Wednesday, November 3, 2021

वर्षाखेरीस तेरा हजार पोलीस भरती !


वर्षाखेरीस तेरा हजार पोलीस भरती !

मुंबई – राज्यातील पोलीस दलात सरत्या वर्षाच्या शेवटी तब्बल तेरा हजार पेक्ष्या जास्त पदांची भरती केली जाणार आहे,विशेष म्हणजे यापूर्वीची पद्धत बदलून आता अगोदर मैदानी चाचणी अन नंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे .

सध्या 2019 मधील साडेपाच हजार पदांची भरती सुरू आहे. या भरतीत सुरवातीला उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली असून आता मैदानी चाचणी सुरू आहे. दरम्यान, बऱ्याचवेळा अनेक उमेदवार मैदानी चाचणीत खूप पुढे असतात, परंतु लेखी परीक्षेत मागे पडतात. त्यात विशेषत: ग्रामीण भागातील उमेदवारांची संख्या मोठी असते. त्यामुळे 2019 मध्ये पोलिस भरतीच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता.

2020 व 2021 या दोन वर्षातील जवळपास 13 हजार पोलिस शिपाई पदांची भरती प्रक्रिया एकत्रिपणे राबविण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. बिंदुनामावली अंतिम केली जात असून शासनाकडे भरतीस मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबर 2021 नंतर ही पदे भरती जातील.

पोलिस भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर आतापर्यंत उमेदवारांना पहिल्यांदा लेखी परीक्षा द्यावी लागत होती. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्यांचीच मैदानी चाचणी घेतली जात होती. त्यामुळे मैदानी चाचणीत हुशार असलेले विशेषत: ग्रामीणमधील बहुतेक उमेदवार भरती प्रक्रियेतून बाहेर जायचे आणि पुस्तकी ज्ञानात पुढे असलेले उमेदवार पुढे जायचे. तरीही, लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांमध्ये अनेक उमेदवारांची छाती, उंची कमी असलेले असायचे. त्यामुळे आता सर्वप्रथम शारीरिक चाचणी होणार असून त्यात उत्तीर्ण उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बसता येणार आहे. या नवा बदलामुळे लेखीत हुशार, पण मैदानी चाचणीचे निकष पूर्ण करणाऱ्यांना बाहेर काढणे सोयीचे होणार आहे.

No comments:

Post a Comment