आदरणीय सर
*यशस्वी सापळा*
▶️ युनिट -नवी मुंबई
▶️ *तक्रारदार*-पुरुष,वय-32 वर्षे रा. सानपाडा, नवी मुंबई
▶️ *आरोपी-* श्री.राहूल शत्रुघ्न कोळी, वय- 29 वर्षे, पद- परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक, सत्र क्र. 117, (वर्ग -2), नेमणूक सानपाडा पोलीस ठाणे, नवी मुंबई रा. ए/806, लामेर सोसायटी, साईनगर, पनवेल, नवी मुंबई.
▶️ *लाचेची मागणी*-30,000/-रू
▶️ *लाच स्विकारली-* 30,000/रु.
▶️ *हस्तगत रक्कम-* 30,000/-रु.
▶️ *लाचेची मागणी -*
ता.12/02/2021
▶️ *लाच स्विकारली -* ता. 1३/02/2021
▶️ *लाचेचे कारण -*.
यांतील तक्रारदार यांचे वडिलांनी त्यांचे मालकीचा दुकानगाळा श्री चुन्नीलाल खाटनावलिया यांना भाडेतत्वावर दिला होता. परंतु श्री चुन्नीलाल यांनी काही महिन्यानंतर दुकान गाळ्याचे भाडे न दिल्यामुळे तक्रारदार यांनी श्री चुन्नीलाल यांना दुकान गाळा खाली करण्यास सांगितले होते. त्यानंतर कोविड संक्रमणाच्या काळात ते दुकानगाळा मालक यांना काहीएक न सांगता गावी निघून गेले. त्यानंतर तक्रारदार यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये सदर दुकानगाळ्यास श्री चुन्नीलाल यांचे लॉक असतानाही स्वतःचे लॉक लावले होते. त्यामुळे श्री चुन्नीलाल व तक्रारदार यांच्यात वाद होऊन श्री चुन्नीलाल यांनी तक्रारदार यांचे वडिलांविरुद्ध सानपाडा पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज केला होता. सदरचे प्रकरण मिटविन्यासाठी लोकसेवक राहुल कोळी, परि.पोउपनि यांनी तक्रारदार यांचेकडे रु 30,000/- लाचेची मागणी करून मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आलेले आहे.
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी*
पोउपअधी ज्योती देशमुख
▶️ *सापळा पथक-*
पोनि शिवराज बेंद्रे, पोहवा नितीन पवार, पोना संतोष ताम्हाणेकर, पोशि मंगेश चव्हाण,पोशि अमोल चौगले,
▶️ *मदत पथक-*
पोनि नितीन खैरनार, पोहवा प्रदिप जाधव,पोशि सचिन माने, चापोहवा रतन गायकवाड
▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-* मा. पोलीस महासंचालक , म . रा मुंबई.
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, नवी मुंबई
दूरध्वनी क्र 022-27833344
*@ टोल फ्रि क्रं. 1064*

No comments:
Post a Comment