ्या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांची निवडणूक

आता तिसऱ्या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन केलेले असून त्यामध्ये १८ हजार ३१० कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांचा, तर उर्वरित ८ हजार ८२८ सहकारी संस्थांमध्ये साखर कारखाने, इतर पतसंस्था, नागरी सहकारी बँका, सहकारी सूतगिरण्या, सहकारी दूग्ध संस्था आदींचा समावेश आहे.

*१६ बँकाच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्या

प्राधिकरणाने राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी १६ बँकाच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. तर शासनाने नाशिक, नागपूर, सोलापूर, बुलढाणा आणि उस्मानाबाद अशा पाच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर असेल त्या टप्प्यावर पुढे ढकललेल्या आहेत. रायगड तसेच जालना या दोन २०२२ या वर्षात निवडणुकीस पात्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाने अद्याप सुरू केलेल्या नाहीत.

*४ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीची बाब न्यायप्रविष्ठ

गोंदीया, भंडारा, चंद्रपूर या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीची बाब मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. तर वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसंदर्भात उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश पारीत केलेले आहेत. याशिवाय पुणे, मुंबई, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या ४ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीची बाब न्यायप्रविष्ठ असून लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुका तातडीने घ्याव्यात असे आदेश
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकींच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल होत्या. या अनुषंगाने न्यायालयाने कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्यापूर्वी राज्यातील निवडणुकीस पात्र सर्व कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणुका तातडीने घ्याव्यात असे आदेश १८ नोव्हेंबर २०२१ रोजी दिले. त्यानुसार आता प्राधिकरणाने निवडणुकीस पात्र २६६ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची सुरु केलेली निवडणूक प्रक्रिया रद्द केली असून तिसऱ्या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांची निवडणूक प्रकिया घोषित केली आहे.

* अधिकारी, कर्मचाऱ्यांचीदेखील नियुक्ती करण्याच्या सूचना

या संस्थांच्या निवडणूका घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक असल्यामुळे शासनाच्या इतर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचीदेखील नियुक्ती करण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या आहेत. या संस्थांच्या निवडणूका मुदतीत पार पाडण्याच्यादृष्टीने निवडणूकीस पात्र संस्थांनी प्रारुप मतदार यादी व आवश्यक निवडणूक निधी संबंधीत जिल्हा, तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. ही सर्व निवडणूक प्रक्रिया ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार राज्यातील सहकारी संस्थांच्या आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकांचे संचलन, अधीक्षण व निर्देशन करण्याची जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर सोपवलेली आहे. यामध्ये २५० व त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्था वगळण्यात आलेल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून संविधान दिन साजरा.




नाशिक :- (प्रतिनिधी) सामाजिक विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था येवला इकरा अरबी मदरसा स्कुल येवला यांच्या वतीने येवले शहरातील विंचूर चौफुली येथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात भारतीय संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अर्जुन कोकाटे, प्राचार्य बी व्ही गमे, विकी भैया बिवाल, विशाल सोनार,महेंद्र पगारे,जनसेवक डॉ.शेरुभाई सादिकभाई मोमीन, अजहर शाह ,अश्विनी जगदाळे शबिस्ता पिंजारी, नुसरत शेख, असद अन्सारी आदी उपस्थित होते प्राचार्य अर्जुन कोकाटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले मदरशांमध्ये भारतीय संविधान दिन साजरा होतोय आणि विद्यार्थी त्याला उत्तम असा प्रतिसाद देत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे असे मनोगत प्राचार्य अर्जुन कोकाटे यांनी व्यक्त केले. समाजसेवक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष विकी भैया बिवाल विशाल सोनार. शेरूभाई मोमीन यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मिठाई व अल्पोहार चे वाटप केले व मदरसा शाळेचे त्यांनी कौतुक केले. इकरा शाह, सारा शेख, रूमेजा मोमीन, या विद्यार्थिनींनी संविधान उद्देशिकेचे यावेळी वाचन केले व कार्यक्रमाची सांगता केली प्रास्ताविक शेरूभाई मोमीन यांनी केले व आभार अझहर शाह यांनी मानले यावेळी विविध मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.

वैद्यनाथ मंदिर आर डी एक्स ने उडवू'.विश्वस्तांना आलेल्या पत्राने खळबळ.



परळी वैजनाथ  (प्रतिनिधी):
आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे.मला तातडीची गरज भागविण्यासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन अशी धमकी असलेल्या कथित ड्रग्स माफियाच्या धमकीच्या पत्राने २६ नोव्हेंबर रोजी एकच खळबळ उडाली. संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर परळी येथे आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी राज्य व पर राज्यातून भाविक येतात. मार्च २०२० पासून हे मंदिर कोविडमुळे बंद ठेवण्यात आले होते. महिनाभरापूर्वी मंदिरे उघडण्याचा निर्णय झाल्याने हे मंदिर भाविकांसाठी खुले झाले.
सध्या मंदिरात भाविकांची गर्दी आहे. शुक्रवारी वैद्यनाथ मंदिर सचिव राजेश देशमुख हे मंदिरात आले असताना टपालाद्वारे आलेली पत्रे ते पाहत होते. यातील एक पत्र व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) या नावाने आले होते. ते त्यांनी वाचून पाहिले अन् त्यांना धक्काच बसला. रतनसिंग रामसिंग दख्खने, रा.काळेश्वर नगर, विष्णूपुरी, नांदेड या पत्त्यावरुन हे पत्र आले आहे.

महिलांचे स्वातंत्र्य, हक्क ,आबाधित फक्त संविधानामुळेच -- प्रा. बालाजी जगतकर


* संविधान के सन्मान में एकल महिला संघटना मैदान में...

बीड प्रतिनिधी/भारत सरकारने 2015 पासून सर्व सामान्य लोकांना संविधानाचे महत्व समजण्याच्या हेतूने संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ असून त्याच्या माध्यमातून सर्व भारतीय जनतेस अमूल्य असे अधिकार प्रदान केले असून या दिवसाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीत केलेल्या योगदानाची आठवण करण्यासाठी एकल महिला संघटनेच्या वतीने दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुण सुरूवात, कोर्ट,तहशिल,पंचायत समिती, नगर रोड मार्गे स.मा.गर्गे   वाचनालया पर्यंत महिलांची रॅली काढण्यात आली, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन  बीड अक्षरधामचे संपादक प्रा.बालाजी जगतकर, भागवत वैध यांचे  संविधानावर मार्गदर्शन करणार आहेत  स.मा.गर्गे वाचनालय सभागृहात मान्यवारांची विचार व्यक्त करून  समारोप करण्यात आला, या रॅलीत बीड शहरातील बहुसंख्य सामाजिक संस्था, संघटना, युवक, महिला व विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते एकल महिला संघटनेच्या वतीने रुक्मिणी नागापुरे, मंगल कानडे, सरस्वती कळसकर, शिल्पा पंडित, संगिता मेटे, शोभा वाघराळ, भाग्यश्री तिडके, मीरा करांडे, मनीषा पवार, संगिता जाधव, रेश्मा सावंत, आस्विनी इतापे, अनिता राऊत, आस्विनी वीर, अलका हटवटे, आकुसा सापते, उल्फा लोखंडे,सपना ताई, गोदावरी घोलप, सपना आहिरे, कौशल्या कळसुले, कुशिवरता घोलप, असमा सय्यद, शेख अशाबी यांनी सविधान रॅलीत सहभागी घेतला.

जाणुन घ्या आजचे राशिभविष्य ! कसा असेल तुमचा दिवस.



मेष- आज पूर्ण दिवस आपणास शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने कमी यश मिळेल त्यामुळे हताश होण्याची वेळ येईल.

वृषभ – श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास आणि मनोबल यांसह पूर्ण कराल आणि त्यात सफलताही मिळवाल.वडिलांच्या घराण्याकडून तुम्हाला काही लाभ होईल.

मिथुन – नवीन योजना सुरु करायला आज उत्तम दिवस आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची कृपादृष्टी मिळण्याचे योग आहेत.

कर्क – आज आपण शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. म्हणून मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. कोणाबरोबर गैरसमजातून मतभेद होतील.

सिंह – भरपूर आत्मविश्वास आणि दृढ निर्णयशक्ती याच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्मय घेऊन पूर्ण कराल. समाजात मानप्रतिष्ठा वाढेल. वडील तसेच भावनाप्रधान लोकांचा सहयोग प्राप्त होईल.

कन्या – शारीरिक अस्वस्थते बरोबर मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यांबरोबर मतभेद होतील.

तूळ- आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक व मानसिक दृष्ट्या तुम्ही आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांच्या भेटी, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल.

वृश्चिक – आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान- सन्मान उचांवेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल.

धनु – शरीरात थकवा, उबग आणि बेचैनी राहील. स्वास्थ्य साधारण असेल. मन चिंतित असेल. प्रवास करू नका अशा श्रीगणेशांचा सल्ला आहे. संततीविषयी चिंता निर्माण होईल.

मकर – खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केले तर तब्येत खराब होईल असे श्रीगणेश सांगतात. आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल.

कुंभ- भरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल यासह प्रणय आणि रोमांस आजचा आपला दिवस रंगवून टाळतील. भिन्नलिंगी व्यक्तीसोबत परिचय वाढेल व मित्रता बनेल.

मीन- घरातील वातावरण सुख शांतीचे असल्यामुळे दैनंदीन कामे तुम्ही आत्मविश्वासपूर्वक चांगल्या प्रकारे कराल असे श्रीगणेश सांगतात. आज आपल्याला संताप आणि बोलणे यावर संयम ठेवावा लागेल

Friday, November 26, 2021

शिरूर कासार तालुक्यातील सिंदफणा नदीपात्रातील अवैध वाळुउपसा उपविभागीय आधिकारी आणि तहसिलदाराच्या आशिर्वादाने सुरूच, वाळुसाठ्यावर कारवाईसाठी प्रधान सचिव महसुल व विभागीय आयुक्तांना तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर



बीड जिल्ह्यात वाळु माफिंयावर छापेमारी आणि वाळु वाहतूक करणा-या गाड्या जप्त होत असतानाच शिरूर कासार तालुक्यातील उपविभागीय आधिकारी नामदेव टीळेकर आणि तहसिलदार श्रीराम बेंडे यांच्या आशिर्वादाने मौजे निमगांव (मा)व मौजे. नांदेवली भागातील वाळुतस्करांनी उपविभागीय आधिकारी व तहसिलदार यांच्याशी संगनमताने सध्या सिंदफना नदीपात्रातील अवैध वाळुउपसा सुरूच असून आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सुद्धा त्याठीकाणी १५०-२०० ब्रास वाळुसाठा पडुन आहे तो वाळुसाठा जप्त करण्यात यावा आणि संबधित आधिका-यांचे मोफाईल काॅल डिटेल्स (सीडीआर)तपासल्यास आपणास सर्व पुरावे हाती लागतील त्यामुळेच संबधित प्रकरणात जबाबदार महसुल व पोलीस प्रशासनातील पोलीस कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी गौणखनिज विभाग जि.का.बीड यांच्यामार्फत प्रधान सचिव महसुल व विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना केली आहे. 

वाळमाफिया व महसुल प्रशासनातील आधिकांच्या साटेलोट्यामुळे सामाजिक कार्यकर्ते यांचा जीव धोक्यात 

सिंदफना नदीपात्रातील अनाधिकृत वाळु उपसा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अशोक कातखडे यांनी तक्रार केल्यानंतर त्याची माहीती महसुल प्रशासनातील आधिका-यांमार्फत वाळुमाफियां पर्यंत ताबडतोब पोहचते आणि मग तक्रारदाराच्या जिवीताला धोक उत्पन्न होतो याविषयी जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार केल्यानंतर सुद्धा काहीच फरक पडत नसुन आजही वाळु उपसा चालुच आहे. 

राष्ट्रवादी काॕग्रेस चे सर्वेसर्वा खा.शरद पवार साहेब दिल्लीला रवाना . राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.

 

मुंबई ;- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार आज दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.मुंबईतील नियोजित सर्वच कार्यक्रम सोडून ते राजधानी दिल्लीत जात आहेत. त्यामुळे, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीतच आहेत. त्यामुळे, पवारांच्या दिल्ली दौऱ्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सातत्याने अस्थीर करण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकारकडून होत असल्याचा आरोप सत्ताधारी नेते करत आहेत. मात्र, काहीही झालं तरी हे सरकार 5 वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल अशी ग्वाही महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार आणि शिवसेने नेते खासदार संजय राऊत यांच्याकडून देण्यात येते. मात्र, पहाटेच्या शपथविधीमुळे राजकारणातील अनिश्चितता सातत्याने वेगळ्या चर्चा घडवून आणते. आता, शरद पवार अचानक दिल्लीला रवाना झाल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.आगामी काळात होत असलेल्या 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांसंदर्भात हा दिल्ली दौरा आहे का, आणखी काही वेगळेच कारण आहे, याची चर्चा होत आहे.

कोरोनामुळे मृत झालेल्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत मिळणार ; नागरिकांनी सानुग्रह सहाय्य प्रदान अनुदानाचा लाभ घ्यावा-डॉ. संतोष मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने त्या संदर्भातील जीआर काढला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाणार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळणार आहे. तरी नागरिकांनी सानुग्रह सहाय्य प्रदान अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे. 
        गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे लाखो लोकं बाधित झाले आहेत तर मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने त्या संदर्भातील जीआर काढला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाणार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. याने केंद्राला आदेश दिले होते. ही मदत नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यानुसार ही मदत मिळवण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाथार्थ्याच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास  50,000 रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार आहे. कोरोनामुळे  व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात च्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला  समजण्यात येईल. जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोरोनाचे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरीही ही मदत देणार आहे. कोरोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असतांना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू 30 दिवसाच्या नंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल. जी व्यक्ती कोरोनामुळे बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात किंवा घरामध्ये झालेला आहे. त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 च्या कलम 10 खाली Medical Certificate of Cause of Death (MCCD) हे Form 4 व 4 A मध्ये नोंदणी प्राधिकाऱ्याला निर्गमित केले आहे अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल. Medical Certificate and of Cause of Death (MCCD) मध्ये “कोव्हिड- 19 मुळे मृत्यू" याप्रमाणे नोंद नसली तरीही  अटीची पूर्तता होत असल्यास, ती प्रकरणे  50,000 रुपये मदत देण्यात येईल. नातेवाईकांना ही मदत मिळवण्यासाठी राज्य सरकारने विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज दाखल करताना अर्जदाराने  स्वतःचा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक,  अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील,  मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम,  मृत्यू प्रमाणपत्र, इतर  नातेवाईकाचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र देणे आवश्यक आहे. कोणाला मिळणार मदत? 1) राज्यात जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50,000 रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार आहे. 2) कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात क्लिनिकल डायग्नीसिसच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला समजण्यात येईल. जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोरोनाचे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरीही ही मदत देणार आहे.3) कोरोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असतांना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू 30 दिवसाच्या नंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल. 4) जी व्यक्ती कोरोनामुळे बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात किंवा घरामध्ये झालेला आहे. त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रक जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 च्या कलम 10 खाली मेडिकल सर्टीफिकेट ऑफ कॉज ऑफ डेथ 4 व 4 मध्ये नोंदणी प्राधिकाऱ्याला निर्गमित केले आहे अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल. 5) मेडिकल सर्टीफिकेट ऑफ कॉज ऑफ डेथमध्ये कोव्हिड- 19 मुळे मृत्यू याप्रमाणे नोंद नसली तरीही अटीची पूर्तता होत असल्यास, ती प्रकरणे 50,000 रुपये मदत देण्यात येईल. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळणार आहे. जिल्हा तसेच तालुका व गाव पातळीवर सर्व नागरिकांनी सानुग्रह सहाय्य प्रदान अनुदानाचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.

करुणा मुंडे यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची भेट !


मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची मुंबई येथील पक्ष कार्यालयात भेट घेतली. यावेळी करुणा मुंडे यांनी त्यांच्यावरील कौटुंबिक अन्यायाची सविस्तर माहिती दिली. महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार व अन्याय या बाबतीत इथली व्यवस्था गंभीर नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. "करुणा मुंडे यांच्या बाबतीत दबावाचं राजकारण केले जात असल्याचे दिसत असून आवश्यकता पडल्यास वंचित बहुजन आघाडी करूणा मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील" असे मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, महिला आघाडीच्या महासचिव अरुंधती शिरसाठ, महिला आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य रोहिणीताई टेकाळे आदी उपस्थित होते.

कोरोनाचा नवा व्हेरियंट ठरणार डोकेदुखी ! केंद्र सरकार झाले अलर्ट.



कोरोनाचा नवा व्हेरियंट ठरणार डोकेदुखी !


नवी दिल्ली- कोरोनाचे संकट आता कुठे कमी होत असल्याचे चित्र असताना काही देशांमध्ये नवा व्हेरियंट आढळून आल्याने चिंता वाढली आहे.भारताने देखील परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी केल्यानंतरच त्यांना देशात प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत.

हा नवा व्हेरिअंट सापडल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. गुरुवारी केंद्राने सर्व राज्य सरकारांना परदेशातून विशेषतः या तीन देशांतून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन देखील या व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘NCDC कडून अशी माहिती देण्यात आली आहे की, कोविड-19 चा नवीन व्हेरिएंट B.1.1529 ची बोत्सवानामध्ये 3, दक्षिण आफ्रिकेत 6 आणि हाँगकाँगमध्ये 1 रुग्णाची नोंद झाली आहे.’ शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा नवा व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात म्युटेशन करू शकतो.

डॉ. टॉम पीकॉक, इम्पीरियल कॉलेज लंडनमधील विषाणूशास्त्रज्ञ, यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या ट्विटर अकाउंटवर नवीन व्हेरिएंट (b.1.1.529)ची माहिती दिली होती. तेव्हापासून इथर शास्त्रज्ञही या नव्या व्हेरिएंटचा शोध घेत आहेत. प्रोफेसर एड्रियन पुरेन, NICD चे कार्यवाहक कार्यकारी संचालक म्हणतात की, ‘दक्षिण आफ्रिकेत एक नवीन पॅटर्न सापडला आहे. आमचे तज्ञ नवीन पॅटर्न समजून घेण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत. लवकरच या व्हेरिएंटविषयी अधिक माहिती मिळेल.

सतत रुप बदलण्यामुळे WHO सोबतच शास्त्रज्ञांचे टेन्शन वाढले आहे. 30 पेक्षा जास्त वेळा रूप बदलणे ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे. दुस-या लहरीमध्ये, डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंट्सचे असेच उत्परिवर्तन झाले आणि ते घातक ठरले. सर्वात चिंतेची बाब म्हणजे सध्याची लस या प्रकाराविरूद्ध प्रभावी आहे की नाही, याचा अभ्यास केला जात आहे. यास वेळ लागू शकतो. अशा स्थितीत तोपर्यंत या प्रकाराने मोठे रुप घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, WHO च्या तांत्रिक सल्लागार गटाने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत या नवीन प्रकारावर विचारमंथन होणार आहे. WHO म्हणते की या प्रकारावर अधिक संशोधन आवश्यक आहे. आपण अधिकाधिक लोकांना कोरोनाची लस मिळवून देणे हे सर्वात महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्याचा सामना करता येईल

Thursday, November 25, 2021

कोरोना लस विषाणूचा संसर्ग पूर्णपणे थांबवू शकत नाही – WHO प्रमुख.



जिनिव्हा – लस कोरोना विषाणूविरूद्ध सर्वात प्रभावी शस्त्र मानली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम यांच्या म्हणण्यानुसार ही लस जीव वाचवत असली तरी, कोरोना विषाणूचा संसर्ग पूर्णपणे रोखणे शक्य नाही.

डब्ल्यूएचओच्या महासंचालकांच्या म्हणण्यानुसार, लसीचा डोस घेतल्यानंतरही, मास्क घालणे आणि सामाजिक अंतर यासारखी आवश्यक खबरदारी चालू ठेवावी लागेल. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सर्व खबरदाऱ्या वगळण्याची चूक करू नका यावर त्यांनी भर दिला. टेड्रोस यांच्या म्हणण्यानुसार, लसीचा डोस दिल्यानंतरही, आवश्यक सूचना घेणे सुरू ठेवा जेणेकरून तुम्हाला इतर कोणाकडूनही संसर्ग होऊ नये आणि स्वतः संसर्ग पसरू नये.त्च्या

 म्हणण्यानुसार, अनेक देश आणि समुदायातील लोक असे गृहीत धरत आहेत की जर लसीचा डोस दिला गेला असेल तर आता कोरोना विषाणू संसर्गाचा वेग थांबेल, पण हा एक भ्रम आहे. ते म्हणाले की, गेल्या आठवड्यात कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे आणि त्यामुळे झालेल्या मृत्यूंपैकी 60 टक्क्यांहून अधिक युरोपमधील आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. टेड्रोस म्हणाले की, डेल्टा प्रकार येण्यापूर्वी, लसीने संसर्गाचे प्रमाण 60 टक्क्यांनी कमी केले होते, परंतु डेल्टा प्रकारामुळे ते 40 टक्क्यांनी घसरले.

जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम जानेवारीपासून भारतात सुरू झाला आहे आणि आतापर्यंत येथे 119 कोटी डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत (आज 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत) 79 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत.


एस.टी.कामगारांच्या आंदोलनाच्या नेतृत्त्वात उभी फूट.

मुंबई ; एसटी कामगारांच्या आंदोलनाच्या नेतृत्त्वात उभी फूट पडली आहे. आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्र्यांनी केलेल्या पगारवाढीनंतर आझाद मैदानातील आंदोलन स्थगित करण्याची घोषणा गुरुवारी केली.

मात्र आंदोलन स्थगित करण्याऐवजी या दोन्ही नेत्यांनाच आम्ही आझाद मैदानातून आझाद करत असल्याची प्रतिक्रिया अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तसेच आंदोलकांसह विलिनीकरण होईपर्यंत संप सुरुच ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.

एसटी कामगारांच्या आंदोलनाच्या नेतृत्त्वात उभी फूट

परिवहन मंत्र्यांनी केलेली पगारवाढ ही ऐतिहासिक असून एसटी कामगारांच्या आंदोलनाचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, आझाद मैदानात एसटी कामगारांना मी घेऊन आलो होतो. सरकारने केलेल्या विनंतीनंतर लोकांचे हाल होऊ नयेत म्हणून मैदानात आंदोलन स्थगित करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संपकरी एसटी कामगारांना आधार देण्यासाठी आपण आलो होता. संपाचे नेतृत्त्व कामगार करत होते, त्यामुळे पुढील निर्णय त्यांनीच घ्यावा, अशा शब्दांत पडळकर यांनी मैदानात न जाता विधानभवनाबाहेरूनच काढता पाय घेतला.

ही आझाद मैदानाऐवजी विधानभवनाबाहेरूनच आपली भूमिका जाहीर केली. ते म्हणाले की, कामगारांनी केलेल्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देत सरकारला सळो की पळो करून सोडले. म्हणूनच कामगारांना भरघोस वेतनवाढीसह इन्सेटीव्ह मिळवून देता आला. यापुढेही कामगारांच्या पाठिशी ठाम उभे राहू. मात्र तूर्तास विद्यार्थ्यांचे हाल पाहून आझाद मैदानातील आंदोलन स्थगित करत आहोत. सरकारने दोन पाऊले पुढे आल्यावर आपणही एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे. विलिनीकरणात न्यायालयाने दिलेली तांत्रिक मुदत आड येत असल्याने कामगारांनी थोडा विचार करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

संप सुरु ठेवण्याचा निर्धार

दरम्यान, संपकरी कामगारांच्या बाजुने न्यायालयात लढणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र दोन्ही आमदारांना आझाद मैदानातून आझाद करत असल्याचे म्हणत संप सुरु ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सदावर्ते म्हणाले की, परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे संप चिरडण्यासाठी फोडाफोडीचे तंत्र वापरत आहेत. मात्र कामगार या परीक्षेत पास झाले असून सरकार नापास झाले आहे.

विलिनीकरण हा संविधानिक हक्क असून कारागृहातील कैद्यांना मिळणाऱ्या पगाराप्रमाणे वेतनवाढ कामगारांना नको आहे. न्यायालयातील तांत्रिक मुद्द्याकडे बोट दाखवून सरकार पळ काढत आहे. न्यायालयाने गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास वेळेआधी निर्णय घेण्याची मुभा दिलेली आहे. त्यासाठी सरकारला केवळ एक अध्यादेश काढावा लागणार आहे. त्यामुळे विलिनीकरण केल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही. तसेच सरकारने कठोर कारवाई केली, तर त्यास न्यायालयात उत्तर देऊ असा पवित्राही सदावर्ते यांनी यावेळी स्पष्ट केला आहे

राज्याचे हिवाळी आदिवेशन यावेळी नागापुर ऐवजी मुंबईतच घेण्याचा राज्यमंत्रीमंडळाचा निर्णय






   


.   राज्याचे हिवाळी अधिवेशन यावेळी नागपूरऐवजी मुंबईतच घेण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्यावर झालेली शस्त्रक्रिया, विधान परिषद निवडणूक या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन  नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचे ठरत आहे. विरोधी पक्षांकडून होणारा आरोपांचा मारा थोपविण्यासाठी नागपूरऐवजी महाविकास आघाडी सरकारला मुंबई अधिक सुरक्षित वाटते आहे का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

एका वरिष्ठ मंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार २२ डिसेंबरपासून एक आठवडा हे सत्र करण्याचे कॅबिनेट बैठकीत ठरले आहे. याआधी झालेल्या पावसाळी अधिवेशनात हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्येच होईल, असे म्हटले जात होते. पण प्रत्यक्षात आता मुंबईतच हे अधिवेशन होणार आहे.

अर्थात, यासंदर्भातील अधिकृत निर्णय हा २९ नोव्हेंबरला विधिमंडळ कामकाज समितीच्या माध्यमातून घेतला जाईल. या समितीने चर्चा केल्यानंतर हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होईल, याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. याआधी हे अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार असे ठरले होते. मात्र आता काही स्थानिक निवडणुका, विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अधिवेशनाचे ठिकाण बदलण्यात आले आहे. २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे.

खरेतर, हे अधिवेशन नागपुरातच व्हावे अशी विरोधी पक्षांची अपेक्षा आहे, पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला मात्र हे अधिवेशन मुंबईत व्हावे असे वाटते आहे.

१ डिसेंबर पासुन सुरू होणार पहिली ते चौथीचे वर्ग.राज्यमंत्रीमंडळाचा निर्णय.


मुंबई  :- पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या आधीच पाचवीपासूनचे पुढचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आता पहिली ते चौथी हे वर्ग देखील सुरू करण्यात आले असल्यामुळे आता राज्यातल्या सर्व शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात लवकरच आवश्यक ती करोना नियमावली जाहीर करण्यात येईल, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पहिली ते चौथी या वर्गातील मुले लहान असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी प्रामुख्याने शाळांवर असणार आहे. शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनाला यासंदर्भातले योग्य ते आदेश देण्यात येणार आहेत. “ग्रामीण भागात ५वी ते १२वी तर शहरी भागात ८वी ते १२वीच्या शाळा-महाविद्यालये सुरू झाली होती. त्यानंतर ग्रामीण भागात १ली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू केली होती. त्याची फाईल मुख्यमंत्र्यांना मंजुरीसाठी पाठवली होती. आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

“राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात पहिलीपासून बारावीपर्यंत सर्व वर्गांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आगामी काळात या वर्गांसाठी लागू करावयाच्या नियमावलीबाबत टास्क फोर्ससोबत चर्चा केली जाईल. विद्यार्थ्यांच्या पालकांशी, शिक्षकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण वातावरण कसं दिलं जाईल, याची काळजी घेतली जाईल”, असं देखील वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती देताना नमूद केलं. “मुलांचं कुठेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची काळजी घेतली जाईल. मुलांना एकत्र बसून शिक्षण घेण्याची आवश्यकता तज्ज्ञांकडून व्यक्त केली गेली आहे. त्यानुसार चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे”, असं देखील वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Monday, November 8, 2021

परळीतील उद्योजक अजय लुंकड यांची आत्महत्या नव्हे.मुलानेच केला खून . शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न.


परळी वैजनाथ  :( प्रतिनिधी) - येथील उद्योजक अजय शांतीलाल लुंकड रा. विद्यानगर, परळी यांचा मृतदेह सोमवारी (दि.०१) राहत्या घरी आढळून आला होता. त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा जवाब त्यांच्या मुलाने नोंदवला होता. मात्र, त्यांनी आत्महत्या केली नसून, त्यांचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाल्याने शहरात खळबळ उडाली एकच आहे. याप्रकरणी शहर ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. तपास यंत्रणा गतिमान होताच स्वतःच्या मुलानेच पोलीसांकडे दिली कबुली. सिद्धार्थ ला पोलीसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले असता, त्याच्याकडून आश्चर्यकारक स्वतःच्या वडिलांबद्दल टिप्पणी केली. त्याने सांगितले की, मला प्रेमाच्या बदल्यात प्रेमच मिळायला हवे होते.पण , तसे होत नव्हते. माझ्या मोठ्या भावाला आर्किटेक्चर करण्यासाठी खूप पैसा लावला. मला कॉम्पुटर इंजिनिअर शिक्षणासाठी औरंगाबादला ठेवले. परंतु , माझे सर्व मित्र औरंगाबादचे असूनदेखील ते पुण्यात शिकतात. माझे बाबा माझ्याशी मोट्या भावाच्या तुलनेत कमी लेखत असत. लॉकडाउनच्या काळात त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही. तपासात बऱ्याच काही गोष्टी विसंगत वाटल्याने पोलिसांना त्याच्यावर सुरुवातीपासूनच संशय वाटत होता. या खुनामागे याहीपेक्षा काही वेगळे कारण आहे का? अशा अनेक पैलूवर हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे हे मोठ्या चतुराईने या प्रकरणाचा उलघडा करत आहेत. शहर पोलीस स्टेशन चे कर्मचारी साहेबराव पल्लेवाड यांच्या फिर्यादी वरून  भादंवि ३०२ व पुरावे नष्ट करणे असा गुन्हा नोंद झाला आहे.  तसेच परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ हे  तपास करीत आहेत.

बीड जिल्ह्यासह परळी मतदारसंघच्या अनेक प्रश्नामुळे नागरीक त्रस्त.पालकमंत्री मात्र सपना चौधरीच्या नाचगाण्यात व्यस्त.

      
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालीआहे. बीड जिल्ह्या त्याला अपवाद राहिला नाही, जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतीतील पिके पूर्णपणे उध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परळी तालुक्याचा विचार केला तर मागच्या एक महिन्यात जवळजवळ 4 चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यानंतर सध्या एस.टी.कामगारांचे परळी मध्ये आंदोलन चालू आहे.आधार देण्याची गरज असणारे असे अनेक प्रश्न असताना बीड जिल्ह्याचे पालक मंत्री सपना चौधरी चा नाच गाण्याचा कार्यक्रम घेतात ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे जनतेतुन बोलले जात  आहे. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा  पिक विमा तुटपुंजा रकमेत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला पूर्ण अनुदान पिक विमा अजून भेटला नाही असे असताना सपना चौधरीच्या नाच गाण्याचा कार्यक्रम घेऊन परळीला नेमकं कोणत्या दिशेला नेण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे हा सर्वसामान्य लोकांच्या मनात प्रश्न पडला आहे. आपण बघितलं कोरोणाच्या काळात पूर्णपणे शेतकरी कष्टकरी व्यापारी इतर सर्वसामान्य लोक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. विकासाचं कुठलेही काम सध्या होताना दिसत नाही. परळी मतदारसंघाचा विचार  केला तर फक्त काही कार्यकर्ते जगवण्यासाठी निधी आणि त्यात स्वतःला टक्केवारी घेणे या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा विकास करण्याचं काम या ठिकाणी होताना दिसत नाही. याउलट आपत ग्रस्तांच्या दुःखावर मीठ चोळण्याच काम नाच गाण्याचा कार्यक्रम घेऊन करण्याचा प्रयत्न  होत आहे.यामुळे बीड च्या पालकमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न  चिन्ह निर्माण झाले आहेत अशी चर्चा  जनतेत चालु आहे. 
  

सणासुदीच्या काळात एस.टी.महामंडळाच्या संपामुळे खासगी वाहानांकडुन ट्रॅव्हल्स वाल्यांकडून प्रवाश्यांची लुट.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या वाढीव तिकीट दरवाढीला लगाम घालून तिकीटांच्या बेलगाम दरवाढीवर प्रशासकीय पातळीवरून तात्काळ निर्बंध आणावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,खासगी प्रवासी वाहतूकदार यांनी वाढविलेल्या दरवाढीमुळे जनता ञस्त असून खासगी वाहतूक करणाऱ्या प्रवासी वाहतूक कंपन्यांनी आपले प्रवासाचे दर अव्वाच्या सव्वा वाढवून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले आहे.सध्याचे प्रवासी दर नियमित दरांपेक्षा दुप्पट तिप्पट वाढले आहेत.दीपावली निमित्त ये जा करणाऱ्या सर्वसामान्य जनतेची गरज पाहून त्याला वेठीस धरून खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीवाल्यांनी तिकिटाचे दर बेसुमार वाढविले आहेत.
राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना खासगी प्रवासी कंपन्यांची ही लुट हानीकारक असून तिकीट दरवाढीला लगाम घालून तिकिटांच्या किंमतीवर  निर्बंध आणावेत ही मागणी या निवेदनातून केली आहे आणि तात्काळ कार्यवाही करावी खाजगी प्रवासी वाहतूकदारांनी प्रवास भाड्यात केलेल्या दरवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी बीड यांना उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,माजी आ.पृथ्वीराज साठे, राजेश इंगोले, सुनिल जोगदंड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

बैंक ने आपके फटे नोट बदलने से इन्कार किया तो बँक पर हो सकती है कार्रवाई, जानिए क्या हैं कानून.


 भारतीय तीय रिजर्व बैंक (RBI नियम) के नियमों के अनुसार, कोई बैंक फटे नोटों को बदलने से मना नहीं कर सकता है। इतना ही नहीं उनकी छूट भी कम नहीं होगी। अगर बैंक ऐसा करने से मना करता है तो उसके खिलाफ कार्रवाई की जा सकती है। इसलिए अगर आपके पास फटे नोट हैं तो आपको परेशान होने की जरूरत नहीं है। बदले में आपको पूरा मूल्य मिलेगा। आइए जानते हैं रिजर्व बैंक के नियम इस बारे में क्या कहते हैं।
भारतीय रिजर्व बैंक (RBI) ने फटे नोटों को बदलने के लिए दिशानिर्देश तैयार किए हैं। फटे नोटों को देश के किसी भी बैंक में बदला जा सकता है। इसके लिए आपको अपनी होम ब्रांच जाने की जरूरत नहीं है। बेशक ऐसे करेंसी नोट बदलने से मना करने वालों के खिलाफ कार्रवाई की जा सकती है, लेकिन कुछ शर्तें हैं। हम आपको बताते हैं कि किसी नोट की हालत जितनी खराब होती है, उसकी कीमत उतनी ही कम होती है।
नोट बदलने के नियम क्या हैं?
यदि आपके पास 5, 10, 20, 50 जैसे मूल्यवर्ग के नोट फटे हुए हैं, यदि ऊस फाटे  नोट का आधा तुकडा आपके पास होणा जरुरी है . नियम है कि आपको उनमें से कम से कम 50 प्रतिशत रखने की आवश्यकता होती है, तो आपको उस मुद्रा नोट का पूरा मूल्य मिल जाएगा। वहीं, अगर आपका हिस्सा 50 फीसदी से कम है तो आपको कुछ नहीं मिलेगा. उदाहरण के लिए, यदि आपके पास 5 रुपये का एक फटा हुआ नोट है और उसका 50 प्रतिशत सुरक्षित है, तो आपको बदले में 5 रुपये मिलेंगे।
आरबीआई के मुताबिक अगर आपके पास 20 से ज्यादा फटे नोट हैं और उनकी कुल कीमत 5,000 रुपये से ज्यादा है तो उन्हें बदलने के लिए आपको ट्रांजैक्शन फीस भी देनी होगी। नोट बदलने के लिए जाने से पहले गांधीजी के वॉटरमार्क, गवर्नर के सिंबल और सीरियल नंबर जैसे सुरक्षा संकेतों को देखें। फटे नोट पर अगर ये सभी निशान हैं तो बैंक को करेंसी नोट बदलने पड़ेंगे।
कई टुकड़ों में बंटे नोटों को कैसे बदलें?
आरबीआई ने कई टुकड़ों में बंटे नोटों को बदलने के लिए भी नियम बनाए हैं। हालांकि, इसे बदलने के लिए नया नोट मिलने की प्रक्रिया में कुछ समय लग सकता है। दरअसल इसके लिए आपको इन नोटों को डाक से आरबीआई की शाखा में भेजना होगा। इसमें आपको अपना अकाउंट नंबर, ब्रांच का नाम, IFSC कोड, नोट की वैल्यू देनी होगी।
फटे नोटों का क्या करता है RBI बैंक?
रिजर्व बैंक आपसे निकाले गए फटे नोटों को हटा देता है। इसकी जगह नए नोट छापने की जिम्मेदारी आरबीआई की होती है। पहले ये नोट जलाए जाते थे। हालाँकि, अब उन्हें छोटे टुकड़ों में पुनर्नवीनीकरण किया जाता है। इन नोटों से कागज के उत्पाद बनाए जाते हैं। इसके बाद इन उत्पादों को बाजार में बेचा जाता है।

Sunday, November 7, 2021

बीड मध्ये एस.टी.महामंडळाचा संप चिघळला ! वाहकाने घेतले रोगर !


बीड- (प्रतिनिधी) एस. टी. महामंडळाच्या वाहक आणि चालकांचा संप चिघळला आहे.बीड येथे संपकरी वाहकाने रोगर घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून राज्यभर संप सुरू आहे.ऐन दिवाळीच्या काळात हा संप सुरू असल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे.काही ठिकाणी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने राज्यभर वातावरण चिघळले आहे.

दरम्यान बीड येथे संपकरी वाहक अशोक कोकटवार यांनी रोगर पिल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

अंबाजोगाई शहरामध्ये ५ लाखाचा गुटखा जप्त. गुटखा माफीयामध्ये खळबळा.


अंबाजोगाई  (प्रतिनिधी) मागील काही महिन्यांपासून नव्याने केज उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आलेल्या परिविक्षाधीन पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा धडका सुरु केला आहे. शनिवार ६ नोव्हेंबरच्या रात्री अंबाजोगाई शहरामध्ये १५लाख २३ हजाराचा गुटखा पकडला. त्यांच्या या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई शहरातील गुटखा विक्री करणाऱ्या गणेश पानमटेरियलवर शनिवार नोव्हेबर रोजी रात्री छापा मारला. यावेळी सुगंधी पान मसाला गुटखा, सुगंधी तंबाखू असा एकूण १५लाख २३ हजार ७२२ रुपयाचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी गणेश  बिडवे (रा. अंबाजोगाई) याच्याविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कलम ३२८,२७२,२७३ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपनिरीक्षक माने, इतर कर्मचारी बाबासाहेब बांगर, सुहास जाधव, बालाजी दराडे, सयद विकास, चोपणे महादेव, सातपुते रामहरी, भांडाने, शेंडगे, राजू वंजारे, मधुकर तांदळे आदीनी केली. या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

राज्य परिवहन निगम के कर्मचारियों द्वारा विभिन्न मांगों को लेकर चल रही हड़ताल के समाधान के लिए राज्य सरकार विशेष समिति गठित करेगी.




मुंबई : राज्य परिवहन निगम के कर्मचारियों द्वारा विभिन्न मांगों को लेकर चल रही हड़ताल के समाधान के लिए राज्य सरकार अब विशेष समिति गठित करेगी.मुंबई उच्च न्यायालय ने आज सोमवार को समिति की रूपरेखा प्रस्तुत करने का निर्देश दिया। यूनियनों ने अपना रुख कायम रखा कि हड़ताल को बंद नहीं किया जाना चाहिए.

हड़ताल के चलते आज राज्य के 72 डिपो बंद रहे. इसलिए कोर्ट के आदेश के बाद भी हड़ताल जारी रहेगी। राज्य सरकार ने कर्मचारियों और निगम के बीच हड़ताल पर चर्चा और समाधान करने के लिए वरिष्ठ स्तर के सचिवों की एक समिति नियुक्त करने के लिए अपनी तत्परता का संकेत दिया।

संगठन ने सोमवार की सुनवाई में लक्ष्य समिति पर अंतिम फैसला आने तक हड़ताल वापस लेने में असमर्थता जताई.इसलिए सोमवार सुबह अगली सुनवाई के बाद ही संगठन की भूमिका स्पष्ट होगी.संस्था की ओर से एड. गुणरत्न सदावर्ते ने कहा.उन्होंने बताया कि राज्य सरकार की ढुलमुल भूमिका के कारण अब तक 35 श्रमिकों ने आत्महत्या कर ली है. न्याय शाहरुख कथावाला और न्याय सुरेंद्र तावड़े की पीठ ने इस पर संज्ञान लिया। उन्होंने महाधिवक्ता को सोमवार को अपना पक्ष रखने का भी निर्देश दिया। महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन कर्मचारी संघ ने राज्य के कुछ डिपो में काम ठप करने का आंदोलन शुरू कर दिया है।

कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या पोलीस आधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत. पोलिस ठाण्यातच भाऊबीज साजरी.

 


                                   
                

बीड -( प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणावर या वर्षी दिवाळी साजरी करण्यात आली . दोन वर्षाचा कोरोना काळ आणि भावा-बहिणीची झालेली ताटातूट ताटातूट पाहता दिवाळीच्या सणाला आपल्या गावाकडे न जाता ड्युटीला प्राधान्य देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी चा भाऊबीज हा सण साजरा करताना सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी तिडके ,लक्ष्मी बाजीराव, अनुराधा प्रकाश या भगिनी यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांना ओवाळणी करून हा सण साजरा करण्यात आला .                                "दिन दिन दिवाळी बहिण-भावाला ओवाळी"  या उक्तीप्रमाणे बीड जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना आपले कर्तव्य बजावत असताना दिवाळीचा सण साजरा करता येत नाही त्या पासून दूर राहावे लागत आहे . शहरातील सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी तिडके यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना भावगीत करून हा सण त्यांच्यासोबत साजरा केला. यावेळी पोलिस ठाण्यातील महिला कर्मचारी यांनी देखील सहभाग नोंदवत हा सण पोलीस ठाण्यात साजरा करताना दिसून आल्या. कित्येक पोलीस अधिकारी ,कर्मचारी यांना कर्तव्य सोडून जाता येत नाही त्यामुळे कर्तव्य करत असताना काही महिला भगिनी कडून भावा-बहिणीची भाऊबीज साजरी केली . दीपावलीचा सणा निमित्त कर्तव्यावर असल्यामुळे आपल्या बहिणीकडे जाता येत नाही आणि बहिणीला ही आपल्या भावाकडे येता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये सण साजरा करताना .भाऊबीज हा सण साजरा करताना बहीण आणि भाऊ या नात्याने दोघांचाही चेहऱ्यावर आनंद दिसून आला .

बीड जिल्हा रूग्णालयातील अग्निशमन यंत्र कुजलेले केवळ शोभेची वस्तु वेळेवर रिफिलिंगच नाही.


बीड (प्रतिनिधी) बीड जिल्हा रूग्णालयातील प्रशासकीय यंत्रणा जानेवारी मध्ये भंडारा येथील जळीतकांडा पासून काहीही बोध घेण्यास तयार नसुन केवळ शोभेची वस्तु म्हणून जिल्हा सामान्य रूग्णालयात बाह्यरूग्णविभागात लावलेले अग्निशमन यंत्र खालच्या बाजुने कुजलेले तर रिफील तपासून रिफिलिंग करण्याची गरज असून फेब्रुवारी महिन्यात रिफिलिंग करण्याची गरज असताना  ८ महिने झाले तरी रिफिलिंग केलेले दिसून येत नाही.त्यामुळेच शासकीय रूग्णालये, ग्रामिण रूग्णालय तसेच प्राथमिक केंद्र यांच्यासह खाजगी रूग्णालयातील फायर ऑडीट  व इलेक्ट्रिक ऑडीट न करणा-या रूग्णालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड तसेच उपसंचालक आरोग्य परिमंडल लातूर यांच्या मार्फत  मुख्यमंत्री, प्रधान सचिव, आरोग्य मंत्री, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य मंत्रालय, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे. 

शासकीय कार्यालयात फायर ऑडीट व ईलेक्ट्रीक ऑडीट न केल्याबद्दल संबधित जबाबदार आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
______
बीड जिल्ह्य़ातील शासकीय रूग्णालयातील बीड जिल्हा रूग्णालय, ग्रामिण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याठीकाणी दि.१० जानेवारी २०२१ रोजि भंडारा येथील जिल्हा ग्रामिण रूग्णालयातील जळीतकांड प्रकरणानंतर केलेल्या विविध चौकशीत बीड जिल्हा रूग्ण्लयाचे ६ वर्षापासून फायर ऑडीट नसणे तसेच दोन वर्षापुर्वी रेकॉर्ड रूमला आग लागून सुद्धा फायर ऑडीट न करणे आदि संशयास्पद प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी दि. १८ जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु आजही त्याप्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात आलेली नसुन अग्निशमन यंत्राची दुरावस्था तसेच नादुरूस्त अग्निशमन यंत्रे जिल्हा रूग्णालयासह विविध शासकीय विभाग ऊदाहरणार्थ पाटबंधारे विभाग, समाज कल्याण विभाग, दुय्यम निबंधक, रजिष्ट्री कार्यालयात दिसून येत असून संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली आहे.