पुणे - राज्यात परतीच्या पावसाने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. यातच आणखी तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याने वर्तवली आहे.
उद्यापासून पुढचे तीन दिवस मुंबई, पालघर, ठाणे, सातारा, सांगली, सोलापूर या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, नांदेड, लातूर, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, हिंगोली आदी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. विविध ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
No comments:
Post a Comment