Monday, March 30, 2020

वृंदावन, काशी, मथुरा येथून परतलेल्या भाविकांची उपजिल्हा रुग्णालयाकडून तपासणी.

* कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचा डाॅक्टरांचा निर्वाळा.

परळी वैजनाथ दि. 30…
परळी शहर व तालुक्या तील 93 भावीक (यात्रेकरू) वृंदावन, काशी, मथुरा (उत्तर प्रदेश) येथून आज दि. 30 मार्च रोजी शहरात दाखल झाले. सर्वांची परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली असून कुणातही कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. रामेश्वर लटपटे यांनी सांगितले. यामुळे परळीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परळी तालुक्यातील सुमारे 93 भावीक उत्तर प्रदेशात लाॅक डाऊनमुळे आडकुन पडले होते. शासकीय, राजकीय प्रयत्नानंतर सर्व यात्रेकरू आज सकाळी परळी शहरात दाखल झाले. सदरिल सर्व 93 व्यक्तींची संशयित कोरोना आजारा संदर्भात आरोग्य तपासणी परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ. रामेश्वर लटपटे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डाॅ. वैभव दुबे, डाॅ. व्यंकटेश तिडके व रूग्णालयातील इतर आरोग्य कर्मचारी यांच्याकडुन करण्यात आली आहे.
या संपुर्ण 93 लोकांना कोरोना रोगाची कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळली नाहीत. पण हे सर्व लोक कोरोना प्रादुर्भाव झालेल्या भागातून आले असल्या मुळे ह्या सर्वांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परळी ग्रामीण पोलिस स्टेशनच्या जवळील वैद्यनाथ भक्त निवास येथे क्वारांटाईन म्हणून ठेवण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर लटपटे यांनी सांगितले. दरम्यान या यात्रेकरूंमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याने परळीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment