देशात H3N2 चे संक्रमण वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये H3N2 चे रूग्ण आढळून येत आहेत. यामुळे राज्याची आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट झालेली आहे. याच अनुषंगाने बीड जिल्ह्यात देखील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. जिल्ह्यात अद्याप रूग्ण आढळून आले नसले तरी संक्रमण रोखण्यासाठी यंत्रण सज्ज झाली आहे.
स्वॅब कलेक्ट केंद्र सुरू
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी आजपासून जिल्हा रुग्णालयात H3N2 च्या संशयित रुग्णांसाठी स्वॅब कलेक्ट केंद्र सुरू केले आहे. तर याच पार्श्वभूमीवर डॉ. साबळे यांनी जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती केली आहे. दरम्यान कोरोनाचे आणि स्वॅब H3N2चे लक्षण जवळपास सारखेच आहेत.
No comments:
Post a Comment