परळी वैजनाथ ;-परळी नगर परिषदेच्या मौलाना आझाद चौक परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीची शहरात येणाऱ्या पाईपलाईन फुटुन लाखो लिटर पाणी रस्त्यावर आल्याने चौकाला तळ्याचे स्वरुप आले आहे.परळी अंबाजोगाईला जाणाऱ्या रस्ता मौलाना आझाद चौक येथे परळी शहराला पाणी पुरवढा करणारी पाईपलाईन आज सकाळी अचानक फुटली असुन लाखो लिटर पाणी वाया जात आहे परळी नगर परिषदेच्या पाणी पुरवढा विभागाने त्वरित लक्ष जर नाही दिले तर लवकरच शहरावर पाण्याच संकट ओडावले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान गेल्यावर्षी ज्याप्रमाणात शहरात पाणीपुरवठा विभागाचे काम उल्लेखनीय होते शहरात युद्ध पातळीवर नविन पाईपलाईन टाकने,नविन पाण्याची टाकी उभा करणे,टॕंक्करच्या साहाय्याने पाणी पुरवठा करणे अदि कामे युद्ध पातळीवर करण्यात आली माञ यावर्षी कामाची गती मंद किंवा बंद दिसुन येत आहे .ब-याच भागात पाईपलाईन अंतरुन ठेवली ते अद्याप मेनलाईनशी जोडल्या गेल्या नाहीत या जोडल्याच जातील का नाही हा प्रश्न परळीच्या नागारीकात निर्माण झाला आहे.
No comments:
Post a Comment