Saturday, October 22, 2022

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची अतिवृष्टी नुकसानीची अंधारात पाहाणी शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना.

बीड - अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात आलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार अंधारात पाहणी करून सात मिनिटातच सटकले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना उमटल्या आहेत.
जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली ऐन दिवाळीत दिवाळं निघाल्याने शेतकरी मरणाला कवटाळत आहे.अशा स्थितीत पंचनाम्याचा व पाहणी दौऱ्याचा फार्स करत शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या दुखावर मीठ चोळत आहे.कापसाच्या वाती अन् सोयाबीन ची माती झाल्यामुळे कंबरड मोडलेला शेतकरी पुढे जगायचं कसं ? शेत पेरणी योग्य करायची तर पैसा आणायचा कुठून? पेरणी नाही केली तर साल भर खायचं काय? पहिलंच देणं पाणी दिलं नाही तर दारात कोण उभं करणार? अशा एक ना अनेक समस्यांनी तो घेरला गेला आहे. अशा परिस्थितीत शिंदे सरकार मात्र आम्ही पाठीशी आहोत धीर सोडू नका असं म्हणत असलं तरी कुठलीच ठोस मदतीची घोषणा अजून केली नाही.
 सर्व घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. यात बरीच भर म्हणून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा दौरा दुपारी दोन वाजता होता मात्र ते तब्बल सहा वाजता बीडमध्ये पोहोचले. ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही म्हणणाऱ्या सातारांना अंधारात नुकसानीचा अंदाज कसा आला असेल हा प्रश्न निर्माण झाला आहे.
अंधारात त्यांनी नुकसानीची पाहणी केली. गेवराई बीड भागात आल्याचं त्यांनी नाटक केलं अंधारात सात मिनिटात पाहणी केली. दौरा आटोपून परतीची वाट त्यांनी धरली. कृषिमंत्र्यांकडे तेवढ्या सात मिनिटातच शेतकऱ्यांनी गा-हाणी मांडली. कृषी मंत्राच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र रोष निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment