Monday, March 20, 2023

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ संपन्न.कौशल्य शिक्षण काळाची गरज -डॉ. नरेंद्र काळे

परळी वैजनाथ ( प्रतिनिधी) येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्वामी विवेकानंद महाविद्यालया त वर्ष 2020- 21 मध्ये उत्तीर्ण झालेल्या पदवीधरांचा पदवी वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. नरेंद्र काळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी पदवीधारकांनी महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच कौशल्य प्राप्त शिक्षण घेणे आजच्या काळाची गरज आहे, असे उद्गगार काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य उत्तमरावजी देशमुख होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. मुंजाभाऊ धोंडगे, डॉ. पी एल कराड, प्राचार्या डॉ. वनमाला गुंडरे, प्राचार्य एस पी देशमुख, मुख्याध्यापक डी जी शिंदे,श्री अजय सोळंके ,महापारेषण चे पवार साहेब आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. मुंजाभाऊ धोंडगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पदवीधारकांनी पदवीचा सन्मान करावा असे त्यांनी म्हटले.
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. वनमाला गुंडरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. श्रीहरी गुट्टे तर आभार डॉ. एल आर मुंडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांची व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

No comments:

Post a Comment