Sunday, October 16, 2022

भीमनगर येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर विहारात वर्षावासाचा कार्यक्रम बौध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन संपन्न .

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  भीमनगर येथील डाँ.बाबासाहेब आंबेडकर विहारात रविवार दि.16 ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले. 
      भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन वर्षावासाच्या निमित्ताने दि.16 ऑगस्ट 2022 पासून ते दि.16  ऑक्टोबर 2022 पर्यंत सतत तीन महिने दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळात वाचन झाले.   या वर्षावासाचे  दि.16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. भगवान गौतम बुध्द व प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुष्प, मेनबत्ती, अगरबत्ती, पुष्पहार अर्पन करून पुजन करून व त्रिशर पंचशील घेवून बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथ वाचनाने वर्षावासाची सांगता झाली. ग्रंथाचे वाचन प्रकाश संभाजी जगतकर यांनी केले आहे.
   भीमनगर येथील प्रकाश संभाजी जगतकर यांच्या कडुन बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचण दि. 16/08/2022 ते  16/10/2022 या तीण महीण्याच्या कालावधीत पूर्ण झाले आसुण त्या निमित्त भिमनगर मधील डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विहारात जगतकर परिवार कडूण बुद्ध वंदणा घेण्यात आली आसूण या वंदणेत प्रकाश सभाजी जगतकर कपिल जगतकर,राहूल जगतकर गंगाधर जगतकर, डाँ रविद्र जगतकर रमेश जगतकर, शांताबाई जगतकर वैजणाथ (तात्या)जगतकर, दिपा जगतकर,  मीणा जगतकर, पलवी जगतकर, स्वाती जगतकर, धंणजय काबळे,  निलीमा कांबळे,  कमलबाई ताटे, शंकर ताटे, विलास रोडे, सिद्धार्थ जगतकर भिमनगर मधील मोठ्या संख्येने नागरिका उपस्थित होते.

No comments:

Post a Comment