Friday, March 31, 2023

डिझेलसाठी बीड बस डेपोकडे पैसेच नाही; ८२ पैकी फक्त २० बसेस सुरु.प्रवाशांची तारांबळ अन् संताप.

बीड (प्रतिनिधी) लालपरी एस.टी संदर्भात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. तशातच आता बीडमधील बसस्थानकातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बस स्थानकाकडे चक्क डिझेलसाठी पैसेच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. लालपरीसाठी डिझेल नसल्यानं गेल्या दोन दिवसांपासून बस बससेवा सुरुळीतपणे सुरु नाहीये. प्रवाशांचा खोळंबा होत आहे. तासंतास एसटीची वाट पाहावी लागतेय. एवढचं नाही तर, ८२ पैकी फक्त २० बसेस सुरु असल्यानं गर्दी मोठ्या प्रमाणात होतेय.

शेतकरी कामगार पक्षाने राेखला माजलगाव - पाथरी राष्ट्रीय महामार्ग विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन वाहनांची तीन किलाेमीटर रांग.


बीड (प्रतिनिधी) शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी बीड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजलगाव - पाथरी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन छेडले आहे. 

शेतमालाला हमीभाव द्या, शेतकऱ्याला 10 हजार रुपये महिना पेन्शन द्या या व अन्य मागण्यांसाठी बीड येथील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज कार्यकर्त्यांनी माजलगाव - पाथरी रोडवर मोठेवाडी येथे तब्बल दीड तास रास्ता रोको करत शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला

यावेळी रास्ता राेकाे आंदाेलनामुळे महामार्गावर दोन ते तीन किलो मिटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शासनाने शेतकऱ्यांचा बी- बियाणे, खते, औषधे, रोजंदारी, डिझेल, पेट्रोल, व यंत्रसामग्री यांच्या किंमतीत प्रचंड भाववाढ केली आहे. त्यामुळे वास्तव खर्चावर आधारित शेतकऱ्यांच्या शेतीमाला किफायतशीर हमी भाव देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

लोकनेते गोपीनाथमुंडे सांस्कृतिक सभागृह शहराच्या वैभवात भर घालणार.आ.नमिता मुंदडा


अंबाजोगाई (प्रतिनिधी) लोकनेते गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृहासाठी पाच कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्याबद्दल केज शहरातील व तालुक्यातील प्रमुख भाजप कार्यक्रत्यांकडून आमदार नमिता मुंदडा यांचा अंबेजोगाई येथील त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. त्यावेळी आमदार नमिता मुंदडा या बोलत होत्या. केजकरांचा व तालुक्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे भाग्य माझ्या हातून घडत आहे त्याबद्दल मी समाधानी आहे असे मत आमदार नमिता मुंदडा यांनी कार्यक्रत्यांच्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. लोकनेते गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृहाचे काम दर्जेदार होण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष देईल व या कामासाठी निधीची कसलेही कमतरता भासू दिली जाणार नाही असे पुढे बोलताना आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या.या कामासाठी चांगल्यात चांगला आर्किटेक्चर नेमला जाईल व काम सुंदर,दर्जेदार होईल या साठी स्वतः प्रयत्न केला जाईल असे आश्वासन युवा नेते अक्षय मुंदडा यांनी दिले. लोकनेते गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृहासाठी महाराष्ट्र शासनाने डि. वाय. एस. पी. कार्यालयाची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले . या वेळी युवा नेते अक्षय मुंदडा, सुनील आबा गलांडे, डॉ. वासुदेव नेहरकर,भगवान केदार, रामकृष्ण घुले,विष्णु घुले,मुरलीधर ढाकणे,लक्ष्मण तात्या राख, वसंत केदार, बाळासाहेब घुगे, सुरेश केकाण,डॉ.सचीन शेप, अशोक नागरगोजे, अरुण चाटे, दिनकर चाटे,सदाशिव चाटे, महादेव जाधवर, सुनील घोळवे, प्रकाश मुंडे,रघुनाथ बारगजे,शिवाजी चाटे, सुरेश घोळवे,शरद इंगळे,डॉ संभाजी वायबसे ,चंदू मिसाळ, ईश्वर बिक्कड,महादेव घूले,अज्जू तांदळे,विरेंद्र जोगदंड, अविनाश साबळे, श्रीकांत भांगे, विष्णू चाटे, फुलचंद दराडे, विजय वनवे, अशोक सोनवणे,धनंजय घोळवे ,बाबुराव घुले, रणजित बिक्कड,वसंत बिक्कड,उत्तम बिक्कड,भरत बिक्कड,धनराज लाटे, मनोज राख,माणिक शेप सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ वासुदेव नेहरकर यांनी केले तर आभार रामकृष्ण घुले यांनी व्यक्त केले.

खळबळजनक ! नाचण्याच्या कारणावरून वाद विकोपाला. रामनवमी यात्रेत तरुणाची हत्या.


जालना ( प्रतिनिधी)  जालना येथून एक दुखःद घटना समोर आली आहे. काल रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. नाचण्याच्या कारणावरून दोन व्यक्तींमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर झालेल्या वादातून ३० वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. 

Thursday, March 30, 2023

अंबाजोगाईतील ११८ मूर्तींसह बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा तेरच्या संग्रहालयात.


*तेर येथील संग्रहालयात प्राचीन ऐतिहासिक वस्तूंचा वारसा जतन करण्यात येत आहे.

तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथील रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय वस्तू संग्रहालयात आता बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक वस्तूंचेही जतन व संवर्धन केले जाणार आहे. यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील पुरातन व ऐतिहासिक संकलेश्वर (बाराखांबी) परिसरात पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननातील ११८ मूर्ती, शिलालेख यासह विविध ऐतिहासिक वस्तू तेर येथील संग्रहालयात ठेवण्यासाठी मंगळवारी व बुधवारी दाखल झाल्या. त्यामुळे येथील संग्रहालयात आणखी ऐतिहासिक वारशाची भर पडली आहे.

तेर येथील संग्रहालयात प्राचीन ऐतिहासिक वस्तूंचा वारसा जतन करण्यात येत आहे. या वस्तू पाहण्यासाठी व त्यांचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातील अभ्यासक येत असतात. येथे दोन हजार वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या वस्तू आहेत. दरम्यान, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर परिसरात पुरातत्त्व विभागाने सात वर्षांपूर्वी उत्खनन केले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर रंगशिला, द्वारशिल्प, मुख भाग आणि मंदिराचा अंतराळ यासह अनेक देवी- देवतांच्या मूर्ती सापडल्या होत्या. त्यापैकी ८० मूर्ती चांगल्या स्थितीत तर काहींची मोडतोड झाल्याचे दिसून आले. या मूर्ती सात वर्षांपासून तेथेच पडून होत्या. ऊन, पाऊस, वारा पाऊस यामुळे मूर्तींची झीज होत होती. ही बाब लक्षात घेऊन पुरातत्त्व विभागाने या मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी तेर येथील संग्रहालयात ठेवण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. वरिष्ठांच्या परवानगीनंतर मंगळवारी रात्री उशिरा ट्रकमधून या मूर्ती तेरमध्ये दाखल झाल्या. या मूर्ती खूप मोठ्या असल्याने क्रेनच्या साह्याने उतरविण्यात आल्या. पुन्हा बुधवारी रात्री उशिरापर्यंत अंबाजोगाई येथून या मूर्ती आणण्याचे काम सुरूच होते.
अधिक लक्ष दिले जाईल 
या वारशाचे जतन, संवर्धन ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्यामुळेच तो तेर येथील संग्रहालयात आणण्यात आला. याचे जतन, संवर्धन करण्यासाठी येणाऱ्या काळात अधिक लक्ष दिले जाईल.- अमोल गोटे, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग

प्रवाशांनी भरलेल्‍या रिक्षाला ट्रकने उडविले; भीषण अपघातात ५ जणांचा मृत्‍यू


नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड ते मुदखेड मार्गावरील इजळी पाटीजवळ भीषण अपघात झाला आहे. सिमेंटने भरलेल्या ट्रकने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली असून या  अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. यात एका लहान मुलाचा आणि एका वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे.

नांदेड ते मुदखेड या मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. यात नांदेडकडे प्रवाशांनी भरलेली ॲपरिक्षा जात होती. या वेळी नांदेड कडून भरधाव येणाऱ्या सिमेंटने भरलेल्‍या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा दूरवर फेकली गेली. या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्‍यू झाला. तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्‍य ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले असून जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मजुरीसाठी जात होते

रोजच्‍या नित्‍यनियमाप्रमाणे नांदेडला रिक्षाने अनेकजण मजुरीसाठी जात होते. यानुसार आज देखील ॲपेरिक्षामध्ये जवळपास १५ प्रवाशी होते. हे सर्व जण वाजेगाव येथे मजुरीसाठी जात होते. परंतु, कामावर पोहचण्यापुर्वीच रिक्षाला अपघात होवून काळाने घाला घातला.

वेताळवाडीत १६ वर्षीय मुलीने संपवले जीवन.आष्टीत तीन दिवसांत २ अल्पवयीन मुलींच्या आत्महत्या दोन्ही मुलींच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट.


आष्टी (प्रतिनिधी) :बीडसांगवी येथे आजोळी राहत असलेल्या एका १३ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री सात वाजेच्या दरम्यान वेताळवाडी येथे देखील अल्पवयीन मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रतिक्षा सुरेश वनवे (१६) असे वेताळवाडी येथील मृत मुलीचे नाव आहे. आष्टी तालुक्यात तीन दिवसांत दोन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 

आष्टी तालुक्यातील वेताळवाडी येथील प्रतिक्षा सुरेश वनवे ( १६ ) हिने  बुधवारी रात्री सातच्या दरम्यान राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने  गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांच्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. 
तीन दिवसांत दोन मुलींच्या आत्महत्या
बीडसांगवी येथे आजोळी राहत असलेल्या एका १३ वर्षीय मुलीने सोमवारी सायंकाळी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन जिवन संपवले. त्यानंतर बुधवारी रात्री वेताळवाडी येथील १६ वर्षीय मुलीने देखील ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन जिवन संपविले. या दोन्ही मुलींच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. 

 

सहायक पोलीस अधीक्षक डॉ धीरजकुमार यांच्या पथकाची कारवाई.परळीत माजी नगरसेवक चालवत असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा.


*बीडसह परभणी, लातूर जिल्ह्यातील २९ जुगारी पकडले : सहायक पोलिस अधीक्षक धीरजकुमार यांच्या पथकाची कारवाई. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी शहरातील हमाल वाडी परिसरात माजी नगरसेवक जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती माजलगाव चे सहायक पोलीस अधीक्षक डॉ धीरजकुमार यांना मिळाली. त्यांनी बुधवारी रात्री ९ वाजता आपल्या पथकासह छापा मारला. यात तब्बल २९ जुगारी पकडले असून त्यांच्याकडून १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

जिल्ह्यात सध्या अवैध धंद्याविरोधत मोहीम हाती घेतली आहे. मागील आठवड्यात बीडमध्ये एका जुगार अड्यवर छापा टाकून याच पथकाने एका माजी नगरसेवकच्या क्लब चा पर्दाफाश केला होता. त्यांनतर आता परळीत त्यांनी मोर्चा वळवला. परळी शहरातील हमाल वाडी भागात माजी नगरसेवक जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती धीरजकुमार यांना मिळाली होती. त्यांनी लगेच सापळा लावला. रात्री उशिरा त्यांनी छापा मारून ही कारवाई केली. यामधे २९ लोकांना ताब्यात घेऊन परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दुचाकी, चारचाकी, मोबाईल, रोख रक्कम असा १७ लाख ९३ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक डॉ धीरजकुमार, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड, पोलीस कर्मचारी अशोक नामदास, गणेश नवले, संतराम थापडे, युवराज चव्हाण, तुकाराम कानतोडे आदींनी केली. 

आरोपींमध्ये यांचा समावेश १)बाळासाहेब महादेव बळवंत वय ४२ वर्ष रा. हमालवाडी ता. परळी २) ज्ञानोबा ऊर्फ बापु अनंतरावनागरगोजे, वय ६३ वर्ष रा. शिवाजीनगर परळी ३) दिलीप रामराव गडम (लातुरकर ), वय ६० वर्ष रा.विश्वराज सिटी लातुर ता. जि. लातुर ४) विठठल गणपतराव भुसेवाड, वय ६६ वर्ष रा. उत्तर त्रिमुर्ती नगरपरभणी ता. जि. परभणी ५) नासेर शेरखान पठाण, वय ५५ वर्ष रा. मलीकपुरा परळी ता.परळी ६) सय्यदअमिर सय्यद जाफर, वय ४४ वर्ष रा. पोठ मोहल्ला परळी ता.परळी ७) बाळु सर्जेराव अल्हाट, वय२८ वर्ष रा. मोगरा ता. माजलगाव जि. बीड ८) नामदेव तुकाराम कराड, वय ५३ वर्ष रा. इंजेगावता. परळी जि. बीड ९) देवराव लक्ष्मण शिंदे, वय ५० वर्ष रा. लोणी ता. परळी जि.बीड १०) पांडुरंगराघोबा काळे, वय ३८ वर्ष रा. सिरसाळा ता.परळी जि.बीड ११) चेतन त्रिंबक महाजन, वय २० वर्ष रा.महाजन गल्ली सोनपेठ ता. सोनपेठ जि. परभणी १२) व्यंकटी युवराज राजळे, वय ३५ वर्ष रा. बोर्डाता. गंगाखेड जि. परभणी १३) रतन रघुराम हजारे, वय ४७ वर्ष रा. डिघोळ ता. सोनपेठ जि. परभणी १४)सुभाष गोपीनाथ जाधव, वय ४० वर्ष रा. डिघोळ ता. सोनपेठ जि. परभणी १५) बापुराव रामभाऊ वगरे,वय ३८ वर्ष रा. शिंदेवाडी ता. माजलगाव जि. बीड १६) बळीराम हरीभाऊ चव्हाण, वय ४३ वर्ष रा.डिघोळ ता. सोनपेठ जि. परभणी १७ ) शेख बशीर शेख फरीद, वय ५८ वर्ष रा. बियाणी महामंडळ संजयगांधीनगर परभणी ता. जि. परभणी १८) अनिल गंगाधर कंदे, वय ३७ वर्ष रा. कोपरा ता. अहमदपुरजि. लातुर १९) शाम रामभाऊ माने, वय ४९ वर्ष रा. हमालवाडी परळी ता.परळी जि. बीड २०) वैजिनाथविश्वंभर सुर्यवंशी, वय ४५ वर्ष रा. कोपरा ता. अहमदपुर जि. लातुर २१) बालाजी सखाराम जाधव, वय४३ वर्ष रा. वडर कॉलणी परळी ता. परळी जि.बीड २२) मुसाखाँन शेरखान पठाण, वय ३९ वर्ष रा.कोमटवाडी ता. जि. परभणी २३) मासुम हमीद पठाण, वय ४० वर्ष रा. पोखर्णी ता. जि. परभणी २४)खलील अजेशखॉन पठाण, वय ३४ वर्ष रा. पोखर्णी ता. जि. परभणी २५) रविंद्र सुदार कदम, वय २६वर्ष रा. फकीर जवळा ता.धारुर जि.बीड ता. जि. परभणी २६) भारत किसन गायकवाड, वय ५० वर्ष रा.संगम ता. परळी जि. बीड २७) केशव विश्वंभर बळवंत, वय ७३ वर्ष मुळ रा. हमालवाडी २८) रमेशकेशव वाघ, वय ५९ वर्ष रा. रा. पोखर्णी ता. जि. परभणी २९) अशोक चंद्रभान बडे, वय ३२ वर्ष रा.खाडेवाडी ता.माजलगाव यांचा आरोपीत समावेश आहे.

गाडी अडविल्यावरून भरचौकात शिवीगाळ करून पोलिसाला मारहाण.

बीड (प्रतिनिधी) : गाडी अडविल्याचा राग मनात धरून पोलिस निरीक्षकांना शिवीगाळ तर पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, सीसीटीव्ही तपासा, आपण मारहाण केलेली नसून पोलिसांनीच आपल्याला धक्काबुक्की केल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. 

मार्च एन्ड असल्याने शहर वाहतूक पोलिसांकडून वाहनांवरील थकीत दंड वसुलीची माेहीम हाती घेण्यात आली होती. शहरातील प्रत्येक चौकात वाहतूक पोलिसांकडून वाहने अडवून त्यांची तपासणी केली जात होती. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बार्शीकडून आलेल्या एक कार पोलिसांनी अडवली. यावर आमची गाडी का अडवली, असे विचारताच पोलिस व वाहनधारक यांच्यात वादावादी झाली. तोपर्यंत वाहतूककोंडी झाली. याचवेळी पोलिस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार हे तेथे आले. त्यांच्याशीही वाद घातला. पोलिस कर्मचारी महारुद्र डोईफोडे व इतरांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाच शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.
यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहनधारकासह सर्वांनाच पोलिस ठाण्यात नेले. येथे वाद घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. दरम्यान, मारहाण केल्याचा आरोप वाहनधारकाने फेटाळला आहे. तसेच उलट पोलिसांनीच आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोपही संबंधित वाहनधारकाने केला आहे.

Wednesday, March 29, 2023

मध्यरात्री उपोषणकर्त्याचे अंथरूण पेटवून जाळण्याचा प्रयत्न?; उपोषणकर्त्याचा गंभीर आरोप.

बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्याचे मध्यरात्री अंथरूण पेटवून दिले. मात्र  उपोषणकर्त्यांना जाग आल्याने, मोठा अनर्थ टळला आहे. उपोषणकर्त्याला अज्ञात व्यक्तीने जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
चरणदास वाघमारे असे उपोषणकर्त्याचे नाव आहे. शिरुर कासार तालुक्यातील तागडगाव येथील (कै.) सुभद्राबाई माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक आहेत. परंतु त्यांचा पगार होत नसल्याने पगार द्यावा म्हणून बीड जिल्‍हा परिषदेच्‍या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
आंदोलनस्थळीच मुक्कामी असताना मध्यरात्री १२ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या डोक्याखाली असलेल्या उशीला व अंथरुणाला अज्ञात व्यक्तिने आग लावली. डोक्याला गरम लागताच ते जागे झाले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. जाणीवपूर्वक मला जाळण्याचा हा प्रयत्न केला गेला, असा आरोप वाघमारे यांनी केला.

उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी माध्यमाचे शिक्षक. शिक्षक समायोजन नवीन घोटाळा समोर.

बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील उर्दू शिक्षक समायोजनामधील नवा घोटाळा समोर आला आहे. मराठी  शिक्षकांना उर्दू शाळेवर नियुक्ती दिल्याने शिक्षकांनाच उर्दू येत नसेल तर विद्यार्थ्यांना शिकवण कसे? असा प्रश्न असतांना या संदर्भात  जिल्हा परिषद शिक्षण विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे.
बीड जिल्ह्यात १२ प्रथामिक व माध्यमिक उर्दू शाळांमध्ये अनेक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा पाठपुरावा करूनही भरल्या जात नाहीत. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षण विभागाने आता नवा गोंधळ केला आहे. या उर्दू माध्यमांच्या शाळांवर मराठी भाषेच्‍या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मराठी भाषिक शिक्षक उर्दू विद्यार्थ्यांना काय शिकवणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. गेवराई, माजलगाव, पात्रुड, अंबाजोगाई, सायगाव या शाळांवर या नियुक्ती देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मराठी शाळेवर जागा उपलब्ध असतांनाही जवळची शाळा घेण्यासाठी सवलती आणि वेतन काढण्यासाठी उर्दू शाळांवर मराठी माध्यमांच्या शिक्षकांना सर्व नियम डावलून पदस्थापना देण्यात आली आहे. 

पालकांचे खुले आव्‍हान

बीडच्या नेकनूर येथील उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत. मात्र त्या ठिकाणी शिक्षकांची रिक्त पदे असल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे मुख्याध्यापक मोमीन मोहम्मद सिद्दीकी यांनी सांगितलं. शिक्षकांनाच उर्दू भाषा येत नसेल तर विद्यार्थ्यांना काय शिकवणार त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ज्या शिक्षकांना नियुक्ती केली आहे. त्या शिक्षकांनी उर्दूमधील एक पाठ शिकवून दाखवावा, असा खुल आवाहन पालकांनी दिला आहे. तसेच या शिक्षकांचे नियुक्ती करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यावर कारवाई केली जावी; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तर शाळांना कुलूप ठोकणार

उर्दू शाळांवर मराठी शिक्षकांना अनधिकृतपणे पदस्थापना देण्यात आली आहे. उर्दू शाळांवर फक्त उर्दू माध्यमाच्या शिक्षकांनाच पदस्थापना देण्यात यावी, अशी संघटनेची वारंवार मागणी असूनही जाणूनबुजून असे काम केले जात आहे. या संपूर्ण समायोजन घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. नियमबाह्य नियुक्त्या तात्काळ रद्द करा, अशी मागणी उर्दू शिक्षक संघटना यांनी केली आहे. दरम्‍यान अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या शिक्षण विभागाचा निषेध व्यक्त करतो. ज्या शाळांचा अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना फायदाच होणार नाही, त्या शाळांना कुलूप ठोकण्याचा इशारा एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांनी दिला आहे.

शिक्षणाधिकारी म्‍हणताय माहित नाही..

दरम्यान बीड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना या संदर्भात विचारले असता नेमकं त्यांचा समायोजन आणि नियुक्ती कशी झाली आहे? हे पहाव लागेल. यासंदर्भात मला माहिती नाही, असं म्हणत बाईट देण्यास नकार दिला. मात्र शिक्षण अधिकाऱ्यांनाच समायोजना संदर्भात माहीत नसेल, तर या प्रकरणातील माहिती कशी दडपण्याचा प्रयत्न केला जातोय? याचा प्रत्यय येत आहे. एकंदरीतच या उर्दू शाळेमधील समायोजन घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे

मा.खा.निलेश राणेंची केज न्यायालयात हजेरी.आक्षेपार्ह पोस्टप्रकरणात जामीन मंजूर.



*वंचित बहजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध केली होती आक्षेपार्ह पोस्ट

केज (प्रतिनिधी): सोशल मीडियात सन 2020 मध्ये आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी खासदार निलेश राणे यांनी आज केज न्यायालयात हजर लावली. यावेळी न्यायाधीश एस.व्ही. पावसकर यांनी त्यांना जामीन मंजूर केला.

सन 2020 मध्ये केज तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की, वंचित बहजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध माजी खासदार निलेश राणे, केज तालुक्यातील विवेक अंबाड ( रा.लाडेगाव ) आणि रोहन चव्हाण ( रा. पळसखेडा)  यांनी अपशब्द वापरून दोन समाजामध्ये शत्रुत्व, व्देषभाव व तेढ निर्माण होईल अशा पोस्ट सोशल मिडियावर शेअर केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी. या प्रकरणी केज पोलीस स्टेशनला माजी खासदार निलेश राणे, विवेक अंबाड, आणि विवेक चव्हाण यांच्या विरुद्ध ऑक्टोबर 2020 रोजी गु.र.नं. 432/2020 भा.दं.वि. 505 (2) आणि 34 नुसार गुन्हा दाखल झाला होता.

तत्कालीन पोलीस  निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी या प्रकारणाचा तपास करून केज न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. दरम्यान, हे प्रकरण सुनावणीसाठी आल्यानंतर आज दि. 29 मार्च रोजी निलेश राणे हे न्यायाधीश एस. व्ही. पावसकर यांच्या न्यायालयात हजर झाले. पुढील तारखेस हजर राहण्याच्या अटीवर व 20 हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामिन मंजूर केला. यावेळी फिर्यादीच्या वतीने अॅड. सतीश मस्के यांनी तर निलेश राणे यांच्या वतीने अॅड. तपसे यांनी न्यायालयात बाजू मांडली.

कापसात गांजाची लागवड. चार महिन्यांपासून फरार गांजा तस्कराच्या आवळल्या मुसक्या.


आष्टी (प्रतिनिधी) - कापसाच्या शेतात गांजाची लागवड करून विक्री केल्याप्रकरणी चार महिन्यांपासून फरार असलेल्या गांजा तस्कराच्या अखेर अंभोरा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान मुसक्या आवळत अटक केली. हनुमंतअर्जुन पठारे (रा.बाळेवाडी ता.आष्टी )असे आरोपीचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील बाळेवाडी येथील हनुमंत अर्जुन पठारे याने स्वतःच्या शेतात कापूस पिकात १३० गांजाची झाडे लावल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा, अंभोरा पोलिसांना मिळाली. यावरून ९ डिसेंबर २०२२ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ७ लांखाचा गांजा जप्त केला. मात्र, यावेळी हनुमंत पठारे पसार झाला होता. आरोपी ओळख लपवत पोलिसांना गुंगारा देऊन पुणे, शिरूर, अहमदनगर या ठिकाणी फिरत होता. दरम्यान, आरोपी पठारे मंगळवारी राहत्या घरी आल्याची गोपनीय माहिती अंभोरा पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी सापळा रचून सायंकाळी पठारेच्या मुसक्या आवळल्या.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने, आदिनाथ भडके, अंमलदार शिवदास केदार यांनी केली.

BREKING न्युज ! भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं निधन.

पुणे (प्रतिनिधी) पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या त्यांनी अखेरचा श्वास वर्षी घेतलाय. मागच्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती.
पुण्यातील दीनानाथ रुग्णालय त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. सर्वपक्षीय नेत्यांनी बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

६३ हजार शिक्षकांसाठी आनंदाची बातमी ! ३४२७ शाळांना २० टक्के अनुदान.पगार वाढणार.

तरुण वयात शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यानंतर शाळेतील मुलांना शिकवता शिकवता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर काही शिक्षक आले, पण २० टक्क्यांच्या अनुदानाचा टप्पा मिळाला नव्हता. त्यामुळे विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील त्या सर्वच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर आंदोलन केले होते. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांची दखल घेत त्यांना अनुदानाचा टप्पा देण्याची ग्वाही दिली आणि काही दिवसांतच शासन निर्णय काढला. पण, आता अनुदान दिल्यानंतर २०२२-२३ ची संचमान्यता केली जाईल. त्यावेळी आधारकार्ड असलेल्या आणि ‘सरल’ पोर्टलवर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचीच पटसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार वाढीव नवीन शिक्षक पदांना मान्यता मिळणार आहे.
सरकारच्या निर्णयानुसार... वाढीव अनुदानातील शाळा३,४२७अनुदान वाढणाऱ्या तुकड्या१५,५७१‘त्या’ शाळा-तुकड्यांवरील शिक्षक६३,१८०शाळांना मिळणारे दरवर्षीचे अनुदान११६०.८८ कोटीठळक बाबी...विनाअनुदानित व अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २० टक्के वाढीव टप्पा देण्याचा निर्णयप्रस्तावातील त्रुटींची दुरुस्ती केलेल्या १३५ शाळा व ६६९ तुकड्यांना दरवर्षी (१०० टक्के होईपर्यंत) ५०.०९ कोटींचे अनुदानत्रुटींची पूर्तता केलेल्या २८४ शाळा व ७५८ तुकड्यांना २० टक्क्यावरून ४० टक्के (दरवर्षी ५५.५१ कोटी) अनुदान२० टक्क्यांवरील २२८ शाळा व दोन हजार ६५० तुकड्यांना दरवर्षी २५०.१३ कोटींचे अनुदान (४० टक्के)४० टक्क्यांवरून ६० टक्के अनुदानावर आलेल्या २००९ शाळा तर चार हजार १११ तुकड्यांना दरवर्षी मिळणार ३७५.८४ कोटी रुपयेदहा वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेतील ७७१ शाळा व सात हजार ३८३ तुकड्यांना सरसकट २० टक्के (दरवर्षी ४२९.३१ कोटी) अनुदानशिक्षणाधिकाऱ्यांच्या हाती अंतिम निर्णयप्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अनुदानाचा वाढीव टप्प्यास पात्र ठरलेल्या शाळांचे प्रस्ताव मागवून घेतले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ‘माध्यमिक’च्या २२ शाळा व १३२ तुकड्यांना आणि खासगी ‘प्राथमिक’च्या १० शाळा व २५ तुकड्यांना पहिल्यांदाच २० टक्के अनुदान मिळणार आहे. तर ‘माध्यमिक’च्या २१४ शाळा तर ‘प्राथमिक’च्या ४१ शाळांना ४० आणि ६० टक्के अनुदानाचा टप्पा मिळणार आहे. संबंधित शाळांना शिक्षणाधिकारीच अनुदान मंजूर झाल्याचा आदेश देणार आहेत. दुसरे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांकडून वेतन अधीक्षकांना पाठवले जाणार असून त्यानंतर शिक्षकांना दरमहा वाढीव वेतन मिळणार आहे.

राज्य सरकारच कांदाउत्पादक शेतकर्‍यांना 350 रुपयांचं अनुदान जाहीर. अटी काय, कुठे अर्ज करायचा, वाचा सविस्तर माहिती.


मुंबई (प्रतिनिधी) कांद्याचे दर घसरल्यानं राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. विरोधकांनी राज्य सरकारकडे कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल 500 रुपयांचं अनुदान देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारनं कांदा उत्पादक शेतकर्‍यांना 350 रुपयांचं अनुदान जाहीर केलं होतं. राज्य सरकारनं कांदा उत्पादकांना 350 रुपयांचं अनुदान देण्यासाठी प्रक्रिया जाहीर केली आहे. 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत कांदा विक्री करणार्‍या एका शेतकर्‍याला 200 क्विंटल कांद्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

 

अटी काय ?

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना रुपये 350 प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. ज्या शेतकर्‍यांनी लेट खरीप हंगामातील लाल कांदा दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार समितीमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडून लेट खरीप कांदा खरेदीकरीता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रांमध्ये विक्री केली असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. परराज्यातून आवक झालेल्या आणि व्यापार्‍यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू राहणार नाही. 350 रुपयांचं अनुदान थेट बँक हस्तांतरणद्वारे शेतकर्‍यांच्या बचत बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. कांद्यासाठी देण्यात येणारं अनुदान आयसीआयसीआय बँकेमार्फत वितरित करण्यात येणार आहे.

अर्ज कुठं करायचा ?

कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी कांदा विक्री पट्टी/ विक्री पावती, 7/12 चा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांक इ. सह साध्या कागदावर ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केलेली आहे तेथे अर्ज करावा.

बाजार समित्यांवर जबाबदारी

शेतकर्‍यांना अनुदान प्राप्त करुन देण्याचे प्रस्ताव हे संबंधित बाजार समितीने तयार करावेत. प्रस्ताव तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीवर असेल. हे प्रस्ताव तालुका सहाय्यक निबंधक यांनी तपासून ते जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेकडे सादर करावेत. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी योग्य प्रस्तावांना मंजूरी दिल्यानंतर, ती यादी पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना मान्यतेसाठी सादर करण्यात येतील. त्यांनी तपासून अंतिम केलेल्या यादीला पणन विभागामार्फत थेट लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यावर निधी वितरीत करण्यात येणार आहे.

यांना मिळणार मदत ?

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार समित्यांमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकर्‍यांना रुपये 350 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंकेंच्या पीएला अटक. भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला प्रकरण.


*महादेव सोळुंके याच्या अटकेमुळे आ. सोळंके यांच्या अडचणीत वाढ झाली असून ते आता पोलिसांच्या रडारवर आहेत.

माजलगाव (प्रतिनिधी): येथील भाजपाचे कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणात येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहाय्यक महादेव सोळंके यास पोलिसांनी केज येथे चौकशीला बोलावून अटक करून माजलगाव पोलीस ठाण्यात आनण्यात आले. या अटकेमुळे आता आ. प्रकाश सोळंके पोलिसांच्या रडारवर येऊ शकतात.

येथील भाजपाचे कार्यकर्ते अशोक शेजुळ यांनी आ. प्रकाश सोळुंके , त्यांच्या पत्नी मंगला प्रकाश सोळंके , उद्योगपती रामेश्वर टवाणी यांच्या विरोधात विविध संस्थेत केलेल्या भ्रष्टाचारा विरोधात न्यायालयात ३ मार्च रोजी जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर ७ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी अशोक शेजुळ यांच्यावर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात पाच जणांनी हल्ला केला होता. यात शेजुळ गंभीर जखमी झाले होते. शेजुळ यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात आ. सोळंके पती-पत्नीवर ३०७ चा गुन्हा दाखल झाला होता.

यातील पाच आरोपींना पोलिसांनी चार ते पाच दिवसात अटक केली होती. त्यानंतर पोलीस सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांनी आमदार सोळंके पती-पत्नी सह १० ते १२ जणांची कसून चौकशी केली होती. यात आमदार प्रकाश सोळंके यांचे स्विय सहाय्यक महादेव सोळंके यास मंगळवार रोजी दुपारी तपास कामी बोलावले असता या मारहाण प्रकरणात महादेव सोळंके यांनी कबूल केल्याचे उघड होताच त्यास ५ वाजता केज येथे अटक करून माजलगाव शहर पोलिसात रात्री उशिरा आणण्यात आले. महादेव सोळुंके याच्या अटकेमुळे आ. सोळंके यांच्या अडचणीत वाढ झाली असून ते आता पोलिसांच्या रडारवर आहेत.

Tuesday, March 28, 2023

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता :- आ.जयंत पाटील

पाचोरा (प्रतिनिधी) सुप्रीम कोर्टाचा योग्य निकाल आल्यास राज्य सरकार कोसळू शकते, परंतु मध्यावधी निवडणुकाऐवजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता अधिक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी पाचोरा येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
सध्याचे सरकार हे निवडणुकांना घाबरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व निवडणुका जास्तीत जास्त पुढे कशा ढकलता येतील, याचाच प्रयत्न सुरू आहे.
बाजार समितीच्या निवडणुका पक्ष म्हणून लढवल्या जात नाही, तर कार्यकर्ता ती निवडणूक लढत असतो आणि इतर निवडणुकीमध्ये मात्र सर्वांना सोबत घेऊन निवडणुका लढाव्यात ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. असे असले तरी परिस्थितीनुरूप स्थानिक जिल्हाध्यक्ष आणि नेत्यांना त्या संदर्भातील अधिकार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे, म्हणून भाजपकडून धार्मिक भावना भडकवण्याचे काम सुरू आहे. तर देशात कुठल्या घोषणा दिल्या जातील किंवा कोणी काय बोलावे, याचा देखील निर्णय कोर्टच द्यायला लागलं असल्यामुळे आता बोलण्याचीदेखील सोय राहिली नाही, अशा मार्मिक टीका त्यांनी शिंदे भाजप सरकारवर केली.

चंद्रपूर जिल्हाच्या पत्रकार स्नेहा मडावी यांना महिला सन्मान पुरस्कार. आभिनेत्री गायिका मोनल कडलक यांच्या हस्ते प्रदान.

 मुंबई (प्रतिनिधी) त्यागमूर्ती माता रमाई 125व्या जयंती निमित्त आंबेडकरी युकांच्या वतीने  चेंबूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला मेळावा मध्ये पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना महिला सन्मान पुरष्कार कलर्स मराठी चैनल अभिनेत्री गायिका मोनल कडलक यांच्या हस्ते देण्यात आले महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून महिला आल्या होत्या माता रमाई 125 जयंती निमित्त 125 महिलांचा सन्मान करण्यात आले त्यामध्ये स्नेहा उत्तम मडावी चंद्रपूरचे निर्भीड पत्रकार गरिबांना न्याय मिळून देणारी आपल्या लेखणीतून अनेक कलाकारांना प्रसिद्धी निस्वार्थी पणे काम करत असतात महिलांना न्याय मिळून देत असतात  मुंबई मध्ये चेंबूर येथे  कार्यक्रम पार पडला. 
उपस्थित प्रमुख पाहुणे प्राध्यापक जयाताई बनसोडे अभिनेत्री मोनल कडलक वृषालीताई कांबळे. विशाल कांबळे गायकवाड. प्रदीप अधांगळे रमेश भोसले नरेंद्र शिरसाठ संदीप जाधव. लिहिणार, सुरेश येडे, प्रतीक, डॉ. आशिष तांबे, विजय थोरात, सुरेश धाडी, अविनाश गरुड समन्वयक विक्की शिनगारे,
यांनी कार्यक्रम चे आयोजन केले आहे पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना पुढच्या वाटचलीस खूप खूप शुभेच्छा