Sunday, March 26, 2023

श्री मंगलनाथ मल्टीस्टेटच्या, परळी वै.गांधी मार्केट शाखेचा भव्य शुभारंभ.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील श्री मंगलनाथ मल्टीस्टेट संस्थेच्या विस्तारित (CSP) शाखेचा शुभारंभ हालगे गल्ली, गांधी मार्केट येथे गुढीपाडव्याचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष श्री आर जी कानडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. 
 मागील दहा वर्षांपासून परळी येथील खातेदांराच्या सेवेत कायम उत्कृष्ठ सेवा, आकर्षक व्याजदर व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारी परळी वैजनाथ येथील शाखा ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. एकूणच संस्था १००० कोटींचा दमदार व्यवसाय करण्याकडे वाटचाल करत असताना परळी वै. येथील शाखेचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे संस्थेच्या विस्तारित शाखेचा शुभारंभ करण्यात आला असता परळी वै. येथील सर्व स्तरातील व्यापारी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी मुख्य कार्यालय माजलगाव येथून संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र कानडे व सर्व संचालक मंडळ सभासद उपस्थित होते. शेवटी, नूतन शाखाधिकारी श्री गजानन हालगे  यांनी उपस्थितांचे मनापासून आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment