याबाबत अधिक माहिती अशी की, एका टेम्पोमध्ये ( एच आर 69 डी 2302) राज्यात बंदी असलेला राजनिवास गुटख्याचा माल परळी - गंगाखेड रोडवर उतरवला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या पथकाने गंगाखेड रोडवर मध्यरात्री सव्वाबारा वाजता छापा मारला.
यावेळी अंधाराचा फायदा घेत पिकअप टेम्पो आणि माल उतरून घेणारे फरार झाले. दरम्यान, पोलिसांनी मध्यप्रदेशहून आलेल्या टेम्पोची तपासणी केली. यावेळी चालक साबेर सौंदाना सुन्नी ( रा. सुनेडा तालुका पुनाना राज्य हरियाणा ) याने गुटखा आणि पानमसाला इंदूर येथून आणल्याचे सांगितले. पोलिसांना गुटख्याचे 69 मोठे पोते व सुगंधी तंबाखूचे 14 मोठे पोते असा एकूण 33 लाख 21 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल आढळून आला. गुटखा आणि टेम्पो असा एकूण 51 लाख 36 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला
या प्रकरणी आठ आरोपी विरोधात सहाय्यक फौजदार मुकुंद शामराव ढाकणे यांचे फिर्यादी वरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे, जमादार बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, बालाजी दराडे, दिलीप गीते, विकास चोपणे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment