![]() |
| कर्मचाऱ्याचे भविष्य निर्वाह निधी प्रकरण |
प्रेस नोट ::
दिनांक :- 26.02.2021.
पाटबंधारे विभाग जालना येथील कनिष्ठ लिपीक श्री. महेश बाळकृष्ण रामदासी यांना 3,000/- रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालनाच्या पथकाने पकडले.
- आरोपीचे नाव, हुद्दा व पत्ता : लोकसेवक श्री. महेश बाळकृष्ण रामदासी वय 39 वर्ष व्यवसाय नोकरी कनिष्ठ लिपीक, कार्यकारी अभियंता कार्यालय, पाटबंधारे विभाग, जालना रा रो हाऊस नं ।2 पांगारकर नगर, अंबड रोड, जालना (वर्ग - 3)
- गुन्हा घ ता व ठिकाण : दि- 26.02.2021 रोजी अंबड चौफुली चहाचे हॉटेलवर जालना येथे
- लाचेची रक्कम : 3,000/- रुपये.
याबाबत हकीगत अशी की, यातील तक्रारदार यांनी तक्रार दिली की, ते पाटबंधारे उपविभाग, अंबड येथे कार्यरत असुन त्यांनी त्यांचे भविष्य निर्वाह निधीतुन रक्कम मंजुर करण्यासाठी अर्ज दिला होता, सदरचे अर्जावरुन त्यांचे भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढून देण्यासाठी कार्यकारी अभियंता कार्यालय, पाटबंधारे विभाग, जालना येथील कनिष्ठ लिपीक श्री. महेश रामदासी यांनी तक्रारदार यांचेकडे 3,000/- रूपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदारास कनिष्ठ लिपीक श्री. महेश रामदासी यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली. सदर तक्रारीवरून दि. 22.02.2021 रोजी पडताळणी केली असता कनिष्ठ लिपीक श्री. महेश रामदासी यांनी तक्रारदार यांचेकडे 3,000/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पण्ण झाले. तसेच आज दि. 26.02.2021 रोजी आलोसे कनिष्ठ लिपीक श्री. महेश रामदासी यांनी तक्रारदार यांचेकडून त्यांचे भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढुन देण्यासाठी 3,000/- रुपये लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्विकारली असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालनाचे पथकाने अंबड चौफुली चहाचे हॉटेलबर जालना येथे रंगेहाथ पकडले.
लोकसेवक श्री. महेश बाळकृष्ण रामदासी वय 39 वर्ष व्यवसाय नोकरी कनिष्ठ लिपीक, कार्यकारी अभियंता कार्यालय, पाटबंधारे विभाग, जालना रा रो हाऊस नं 12 पांगारकर नगर, अंबड रोड, जालना (वर्ग 3 ) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही चालू आहे.
तसेच अॅन्टी करप्शन ब्युरो कडून आवाहन करण्यात येते की, कोणी लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खाजगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास 02482 220252, तसेच टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करावा. तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं. 8975762906, पोलीस निरीक्षक मो.नं. 8390757835, 9823216788 वर संपर्क करावा.
पोलीस उप अधिक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जालना.

No comments:
Post a Comment