Thursday, April 21, 2022

परळी तालुक्यातील मौजे टोकवाडी येथील बोगस कामाची चौकशी करून कारवाई करा.1मे पासून जिल्हा परिषद समोर साखळी उपोषण- विष्णु मुंडे

बीड (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीचे परळी तालुका महासचिव विष्णू मुंडे यांनी जिल्हा परिषद मुख्याधिकारी अजित पवार यांच्याकडे लेखी स्वरुपात  निवेदन देऊन टोकवाडी येथील विविध कामात अनियमितता भ्रष्टाचार व बोगस  झाली  आहेत त्यामध्ये पंचवीस पंधरा, दलित वस्ती सुधार योजना, खासदार निधी, अंगणवाडी बांधकाम चौकशी करण्यात यावी त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झालेला आहे जनतेच्या माहिती करिता प्रत्येक कामाचे बोर्ड (फलक) दर्शनी भागावर लावणे आवश्यक आहे परंतु ते न लावता व इस्टिमेट प्रमाणे कामे झाली नाहीत या सर्वांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य अधिकारी अजित पवार यांना देण्यात आले आहे. या कामाची चौकशी दहा दिवसात नाही झाली तर वंचित बहुजन आघाडी परळी तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद समोर 1 मे रोजी साळी  उपोषण करणार असल्याचा याचा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी चे महासचिव विष्णू मुंडे सुभाष रोडे विश्वनाथ धनगाव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदन देते प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद घाडगे, गौतम आगळे, प्रसन्नजित रोडे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment