परळी वैजनाथ ;- ( कांतीकारी साथी न्युज ) मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मतदान करताना मतदारानी निवडणुक आयोगाने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या पेन ने पंसती क्रमांक टाकुन मतदान करावे असे आवाहान जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा व कांतीकारी साथीच्या मुख्यसंपादक सौ.वर्षा मगर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.त्यापुढे असे ही म्हणाल्या की जय महाराष्ट्र महिला संघटना,आईसाहेब जिजाबाई सेवा संस्था,व कांतीकारी साथी च्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदारांची नोंदणी करून घेण्यात आली आहे त्यामध्ये नविन मतदारांची संख्या मोठी आहे.इतर निवडणुकी पेक्षा या निवडणुकीत मतदान करण्याची पध्दत वेगळी आहे.त्यामुळे मतदान केंद्रावर निवडणुक आयोगाने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या पेन ने पंसती क्रमांक टाकुन योग्य पध्दतीने मतदान करून आपले मतदान बाद होणार नाही याची काळजी घ्यावी असे ही सौ.वर्षा मगर म्हाणाल्या .
No comments:
Post a Comment