Sunday, March 19, 2023

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख. श्री.धोंडूदादा पाटील,सहसंपर्क प्रमुख.श्री बाळासाहेब अंबुरे, जिल्हाप्रमुख.श्री.आप्पासाहेब जाधव जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी केले परदेशी परिवाराचे सांत्वन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील उपजिल्हा रुगणालयातील सेवानिवृत्त कर्मचारी जगदीश लालाजी परदेशी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी निधन झाले. शिवसेनेचे सर्व परिचित कार्यकर्ते युवासेना परळी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, बंधू राधेश्याम परदेशी आणि प्रकाश परदेशी यांचे ते वडील होते.आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  बीड जिल्हा संपर्कप्रमुख श्री धोंडूदादा पाटील, सह संपर्कप्रमुख श्री बाळासाहेब अंबुरे, जिल्हाप्रमुख श्री आप्पासाहेब जाधव, जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनीघरी जाऊन परदेशी परिवाराचे सांत्वन  केले बसवेश्वर कॉलनी भागातील रहिवाशी तथा उप जिल्हा रुग्णालयातील सेवानिवृत्त कर्मचारी जगदीश लालाजी परदेशी यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त करीत आहेत धोंडूदादा पाटील यांनी परदेशी परिवाराचे सांत्वन केले यावेळी सोबत उप जिल्हाप्रमुख श्री अभयकुमार ठक्कर, युवासेना जिल्हा समन्वयक श्री अतुल दुबे, माजी उप शहर प्रमुख सतिष जगताप उप शहरप्रमुख किशन बुंदेले, सुरेश परदेशी योगेश घेवारे शिवसैनिक दिसत आहेत.

No comments:

Post a Comment