लातूर (प्रतिनिधी) : दारू आणि मटणसाठी लाच घेतल्याप्रकरणी एसीबीच्या पथकाने लातूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याला अडीच हजार रुपये घेताना पकडले. ही कारवाई एसीबीच्या पथकाने मंगळवारी केली.
चार महिन्यांचा पगार काढण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून पेन्शनची फाईल नागपूर कार्यालयात पडताळणीसाठी पासवर्ड देऊन लवकर पाठविण्यासाठी लातूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याने अडीच हजारांची लाच तक्रारादारास मागितली हाेती.
या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यामध्ये डायटचा प्राचार्य राजेंद्र नेपाळबुवा गिरी हा अडीच हजारांची लाच घेताना एसीबीच्या सापळ्यात अलगद अडकला. याबाबत लातूर येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment