Tuesday, November 3, 2020

महाराष्ट्र शासनाकडे अतिवृष्टीचा परळी तालुक्याचा खोटा अहवाला संदर्भात तक्रार दाखल करणार वसंत मुंडे .

 
परळी वैजनाथ (प्रतिनीधी)देशामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.  अगोदरच कोरोना अतिवृष्टीमुळे तसेच बाजारपेठेचे भावाचे चढ-उतार शासनाचे  असहकार्य धोरण मुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टी बीड जिल्हा अंतर्गत अंबाजोगाई ,परळी, केज तालुके हे कसे काय निरंक म्हणून दाखवले आहे .यास तहसीलदार गटविकास अधिकारी पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी यांची समिती द्वारे अतिवृष्टीमुळे  नैसर्गिक आपत्तीमुळे  नुकसानी संदर्भात  शेतकऱ्याच्या पिकाबाबत अहवाल सादर केला जातो .त्यावर शासनाकडे नुकसानीचा अहवाल दिल्यावर आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन कडून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देण्यासंदर्भात राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एन डी आर एफ )या निकषावर निर्णय घेतला जातो अशी माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी दिली आहे. जे कोणी अधिकारी चुकीचा रिपोर्ट अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकासंदर्भात सादर केलेला आहे त्यांची तक्रार महाराष्ट्र शासनाकडे करून कार्यवाही साठी पाठपुरावा करणार असे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी सांगितले कारण माहे ऑक्टोबर 2020 शेती पिकाच्या नुकसानी साठी मदत विवरण पत्र 5 मध्ये परळी-वैद्यनाथ तालुक्यात ते 33टक्के पेक्षा जास्त अधिक नुकसान झाले एकूण क्षेत्र 30092 हेक्टर असून शेतकरी संख्या 406 57 आहे .तसेच शेती पिके कोरड वाहू प्रति हेक्टर 6800 दोन हेक्‍टरपर्यंत मर्यादा असून रक्कम 2045 .37 कोटी रुपये आहे व बहुवार्षिक पिके क्षेत्र 12.7 शेतकरी संख्या 13500 व 1. 71 हेक्टर  एकूण अनुदान 2047.08  आवश्यक अनुदान हा अहवाल शासनाकडे दिलेला आहे तो खोटा आहे का असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला आहे .महा विकास आघाडी सरकारने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहे त्यांना दोन हेक्टर पर्यंत मदत करण्याची घोषणा केली परंतु  जिल्ह्यांतर्गत राजकारण सुरू झाले व शेतकरी बळीचा बकरा झाला आहे शासनाकडे ऑक्‍टोबरमध्ये अहवाल विवरणपत्र ड आणि अ नुकसानभरपाईचा देण्यात आला नंतर ऑक्टोंबर मध्येच विवरणपत्र 5 अ विवरणपत्र 5 ब परळीच्या शेतकऱ्याला मदत करता येत नाही असे निरंक दाखवले कोणी याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे  यांनी महाराष्ट्र शासनाकडे करणार असल्याचे सांगितले. प्रपत्र अ व ड मध्ये ते 33 टक्के परळी तालुक्यामध्ये नुकसान झाल्याचा अहवाल दर्शवला ऑक्टोंबर मध्येच 5 अ व ब मध्ये खोटा अहवाल कोणी तयार केला याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस चे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी  केली आहे.

No comments:

Post a Comment