Sunday, February 21, 2021

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन हा उपाय आहे की नाही? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे.

.

"कोरोनाची परिस्थिती अजून गंभीर होत असून, राज्यात दुसरी लाट आली की नाही हे लवकरच समजणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत".

लॉकडाऊन हा उपाय आहे की नाही?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे

मुंबईः (प्रतिनीधी) गेल्या काही दिवसांपासून राज्यावर कोरोनाचं सावट आहे. काही दिवसांपासून राज्यात बरेच कोरोना रुग्ण सापडतायत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याची भीती व्यक्त केलीय. कोरोनाची परिस्थिती अजून गंभीर होत असून, राज्यात दुसरी लाट आली की नाही हे लवकरच समजणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. मुख्यमंत्र्यांनी आज वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर जनतेशी संपर्क साधताना सतर्कतेचा इशारा दिलाय.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे

* लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क घालणं अनिवार्य: उद्धव ठाकरे

कोरोनाचं युद्ध लढताना आपल्या हाती तलवार नाही. पण आपल्या हाती मास्क हीच आपली ढाल आहे. तो घालायला विसरलो तर हा छुपा शत्रू आपल्यावर वार करू शकतो. लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क घालणं अनिवार्य आहे.

* राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याची भीती : उद्धव ठाकरे

राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याची भीती व्यक्त केलीय. कोरोनाची परिस्थिती अजून गंभीर होत असून, राज्यात दुसरी लाट आली की नाही हे लवकरच समजणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.

* या लढाईत मास्क हीच आपली ढालः उद्धव ठाकरे

आम्ही आंदोलन केलं आणि एखादी गोष्ट उघडली. पण कोरोनाशी मुकाबला ते करू शकत नाही. उद्या कोरोनाचा घाला आलाच तर तेही आपल्याला वाचवू शकत नाही. त्यामुळे ज्या ज्या सूचना दिल्या त्याचं पालन आपण केलं. पण आता आपण मास्क वापरणं सोडलं आहे. या लढाईत मास्क हेच आपली ढाल आहे. या लढाईत मास दिसत नाही. त्यामुळे मास्क घालणं अनिवार्य आहे. या पूर्वीच्या काळात बेड्स, ऑक्सिजन बेड्ल नव्हते. त्यावेळी पोलीस, डॉक्टर देवदूतासारखे धावून आले.

* लॉकडाऊन हा त्याचावर उपाय आहे की नाही?, तुम्हीच सांगाः उद्धव ठाकरे

पाश्चिमात्य देशांमध्ये तसंच झालं होतं. कोरोनाची लाट जेव्हा खाली येते तेव्हाच तिला थांबवायचं असतं. पाश्चिमात्य देशांमध्येही आपल्यासारखीच शिथिलता आणली. त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याची वेळ आली. लॉकडाऊन हा त्याचावर उपाय आहे की नाही? माहिती नाही. पण संपर्कातून होणारा संसर्ग यातून थांबवता येऊ शकतो.

* समजूतदारपणे सूचनांचं पालन करा, अन्यथा लॉकडाऊन?: उद्धव ठाकरे

कोरोना आता पुन्हा डोकं वर काढतो आहे. आपण थोडं फिरायला लागलो. लग्नावरची बंधनं अजूनही आहेत. हे उघडा ते उघडा म्हणणारे कोरोनाची शिस्त मोडू शकत नाही. समजूतदारपणे सूचनांचं पालन करा. सगळ्यांना वाटलं कोरोना गेला. कोरोनाची लाट खाली जाते, वर जाते. पण खाली जाते त्याच वेळेस तिला थांबवायचं असतं. पाश्चिमात्य देशात लॉकडाऊन गेल्या एक दीड महिन्यापासून आहेत. ब्रिटनमध्ये तर वर्षभरापासून लॉकडाऊन आहे.

* संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय : उद्धव ठाकरे

संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय आहे. आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आता एक बंधन पुन्हा आपल्याला पाळावं लागणार आहे. मंत्री नितीन राऊत यांनी घरचा विवाह सोहळा रद्द केला. याला म्हणतात खरी सामाजिक जाणीव, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.

* नियम मोडलेले दिसले तर हॉलच्या मालकावर गुन्हा दाखल होणारः उद्धव ठाकरे

जनतेच्या वतीनं तुमच्या मुलाला आशीर्वाद आहे. जर नियम मोडलेले दिसले तर हॉलच्या मालकावर गुन्हा दाखल होणार आहे, मास्क वापरला नाही तर दंड आकारला जाणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत.

* उद्यापासून मिरवणूक, आंदोलने, यात्रांवर बंदी : उद्धव ठाकरे

उद्यापासून मिरवणूक, आंदोलने, यात्रांवर बंदी घालण्यात आलीय. पक्ष वाढवू, पण कोरोना नाही, पक्ष वाढवायचा आहे जरुर वाढवा, पण कोरोना नका वाढवू, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावलाय.

* तर पुन्हा एकदा लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल: उद्धव ठाकरे

आपल्याला एकत्र मिळून लढायचं आहे. आपण एकत्र राहिलो नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल, ही सूचना कोरोना देतोय. लॉकडाऊन करायचा का मी पुढचे आठ दिवस पाहणार, लॉकडाऊन ज्यांना नकोय ते मास्क घालून फिरतील, हवाय ते विना मास्क फिरतील, अंतर ठेवा, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

* उद्यापासून काही जिल्ह्यात लॉकडाऊन?

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आजच राज्यात सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, यात्रा, आंदोलनं, मोर्चे यावर पूर्णपणे बंदी घालत असल्याची घोषणा केली आहे. सोबतच जिथं गरज असेल तिथं बंधनं घालणं किंवा लॉकडाऊन जाहीर करण्याची सुचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. अमरावती, यवतमाळमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याचं ठाकरे म्हणाले. त्यानंतर तिथं लॉकडाऊन करायचा असेल तर अधिकाऱ्यांनी अचानक घोषणा न करता जनतेला चोवीस तास द्यावेत असंही म्हणाले. अचानक घोषीत केलेला लॉकडाऊन हा घातक असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळेच उद्या रात्रीपासून काही जिल्ह्यात लॉकडाऊन किंवा तशा स्वरुपाची काही कडक बंधनं लादली जाऊ शकतात. विशेषत: विदर्भात जिथं स्थिती गंभीर आहे.

No comments:

Post a Comment