बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर नागोबाचा माळ ससेवाडी शिवारात कार आणि खडी वाहतूक करणारे हायवा यांचा अपघात झाला. महामार्गावरून भरधाव वेगाने जात असलेल्या कार व हायवा ट्रकची समोरासमोर धडक झाली, यात कारमध्ये बसलेले तिघेजण जखमी झाले आहेत.
सदर अपघातात अनिल सखाराम नवले (रा.रूई ता.गेवराई), अनिल आसाराम कादे (रा.खेरवाडी ता.गेवराई) आणि कल्याण इंदरराव राऊत (रा.खेरडा बुद्रुक, ता. गेवराई) असे ३ जण जखमी झाले. दरम्यान या जखमी तिघांवरही रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे..
No comments:
Post a Comment