बीड (प्रतिनिधी): ग्रामीण आरोग्य यंत्रणा सध्या औषधांविना आजारी पडली आहे. मागील पाच ते सहा महिन्यांपासून औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. खोकल्यावरील औषधाची एकही बाटली नाही. जिल्हा नियोजन समितीने निधी देऊनही अद्याप खरेदी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. एखादा बळी गेल्यावर औषधी येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्हा नियोजन समितीने ४ कोटी रुपयांचा निधी औषधांसाठी दिला. याची प्रक्रिया आठ महिन्यांपूर्वी झाली होती; परंतु मुंबईचा नियोजन विभाग व स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने अद्यापही याबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही. आरोग्य विभागाकडून केवळ तांत्रिक अडचणी असल्याचे कारण सांगत हात झटकले जात आहेत.
या औषधींचा तुटवडा सर्दी, ताप, खोकला आदींची एकही गोळी नाही. कुत्र्याची लस, ॲसिडिटीची गोळी, लहान लेकरांसाठी आवश्यक असणारी औषधे व गोळ्या नाहीत. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियासाठीचे प्रोमिथीयाझीन, पेन्टाझीशीन हे इंजेक्शनही नाही. जखम झाली तर पट्टी करण्यासाठी ड्रेसिंग मटेरियलपण नाही.
वास्तव
औषधांच्या तुटवड्याबाबत वारंवार वास्तव मांडलेले आहे. सरकारी रुग्णालयात केवळ तपासणी केली जात असून, औषधे मात्र खासगी मेडिकलवरून खरेदी करावे लागत आहेत.
No comments:
Post a Comment