परळी वैजनाथ ;- ( प्रतिनीधी ) दि ११फाल्गुन शुद्ध द्वितीया हा दिवस संत श्री तुकाराम महाराजांची बीज अर्थात् त्यांचा वैकुंठगमन सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .
संत श्री तुकाराम महाराजांची वाङ्मयकृती अर्थात् त्यांची अभंग गाथा या त्यांच्या साहित्यकृतीचा अभ्यास विद्यापीठीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर केला जातो अनेक अभ्यासकांनी त्यांच्या गाथेवर पीएच.डी.चे प्रबंधही लिहिले आहेत .विदेशी अभ्यासकांनाही या अभंगवाङ्मयाने वेड लावले आहे . या दिनाचे औचित्य साधून येथील कै .लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालयातील मराठी विभागात संतवाङ्मयाचे थोर अभ्यासक नवगण महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. राजाभाऊ धायगुडे यांचे व्याख्यान आयोजित केले होते . महाविद्यालयाच्या प्राचार्या.डाॅ.आर.जे.परळीकर यांच्या प्रेरणेने आयोजित या व्याख्यान सत्रात त्यांनी श्री तुकाराम महाराजांच्या अभंगवाङ्मयाचे यथार्थ दर्शन विद्यार्थ्यांना घडविले .
सत्य असत्याशी मन केले ग्वाही I मानियेले नाही बहुमता ॥
वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे ..
अशा अनेक अभंगाचे अभ्यासपूर्ण विवरण विद्यार्थ्यांना आनंद देऊन गेले .
या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून प्रा अरुण च०हाण हे होते तर प्रा . खोडके सर यांचीही विशेष उपस्थिती होती . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख प्रा . डॉ .राजकुमार यल्लावाड यांनी केले . या कार्यक्रमास महाविद्यालया तील सर्व विद्यार्थिनी व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपास्थित होते .
No comments:
Post a Comment