या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार आहे.प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. वेळोवेळी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत व शिक्षकांच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी
.
Monday, November 30, 2020
आनंदवन चे समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात डाॕ.शितल आमटे यांची आत्महात्या.
पदवीधर निवडणूक मतदानामुळे 10 वी,12 वी परीक्षा केंद्रात तात्पुरता बदल - मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार.
Sunday, November 29, 2020
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार.
महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे अनुयायांनी येऊ नये; विविध आंबेडकरी संघटनांचे एकमताने आवाहन.
Saturday, November 28, 2020
वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन.
Wednesday, November 25, 2020
काँग्रेसचे जेष्ठ नेते आणी सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे कोरोनामुळे निधन.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.
अहमद पटेल यांच्या निधनाचं वृत्त कळताच काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “अहमद पटेल पक्षाचा एक स्तंभ होते. ते संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये जगले. जेव्हा काँग्रेस पक्ष खडतर काळातून जात होता, तेव्हाही ते पक्षासोबत उभे राहिले. ते एखाद्या मौल्यवान संपत्तीसारखे होते. आम्हाला सदैव त्यांची उणीव जाणवत राहिल. या दुःखाच्या प्रसंगी फैजल, मुमताज आणि संपूर्ण कुटुंबासोबत माझ्या सहवेदना आहेत,” असं राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मतदान करताना मतदारांनी जांभळ्या रंगाच्या पेनने पंसती क्रमांक टाकुन मतदान करावे ;- सौ.वर्षा मगर
Tuesday, November 24, 2020
बीड भाजपात ‘आधे इधर आधे उधर, बोराळकर किधर ’?’ आ.सतिश चव्हाणांसाठी मुख्यमंत्र्यांपासून आघाडीचे सर्वच नेते सक्रिय.
बीड (प्रतिनीधी )- मराठवाडा पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना भाजपातील बंडखोरीमुळे बीड जिल्ह्यात भाजपाचे नेते, कार्यकर्ते ‘आधे इधर आधे उधर’ झाल्याचे दिसून येत असल्याने बोराळकर किधर? हा प्रश्न उपस्तित होत असतानाच दुसरीकडे आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणांची प्रचार यंत्रणा मात्र ७८ तालुक्यात तळ ठोकून असल्याने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह आघाडीच्या सर्वच पक्षातील नेते या निवडणूक प्रचारात सक्रिय झाल्याने चव्हाणांना ही निवडणूक सोपी जात असल्याचे चित्र सध्या दिसून बंडखोर पोकळेंमुळे भाजपा उमेदवाराची आणि नेतृत्वाची डोकेदुखी मात्र प्रचंड वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
भाजपाच्या अंतर्गत बंडाळीमुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मराठवाडा शिक्षक पदवीधर मतदारसंघात बोराळकर हेच आपले उमेदवार अहोत हे सांगण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना तालुक्या तालुक्यात जावून लोकांना सांगावे लागत आहे. बंडखोर रमेश पोकळे यांच्यावर कारवाई का करण्यात येत नाही या प्रश्नाचे उत्तर पक्षश्रेष्ठीवर ढकलण्यात येत असल्याने भाजपा समर्थक आजही नेमके कुठल्या उमेदवाराला मतदान करायचे या मन:स्थितीत आहेत. बीड जिल्ह्यात तर पंकजा मुंडे यांचे अनेक समर्थक कार्यकर्ते, स्थानिक पातळीवरील नेते हे उघडपणे बंडखोर नेते रमेश पोकळेंच्या सोबत दिसून येत आहेत. त्यामुळे बीड भाजपात आधे इधर आधे उधर बोराळकर किधर? हा प्रश्न विचारण्यात येऊ लागला आहे. पंकजा मुंडे दोन दिवसांपासून मराठवाड्यात ठिकठिकाणी बोराळकरांसाठी मत मागत असल्या तरी त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते रमेश पोकळेंकडेही दिसून येत आहेत. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातही भाजपा उमेदवारात गोंधळ कायम आहे. दुसरीकडे मात्र आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना ही निवडणूक सोपी असताना त्यांनी प्रचार यंत्रणेत कसलीही कुचराई न ठेवता मतदारसंघातल्या ७८ तालुक्यात संपर्क ठेवल्याचे दिसून येत आहे. आघाडीमधील शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे तालुका, जिल्हास्तरावरील नेतेच नव्हे तर राज्यपातळीवरील नेतेही चव्हाणांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा व्हिडिओही सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्या व्हिडिओमधून मुख्यमंत्र्यांनी सतीश चव्हाणांच्या आजपर्यंतच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यामुळे आघाडीचे सर्वच नेते चव्हाणांना निवडून आणण्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात स्वत: उमेदवार असल्यागत मतदारांपर्यंत जात आहेत
अनलॉकमध्ये लग्नांचा धुमधडाका ना सोशल डिस्टन्स ना मास्क.
बीड (प्रतिनीधी )- कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना लग्नाला केवळ ५० नागरिकांची उपस्थिती होती मात्र अनलॉक होताच लग्नांचा धुमधडाका सुरू झाला असून आता कोरोना संपलाच आहे, असे वागत लग्नाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थिती लावत आहेत. या वेळी कुठलाही सोशल डिस्टन्स पाळला जात नाही, नवरदेवासह एकाही वराडाच्या तोंडाला मास्क लावलेले दिसून येत नाही. त्यामुळे कोरोनाची लाट नव्हे तर त्सुनामीच येऊ शकते, आजपर्यंत बीड जिल्ह्यात १५ हजार १८६ जण पॉझिटिव्ह आले असून पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ४८० जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा टक्काही झपाट्याने वाढला आहे.
कोरोनाचे संकट गंभीर असताना केवळ विरोधाला विरोध म्हणून काही जण हे उघडा ते उघडा म्हणत आहेत मात्र कोरोनाची दुसरी लाट यायला वेळ लागणार नाही. दिवाळीच्या खरेदीत नागरिकांसह व्यापार्यांनी कोरोनाच्या नियमाला धाब्यावर बसवून आपला व्यवसाय केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठा संसर्ग होण्याचा धोका आहे. आजही सार्वजनिक कार्यक्रमात कसलाही सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझरचा वापर होत नाही. लग्न समारंभाला कुठलीही परवानगी न घेता हजारो वर्हाडी उपस्तिती लावत आहेत. लग्नसमारंभात सॅनिटायझर मास्कचा वापर होत नाही.
आजपर्यंत बीड जिल्ह्यात १५ हजार १८६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यापैकी १४ हजार १५० जणांनी कोरोनावर मात केलेली आहे. यामध्ये ४८० जणांचा मृत्यू झाला असून गेल्या दोन दिवसांपासून शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने शिक्षकांच्या टेस्ट घेतल्या आहेत. आतापर्यंत एकूण ४ हजार ४२२ शिक्षकांच्या तपासण्या झाल्या असून त्यापैकी ४४ शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर ८२६ शिक्षकांचे अहवाल येणे बाकी आहे. अजूनही अनेक शिक्षकांच्या टेस्ट राहिल्या असून त्या घेण्याचे काम आरोग्य विभाग करत आहे.
धक्कादायक पाटबंधारा विभागात शेतकर्याने जाळून घेतले.
बीड (प्रतिनीधी ) पाटबंधारा विभागाकडून आपल्याला न्याय मिळत नसल्याने एका निराश शेतकर्याने कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली. जखमी अवस्थेत शेतकर्याला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. शेतकर्याने यापूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेतली नसल्याने शेतकर्याने आज हे टोकाचे पाऊल उचलले.
बीड तालुक्यातील पाली येथील अर्जून कुंडलिकराव साळुंके या शेतकर्याची जमीन पाटबंधारा विभागाने संपादीत केलेली आहे. या जमिनीच्या एकत्रीकरणाबाबतचा वाद आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी पाटबंधारा विभाग कार्यालयाचे उंबरे झिजवत आहे. कार्यालयाकडून न्याय मिळत नसल्याने सदरील शेतकर्याने गेल्या काही महिन्यापूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र याची दखल संबंधीत विभागाने घेतली नाही. आज दुपारी शेतकर्याने कार्यालयात पेट्रोल ओतून घेत जाळून घेतले. या घटनेने एकच खळबळ उडाली. शेतकर्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
रब्बी पिकांचा विमा उतरवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन.
बीड जिल्हयातील सरपंच पदे आरक्षणाची अधिसूचना जारी.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत जयसिंगराव गायकवाड करणार राष्ट्रवादीत प्रवेश.
बीड – मराठवाड्यातला भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागला आहे. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. नुकताच गायकवाड यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. एकनाथ खडसे यांच्यानंतर आणखी एक भाजपचा नेता राष्ट्रवादीच्या गळाला आहे.
जयसिंगराव गायकवाड यांनी सुरुवातीपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणायचा असेल तर मला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरून ‘प्रयोग थांबवा, काकांना उमेदवारी द्या’ अशी मागणी केली जात होती. परंतु भाजपनं त्यांना उमेदवारी दिली नाही.भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे गायकवाडांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी गायकवाडांनी उमेदवारी मागे घेतलीच, परंतु भाजपलाही सोडचिठ्ठी दिली.त्यानंतर आता गायकवाड राष्ट्रवादीच्या गोटात जाणार आहेत
महाआघाडी जातीवादी सरकारचा जाहीर निषेध.चैत्यभूमि ला अभिवादन करण्यास जाणारच आरपीआय डेमोक्रॅटिक चा इशारा.
Monday, November 23, 2020
महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा, चैत्यभूमीवर गर्दी नको.- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुंबई, दि. 23 : महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ठेवून अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
सहा डिसेंबर रोजीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.
महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही सहा डिसेंबर रोजी अनुयायांनी अभिवादनासाठी मुंबईत येऊ नये असे आवाहन केले आहे. या भूमिकेचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वागत केले. समितीने चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांबाबत संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले. त्यानुसार महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधा यांचे नियोजन करण्यात येणार आहे.
या बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंह, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सचिव नागसेन कांबळे, समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सी. एल. थूल आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले दैवत आहे. आपण त्यांचे अनुयायी आहोत, त्यांच्या विचारांची प्रगल्भता कृतीतून दाखविण्याची ही वेळ आहे. बाबासाहेब आयुष्यभर अन्यायाच्या विरोधात संघर्ष करत राहिले. त्यांच्या अभिवादनाच्या कार्यक्रमात लोकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. कोविडचे संकट जाता जात नाही. ते संपले असे मानू नये. चैत्यभूमीवर गर्दी न करता डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी ज्या-ज्या काही गोष्टी करायच्या त्या सर्व केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ दिला जाणार नाही. यापूर्वीही आपण सर्व सणवार साधेपणाने साजरे केले आहेत. डॉ.बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण हा गांभीर्याने आणि अभिवादन करण्याचा प्रसंग आहे. त्यामुळे या कठीण काळात आपण जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नुकताच झालेला स्मृतिदिनही साधेपणानेच साजरा केला होता. त्यापूर्वी लाखोंच्या गर्दीच्या साक्षीने होणारी विठुरायाची पंढरीची वारीही साधेपणाने करावी लागली होती. याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, महापरिनिर्वाणदिनी गर्दी न करता, मोजक्यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्याचा महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचा निर्णय स्वागतार्ह असाच आहे. सरकार म्हणून आम्ही जबाबदारी घेतली आहे. पण आता अनुयायी म्हणून जबाबदारी घ्यावी लागेल. आपण बाबासाहेबांकडून प्रेरित होऊन समाजाला पुढे नेऊया. माझ्या आजोबांचे आणि डॉ. बाबासाहेब यांचे ऋणानुबंध होते. त्यांच्यामध्ये स्नेह होता. हे ऋणानुंबध आपण समाजापर्यंत नेऊया, असेही त्यांनी सांगितले.
गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने चांगली भूमिका घेतली आहे. आतापर्यंत सर्वधर्मीयांनी सणवार अत्यंत साधेपणाने साजरे केले आहेत. महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकट काळात तो साधेपणाने व्हावा. नियमांचे पालन केल्यास या संकटाला रोखता येणार आहे. अभिवादन आणि दर्शनासाठी गृह विभागासह सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. शेख यांच्यासह खासदार श्री. शेवाळे, आमदार श्री. सरवणकर, समन्वय समितीचे सचिव श्री. कांबळे, उपाध्यक्ष साळवे, डॉ. मुणगेकर आदींनीही सहभाग घेतला.मुख्य सचिव संजय कुमार यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने शासन-प्रशासन परिपूर्ण तयारी करेल, असे सांगून आभार मानले.
आ.सतीष चव्हाण यांच्या प्रचारार्थ परळी शहरात पदवीधरांची गृहभेट; मतदारांचा प्रतिसाद.
Sunday, November 22, 2020
राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजित कुडे यांच्या आंदोलनाला यश.
Friday, November 20, 2020
शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार-ना. प्रा.वर्षा गायकवाड
मुंबई –महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्य़ातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशा सुचना शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड दिल्या आहेत.
महाराष्ट्रत करोनाच्या संख्येत पुन्हा वाढ.मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा राज्य सरकार करणार बंद?
लॉकडाउननंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राजधानी दिल्लीत करोनाची लाट आली आहे. त्यामुळे करोना झपाट्यानं पसरत असून, दिल्लीपाठोपाठ मुंबईतही करोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. मुंबईतसह राज्यातही दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे. तसा विचार सुरू असल्याचं वृत्त इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
दिवाळीच्या आधीच दिल्लीत करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होण्यास सुरूवात झाली होती. गेल्या दहा दिवसांत दिल्लीत ६० हजार करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीबरोबरच मुंबईसह महाराष्ट्रातही रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन राज्य सरकार दिल्ली-मुंबई हवाई व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे. तसा विचारही राज्य सरकार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं राज्य सरकार असा निर्णय घेण्याची शक्यता आहे, असं सूत्रांनी म्हटलं आहे. मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्यासंदर्भातील आदेश महाराष्ट्र सरकारकडून लवकरच काढण्यात येतील, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत मागील २४ तासात तब्बल ७ हजार ५०० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. २८ ऑक्टोबरपासून दिल्लीत रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दिल्लीत सुरूवातीला एकाच दिवसा ५००० हजार रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर ११ नोव्हेंबरपर्यंत २४ तासात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येनं ८ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
महाराष्ट्रातही रुग्णसंख्येची उसळी
राज्यातही रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. मागील आठवड्यात दोन हजार ते तीन हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत होते. मागील दोन तीन दिवसांमध्ये रुग्णसंख्येनं उसळी घेतली आहे. १८ नोव्हेंबर रोजी राज्यात ५ हजार रुग्ण आढळून आले. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजीही ५ हजार ५३५ रुग्ण एक दिवसात आढळून आले.
तहसीलदारांच्या पथकावर वाळू माफियांचा हल्ला.चार कर्मचारी जखमी.
* बोरगाव बुद्रुक शिवारात घडली घटना. जिल्हाधिकार्यांनी दिली भेट.
गेवराई (प्रतिनीधी )- गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्राच्या हद्दीत अनाधिकृत वाळुचा उपसा सुरुच आहे. हा वाळु उपसा रोखण्यास महसूल आणि पोलिस प्रशासन अपयशी ठरत आहे. बोरगाव बुद्रुक शिवारात चोरट्या पद्धतीने वाळू उपसली जात असल्याची माहिती तहसीलदार यांना झाल्यानंतर तहसीलदाराच्या पथकाने त्या ठिकाणी जावून एका टिप्पर चालकास विचारपूस केली असता गाडीमध्ये आलेल्या काही लोकांनी पथकावर हल्ला केला. यात चार कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आज घटनास्थळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार भेट देणार असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली.
चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बोरगाव बुद्रुक शिवारातून अनाधिकृतपणे वाळुचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार खाडे यांना झाल्यानंतर ते व त्यांचे सहकारी मंडल अधिकारी अमोल कुरुळकर, तलाठी राजकुमार धारूरकर, कोतवाल योगेश शहाणे, शिवशंकर आतकरे, दीपक राठोड हे दाखल झाले. बोरगाव ते कुरणपिंप्री रस्त्यावर या पथकाला पांढर्या रंगाचा टिप्पर आढळून आला. या टिप्परला थांबवून त्यांनी चालकाशी विचारपूस केली तितक्यात पाठीमागून एक लाल रंगाची गाडी आली, जिचा क्र. एम.एच. 16 डी.झेड. 9701 असा होता. यातील लोकांनी पथकातील कर्मचार्यांना काठीने मारहाण केली. यामध्ये संजय शंकर नेवडे (वय 41), योगेश सुरेश शहाणे (वय 24), शिवशंकर सुरेश आतकरे (वय 26) आणि दिपक आसाराम राठोड (वय 37) यांना मारहाण केली. या मारहाणीत हे चौघे जण जखमी झाले असून या प्रकरणी संजय नेवडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती आज जिल्हाधिकारी राहूल रेखावार घटनास्थळी भेट देणार असल्याचे सांगण्यात आले
उर्जामंत्र्याला आरपीआय चा पँथर स्टाईल झटका देऊ. डॉ राजन माकणीकर.
अनाथ मुलांना प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी कार्यवाही सुरु.अनाथ मुलांच्या भविष्याच्या अडचणी होणार कमी.
पेन्शन धारकांसाठी आता पोस्टात हयातनामा देण्याची सुविधा.
ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार - राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान
Wednesday, November 18, 2020
गेवराई शहरातील दोन दिवसा पासुन बेपत्ता १७ वर्षी मुलीचा मृतदेह विहरीत आढळला.
गेवराई : (प्रतिनिधी) बीडच्या गेवराई शहरातुन मागील दोन दिवसां पासून १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती तीचा मृतदेह बुधवारी सकाळी विहीरीत आढळून आला या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असुन पोलीस पुढील तपास करतायेत.
सायली कल्याण पारेकर वय १७ वर्षे असे मयत मुलीचे नाव असुन ती गेवराई शहरातुन बेपत्ता झाल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी गेवराई पोलीसात नोंदवीली होती. मात्र बुधवारी सकाळी गोवींदवाडी परिसरातील एका विहीरीत त्या तरुणीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे फौजदार युवराज टाकसाळ सह कर्मचाऱ्य्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढत सदरील मृतदेह सायली चा असल्याची खात्री केली व शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.
सायलीने मुत्यूपुर्वी चिठ्ठीत मी मरतेय नंतर कोणालाही जबाबदार धरु नये असे नमूद केले आहे.सायलीने आत्महत्या केली की घातपात ? याचा तपास गेवराई पोलीस करतायेत.
Tuesday, November 17, 2020
सत्ताधारी पक्षाचे आमदार असतानाही विकासकामासाठी रस्त्यावरील खड्डात दिवे लावून दिवाळी साजरी.राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अनोखे आंदोलन.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 दहा उमेदवारांनी घेतले अर्ज मागे.
औरंगाबाद ,दि.17 (विमाका):- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता आज दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत एकूण 45 वैध ठरलेल्या अर्जांपैकी 10 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहे.
अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहे. 1) अक्षय नवनाथराव खेडकर, औरंगाबाद 2) ईश्वर आनंदराव मुंडे, बीड 3) अंभोरे शंकर भगवान, औरंगाबाद 4) जयसिंगराव गायकवाड पाटील, औरंगाबाद 5) प्रविणकुमार विष्णु पोटभरे, बीड 6) विजेंद्र राधाकिसन सुरासे, जालना 7) विवेकानंद शशीकांत उजळंबकर, लातूर 8) शेख गुलाम रसुल कठ्ठु, औरंगाबाद 9) संजय शहाजी गंभीरे ,बीड 10) संदिप बाबुराव कराळे, नांदेड.
05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी एकूण 35 उमेदवार निवडणूक लढविणार आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 1) बोराळकर शिरीष (पक्ष : भारतीय जनता पाटी) औरंगाबाद 2) सतीश भानुदासराव चव्हाण (पक्ष: नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) औरंगाबाद 3) अब्दुल रऊफ (पक्ष : समाजवादी पार्टी) औरंगाबाद 4) अंकुशराव शिवाजीराव पाटील (पक्ष : राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर 5) कुणाल गौतम खरात (पक्ष : ऑल इंडिया मजलिस ए इस्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) औरंगाबाद 6) ढवळे सचिन राजाराम (पक्ष : प्रहार जनशक्ती पक्ष) औरंगाबाद 7) प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ (पक्ष : वंचित बहुजन आघाडी) परभणी 8) डॉ.रोहित शिवराम बोरकर (पक्ष : आम आदमी पार्टी) पुणे 9) शे.सलीम शे.इब्राहिम (पक्ष : वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी 10) सचिन अशोक निकम (पक्ष : रिपब्लिकन सेना) औरंगाबाद 11) अशोक विठ्ठल सोनवणे (पक्ष : अपक्ष ) औरंगाबाद 12) ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ' के.सागर ' (पक्ष : अपक्ष ) नांदेड 13) आशिष आशोक देशमुख (पक्ष : अपक्ष) बीड 14) उत्तम बाबुराव बनसोडे (पक्ष : अपक्ष) नांदेड 15) काजी तसलीम निजामोद्दीन (पक्ष : अपक्ष) उस्मानाबाद 16) कृष्णा दादाराव डोईफोडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 17) ॲड.गणेश नवनाथ करांडे (पक्ष : अपक्ष) बीड 18) घाडगे राणी रवींद्र (पक्ष : अपक्ष) बीड 19) दिलीप हरिभाऊ घुगे (पक्ष : अपक्ष), हिंगोली 20) पोकळे रमेश शिवदास (पक्ष : अपक्ष) बीड 21) भारत आसाराम फुलारे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 22) ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे (पक्ष : अपक्ष) परभणी 23) रमेश साहेबराव कदम (पक्ष : अपक्ष) नांदेड 24) राम गंगाराम आत्राम (पक्ष : अपक्ष) लातूर 25) वसंत संभाजी भालेराव (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 26) विलास बन्सीधर तांगडे (पक्ष : अपक्ष) जालना 27) डॉ.विलास गोवर्धन जगदाळे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 28) विशाल उध्दव नांदरकर (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 29) ॲड.शरद बहिणाजी कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 30) ॲड.शहादेव जानू भंडारे (पक्ष : अपक्ष) बीड 31) ॲड.शिरिष मिलिंद कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 32) शेख हाज्जू हुसेन पटेल (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 33) समदानी चॉदसाब शेख (पक्ष : अपक्ष) नांदेड 34) सिध्देश्वर आत्माराम मुंडे (पक्ष : अपक्ष) बीड 35) संजय तायडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद
अंबाजोगाईत बनावट नोटा चलनात आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल.
अंबाजोगाई (प्रतिनीधी )अंबाजोगाई शहरा लगत असलेल्या चनाई येथे राहणार्या चौधरी व पांचाळ नामक दोन युवकांवर दोनशे व पन्नास रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये आज रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे
याबाबत नुसार सूत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार अधिक माहिती अशी की अंबाजोगाई शहरा लगत असलेल्या चनाई येथील दोन युवक व त्यांचे ईतर अन्य साथीदार बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक दहिफळे यांना त्यांच्या माहितीदाराने दिली होती त्यानुसार दहिफळे यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना मुद्देमाल सोबत गजाआड करण्याचा निर्णय घेतला काल संध्याकाळी हे दोघेजण सुविफ्ट डिजायर गाडी घेऊन अंबाजोगाई शहरात बनावट नोटा चालवत असल्याचे समजताच पोलीस निरीक्षक दहिफळे यांनी आपल्या साथीदार समावेत त्यांच्यावर झडप टाकली असता चौधरी यास गाडी सहित पकडण्यास ते यशस्वी झाले तर पांचाळ हा फरार झाला चौधरी याची पोलीस स्टेशनमध्ये आणून चौकशी केली असता त्याच्या जवळून दोनशेच्या व पन्नास रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या यातील दुसरा आरोपी पांचाळ याने आज पर्यंत अनेक बोगस लक्की ड्रॉ मार्केटिंगच्या बोगस कम्पण्याच्या माध्यमातून भल्या भल्याना टोपी दिल्याचे आता समोर येत आहे पांचाळ व चौधरी च्या सम्पर्क मध्ये शहरातील अनेक जण असल्याचे समजले असून हे बनावट नोटा स्वतः तयार करत होते की दुसर्या शहरातून येथे आणत होते तसेच यांच्या सोबत आणखी कितीजण सहभागी आहे याचा तपास पो नि दहिफळे करत आहे
औरंगाबाद पदवीधर निवडणुक भाजपमध्ये बंडखोरी माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा.
औरंगाबाद | पदवीधर निवडणुकीत भाजपमध्ये असलेली बंडखोरी स्पष्टपणे समोर आली असून, माजी खासदार आणि भाजप नेते जयसिंग गायकवाड यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.गायकवाड यांनी आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. मी भाजपच्या प्रदेश कार्यसमती सदस्यत्वाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. कृपया तो स्वीकृत करावा असे गायकवाड यांनी पाटील यांना पाठवलेल्या राजीनाम्यात म्हंटले आहे. तर भाजपकडून पदवीधर निवडणुकीत उमेदवारी मुळे गायकवाड नाराज होते, त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू होती. भाजप नेते शिरीष बोराळकर,प्रवीण घुगे,जयसिंगराव गायकवाड हे तीनही नेते आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत होते. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती समजले जाणारे बोराळकर यांना अधिकृत उमेदवारी देण्याची घोषणा भाजपने केली आहे.तर दुसरीकडे घुगे आणि गायकवाड यांनी सुद्धा पदवीधर निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपची चिंता वाढली होती. परंतु प्रवीण घुगे यांची समज काढण्यात भाजपला यश आले होते. मात्र, जयसिंगराव गायकवाड यांची नाराजी भाजपला दूर करता आली नाही.
रिपाई डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुंबई व महाराष्ट्र राज्य कार्यकारण्या बरखास्त.:- डॉ राजन माकणीकर
Sunday, November 15, 2020
जागतिक पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संघाच्या वतिने अभिवादन कार्यक्रम.
पदवीधर आणी शिक्षक निवडणूक स्थगितीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका.
औरंगाबाद (प्रतिनीधी )- विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ५ जागांच्या निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करून त्यांना स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका लक्ष्मण चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. १ डिसेंबर रोजी पुणे, नागपूर, औरंगाबाद पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. लक्ष्मण चव्हाण यांनी उच्च न्यायालयात दाखल याचिकेतून निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला आहे. याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे ऑनलाइन व ऑफलाइन मतदार नोंदणी बंद होती. यामुळे केवळ ३% पदवीधरांची नोंदणी झाली. निवडणूक आयोगानेही नोंदणीसाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. अशा परिस्थितीत ३ टक्के पदवीधरांच्या मतदानातून आमदार निवडणे लोकशाही प्रक्रियेची थट्टा आहे. निवडणुका घेण्यापूर्वी अधिकाधिक पदवीधर आणि शिक्षक मतदारांची नोंदणी होणे गरजेचे आहे. यामुळे निवडणुका स्थगित करणे किंवा पुढे ढकलणे योग्य निर्णय ठरेल, असे ते म्हणाले. न्या. ए. के. मेनन आणि न्या. ए. के. तावडे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. ऍड. असीम सरोदे यांच्यासह ऍड. अजिंक्य उडाणे आणि ऍड. पूर्वा बोरा यांनी चव्हाण यांची बाजू मांडली. यावर पुढील सुनावणी १६ रोजी होण्याची शक्यता आहे.
प्रक्रियेतील
दोन चुका
लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० च्या कलम २३ (३) नुसार सातत्याने मतदार याद्यांचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मतदारांना मतदार यादीत नाव नोंदवण्याची आणि मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करण्याचे अधिकार आहेत. मात्र, उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख १२ नोव्हेंबर असताना ५ नोव्हेंबर २०२० रोजी मतदार नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली.
पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.
* हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रींची इच्छापुर्ती.
या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा.
हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील!
Saturday, November 14, 2020
स्वस्त धान्य दुकान-आपला अधिकार.

रेशन कार्ड व स्वस्त दरात धान्य मिळणे हा महाराष्ट्रतील सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे.तो कोणी ही हिरावून घेऊ शकत नाही.रेशन विषयी चे आपले अधिकार माहीत करून घ्या
आज देशातील सर्व सामान्य माणूस हा कोव्हिडं च्या परिस्थिती मुळे आर्थिक आघाडीवर देखील पुरता हतबल झाला आहे.आशावेळी स्वस्त धान्य दुकाना मार्फत सरकारने उपजीविके पुरते धान्य उपलब्ध करून दिले आहे.मात्र सर्वसामान्य माणसापर्यंत येण्यापूर्वीच हे धान्य शिजून भरलेल्या पोटात जाते; असे होऊ नये म्हणून सरकारने आपल्यासाठी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रेशनिंगचे नियम/माहिती/रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी/आपले हक्क या सर्वांची माहिती सरकारच्या विविध वेबसाईटवर उपलब्ध आहे.ती सर्वसामान्य माणसाला मिळायला हवी (®)
काय आहेत रेशनिंग चे नियम
रॉकेल/घासलेट पहिल्या पंधरवड्यात न घेतल्यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्ता बुडत नाही.
बीपीएल् व अंत्योदयचे धान्य गेल्या महिन्यात न घेतल्यास पुढच्या महिन्यातही घेता येते.
बीपीएल् व अंत्योदयचे धान्य महिन्यात 4 हप्त्यातही घेता येते.
रेशनवर घेतलेल्या वस्तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.
एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही.
ज्या व जेवढ्या वस्तू हव्या असतील तेवढ्याच वस्तू आपण घेऊ शकतो. इतर गोष्टी घेतल्याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्हणू शकत नाही.
रेशनकार्ड स्वतःकडे ठेवून घेण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार दुकानदाराला नाही.
रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे. आठवडी बाजाराच्या दिवशी उघडे असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे / चलचित्रे तारीख वेळे सहित http://mahafood.gov.in/pggrams/ या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते.
http://www.mahaepos.gov.in/SF
या लिंक वर आपला १२ अंकी रेशन कार्ड नंबर टाकून आपल्या हक्काचे किती रेशन आहे? हे आपल्याला कळेल.
१२ अंकी नंबर हा पेन ने लिहलेले असेल तुमच्या रेशन कार्ड वर किंवा आत मध्ये असतो.आपल्या हक्काचे रेशन
दुकानदाराला देणे बंधनकारक आहे जर अपवाद म्हणून हा नंबर कार्डवर नसेल तर ताबडतोब संबंधित दुकानदाराच्या निदर्शनास आणुन द्या त्याने टाळाटाळ
अथवा प्राप्त माहीती नुसार रेशन दिले नाही व तर आपण
http://mahafood.gov.in/pggram: या ठिकाणी संबंधित दुकानदाराविरुद्ध
तक्रार करु शकता.
रेशन दुकानात लोकांना स्पष्टपणे वाचता येईल असा महिती फलक दर फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्ध असल्याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्ता व फोन, रेशनकार्ड संख्या, भव व देय प्रमाण उपलब्ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते.
बीपीएल, अंत्योदय व अन्नपूर्णा लाभार्थ्यांची यादी दुकानात लावलेली असते.
‘RTI माहिती अधिकार’ फेसबुक ग्रुप – https://www.facebook.com/groups/RTI.MahitiAdhikar
* वरीलपैकी कोणतीही गोष्ट आपल्या गावातल्या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. जर गावातील रेशन दुकानदार धाक/धमकी दाखवत दांडगेशाही करून तक्रार करण्यास मज्जाव करत असेल तर त्रासलेल्या ग्राहकांनी गुप्तता राखून एकत्रितपणे लेखी अर्जावर आपली नावे आणि सही करून तो रजिस्टर पोस्टाने तहसिल कार्यालयाला पाठवा. तसेच दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्यात आपली तक्रार लिहून त्याखाली नाव, पत्ता, सही/अंगठा करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्हा म्हणून तहसिलदार कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्या, की दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो.
* दुकानावर देखरेख करण्यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्य सचिव असतो.
आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन रेशन घेतो. परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती मात्र देत नाही. म्हणुन
महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.
आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो. या साईटवर जाऊन आपल्या कार्डावर एका व्यक्तिमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानदार किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते. https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp
* रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो. https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp
* रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp
* रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे. http://mahafood.gov.in/pggrams/
* वरील वेबसाईट ही शासनाची अधिकृत आहे. जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करुन घ्यावे. व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.




