Monday, October 17, 2022

परळी मतदारसंघात बदलाचे वारे. माधव (आप्पा) जाधव यांच्या वाढदिवस कार्यक्रमास हजारोंची उपस्थिती


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व नंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने परळी मतदारसंघात बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. शनिवार दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध विधीज्ञ माधव जाधव यांचा वाढदिवस परळी येथे मोठ्या उत्साहात व हजारो हिताचींतकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. एखाद्या मंत्र्याच्या दौऱ्या सारखं नियोजन, आयोजन माधव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त परळी येथे झाल्याचे दिसून आले.

परळी मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला तर इथे मुंडे घराण्याचा खूप मोठा दबदबा असून पाहिजे तसा परळी मतदारसंघात लोकाभिमुख प्रकल्प किंवा बदल झालेला नाही. अनेक वर्षे एकाच घराण्याचे प्रस्त असल्यामुळे इथे बऱ्याच गोष्टी विकासा पासून वंचित आहेत. मतदारसंघाला विकसित करायचे असेल तर घराणेशाही संपून सर्वसामान्य लोकांचे नेतृत्व करणाऱ्या माणसाला कौलं द्यावा लागेल आणि सुजान मतदार कौलं देतील. माधव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त परळी येथे भरगच्च अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसोबत वैद्यकीय, शिक्षण, व्यापारी, शेतकरी कष्टकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाचे आयोजन माधव (आप्पा) जाधव मित्रपरिवार यांनी सुंदररित्या केले होते. या कार्यक्रमास राष्ट्रीय काँग्रेस ,संभाजी ब्रिगेड ,भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, एम आय एम, वंचित बहुजन आघाडी ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांसह सर्व राजकीय पक्ष संघटना यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment