Sunday, March 26, 2023

पोलीस तपासात धक्कादायक माहिती. तु काळी आहेस..लग्न करून फसलो ! म्हणत विवाहितेचा मारहाण करून खुन.

माजलगाव (प्रतिनिधी) : तू काळी आहेस, लग्न करून फसलो, तुझ्या घरच्यांनी फसवले.. असे म्हणत बेदम मारहाण करत विवाहितेचा खून करण्यात आला. ही धक्कादायक अन्‌ संतापजनक घटना बीडच्या  माजलगावमध्ये घडली. पोलीस तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पंधरा दिवसानंतर सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल झाला आहे. 
माजलगाव शहरातील फुलेंनागर भागात राहणाऱ्या रफिक शेख याचा विवाह मयत बानोबी शेख हिच्याशी झाला होता. लग्नानंतर सातत्याने बानोबी हिला पती, सासू व इतर लोक त्रास देत होते. दिवसभर काम करून घेतल्यानंतर देखील तिला जेवायला दिले जात नव्हते. याबाबत मयत बानोबी यांनी अनेकवेळा आपल्या माहेरच्या लोकांना सांगितले होते.

नैसर्गिक मृत्‍यूचा केला बनाव

दरम्यान पतीसह सासऱ्याच्या मंडळींनी ६ मार्च रोजी बानोबीला बेदम मारहाण केली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. मात्र तिचा मृत्यू हा एक नैसर्गिक मृत्यू असल्याचे पती व इतरांनी तिच्या माहेरच्या लोकांना सांगितले. मयत बानोबीचा भाऊ सय्यद तारेख याने संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन केले आणि धक्कादायक माहिती समोर आली. बानोबी हिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पती रफिक यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

No comments:

Post a Comment