Sunday, April 24, 2022

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांची संयुक्त जयंती गुरूदास सेवा आश्रमात उत्साहात साजरी.


*आश्रमातील वृद्धांना फळे वाटप; कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती.

घाटनांदुर (प्रतिनिधी) गुरूदास सेवा आश्रम, गुरूदासनगर घाटनांदुर येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एम.शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून अंबाजोगाई बाजार समितीचे सभापती गोविंद देशमुख तसेच लांडे सर, आपेगावकर, आर.के.गाडे, गुणाले आदी उपस्थित होते. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष सुरेश टाक यांनी केले. याप्रसंगी आश्रमातील वृद्धांना फळ वाटप करण्यात आले. कार्यक्रमास गुरूवर्य ह.भ.प.दास लालजी महाराज, अध्यक्ष सुरेश टाक, उपाध्यक्ष नरहरी शहाणे, सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, सुभाषराव चव्हाण, नारायणराव गोपनपाळे, ओमप्रकाश सारडा, यमुनाबाई सोनवणे, शामाताई दहिवाळ तसेच वृद्धाश्रम व वस्तीगृहातील सर्व विद्यार्थी, वृद्ध नागरिक उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment