मुंबई - वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे समर्थक आमदारांकडून मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी केलेल्या शिफारशींना उपमुख्यमंत्री केराची टोपली दाखवत असल्यान नाराजीचा सूर उमटू लागल्याचं सांगितलं जाऊ लागला आहे.
राज्यात अलीकडे सनदीअधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल झाल्या असल्या तरी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. यावरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांत शनिवारी 15 ऑक्टोबर रोजी वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. या वेळी विविध विषयांसह पोलिसांच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर चर्चा झाली. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आले त्यालाही आता शंभर दिवस उलटून गेले. मात्र बदल्यांचा विषय अजून मार्गी लागलेला नाही आहे. यावरून उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी नाराजी व्यक्त केली. ते स्वतः गृहमंत्री असल्याने त्यांच्याकडे याबाबत वारंवार विचारणा होत आहे.निवडणूक प्रचार, शहरातील, तसेच जिल्ह्यातील महत्त्वाचे निर्णय पोलिसांच्या हातात असल्याने आपल्या मर्जीतील अधिकारी नेमण्यावरुन शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये नाराजी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिले आहे. दरम्यान, शिंदे समर्थक आमदारांच्या बदल्यांच्या शिफारशींना फडणवीस जुमानत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापून
No comments:
Post a Comment