बीड (प्रतिनीधी) जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मौजे. गोलंग्री ता.जि.बीड येथील लघुपाटबंधारे विभागामार्फत ४८ लाख रूपये किंमतीच्या निकृष्ट साखळी बंधारे प्रकरणात तत्कालीन शाखा अभियंता श्री.पी.डी.ढेरे यांना निलंबित करण्यात आले होते तर तत्कालीन उपअभियंता/कार्यकारी अभियंता श्री.बोंबलगे ए.एस. यांची मंत्रालयीन चौकशी सुरू असून संबधित ठेकेदार श्री.एस.पी. चव्हाण यांच्यावर नेकनुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
शासनाने अपहारीत रक्कम शासन तिजोरीत जमा करून नविन बंधारे बांधून द्यावेत:- श्रीकांत कवडे, विनोद भोईटे, नितिन कवडे
_____
तत्कालीन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांना तक्रार केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष बंधा-याची पाहणी करून अभियंता व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हे दाखल झाले परंतु अपहारीत रक्कम वसूल करण्यात आली नसुन ती वसुली करण्यात यावी व गाव दुष्काळमुक्त होण्यासाठी नविन साखळी बंधारे बांधण्यात यावेत डागडुजीच्या नावाखाली थातूरमातूर काम करून भागणार नाही,आम्ही दि.२२ शुक्रवार रोजी पासुन ठिय्या आंदोलन करणार असल्याचा ईशारा श्रीकांत कवडे, विनोद भोईटे, नितिन कवडे, सुनिल कवडे, जयसिंग कवडे, शिवाजी कवडे आदिंनी जिल्हाप्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
जलसंधारण विभिगात टक्केवारी शिवाय कामच होत नसल्यामुळे जलयुक्त शिवार झाले दगडगोटेयुक्त शिवार:-डाॅ.गणेश ढवळे
___
बीड मधिलि जलसंधारण विभागाच्या कामात अभियंत्यांना काम सुरू होण्याअगोदर टक्केवारी दिल्याशिवाय काम होत नसल्याची अभियंता आणि कंत्राटदार यांच्यातील संभाषण सोशल मिडीयावर व्हायरल होत असून त्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे स्पष्ट होत असून जलसंधारणाची कोविडच्या अगोदर मंजूर कामांना स्थगिती दिली गेली होती ती कामे आता नव्याने करायची असतील तर नव्याने पत्र प्राप्त करून द्यावे लागत असून त्या पत्रासाठी पुन्हा एकदा पैशाची मागणी करण्यात येत असल्याचे दिसून येत असून वरिष्ठ आधिका-यांपर्यंत पैसे पोहोच केल्याचे सुद्धा संभाषणावरून लक्षात येत आहे, त्यामुळेच निकृष्ट दर्जाची कामे होत असून कोट्यावधी रूपये खर्चुनसुद्धा दुष्काळमुक्ति होताना दिसत नसुन जलयुक्त शिवार दगडगोटे युक्त शिवार बनले आहे.
No comments:
Post a Comment