* गेल्या महिन्याभरातील सर्वाधिक रुग्णवाढ.
वेळी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करतानाच जनतेच्या काळजीपोटी सावधानतेचा इशारा दिला आहे. जर ही संख्या वाढत राहिली तर जनतेला पुन्हा एकदा त्रिसूत्रीची आठवण करून द्यावी लागेल असे मत आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी व्यक्त केलं.राज्यात आज गेल्या महिन्याभरातील सर्वाधिक रुग्णवाढ झालीय. आज राज्यात 5 हजार 427 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या महिन्याभरात ही संख्या दोन हजार ते तीन हजारच्या दरम्यान मर्यादित होती. यामुळे राज्यमंत्री यड्रावकर यांनी जनतेला त्रिसूत्रीची पुन्हा आठवण करून देतानाच राज्य सरकारला नाईलाजाने लॉकडाऊनबाबत विचार करावा लागेल असे मत व्यक्त केले आहे.आज 2,543 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण 19,87,804 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.5% एवढे झाले आहे.
No comments:
Post a Comment