माजलगाव (प्रतिनिधी) दिवाळी हा सण प्रकाशपर्व म्हणून देशभरात उत्साहात साजरा केला जातो. पालकांच्या प्रेमाला पोरके झालेल्या अनाथांना आपुलकीचा हात द्यावा. दिवाळीनिमित्त अनाथ मुलांना नवीन कपडे फराळ, फटाके व इतर भेटवस्तू देऊन त्यांनाही दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेत माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन जुजगर या युवकाने अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली. यामुळे या सर्व मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला माजलगाव शहरातील विविध भागातील अनाथ मुलांना सामाजिक कार्यकर्ते नितीन जुजगर यांनी प्रत्यक्ष भेटून दिवाळीनिमित्त सोमवार दिनांक 24 रोजी नवीन कपडे मिठाई तसेच फटाके भेट देण्यात आल्या . अनाथ मुला मुलींच्या विकासासाठी नेहमीच कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते नितीन जुजगर हे कार्य करत असतात. असाच कार्यक्रम त्यांनी सोमवारी अनाथ मुलांना नवीन कपडे सोबतच साबण, उटणे, पेस्ट, टुथब्रश, पावडर, क्रिम, टॉवेल, फराळाचे साहित्य आणि पुस्तके भेट दिली आहे.
*लहानपणापासूनच समाजसेवेची आवड*
शालेय जीवनापासूनच मला समाजसेवेची आवड असून माणुसकी कायम जिवंत राहावी आणि अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नितीन जुजगर यांनी सांगून आपण यापुढेही असे समाजकार्य करणार असून समाजातील सर्व सुजान नागरिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
No comments:
Post a Comment