वडवणी (प्रतिनिधी) वडवणी,तेलगाव रस्त्यावरून दोन गाड्या मधून गुटखा जात असल्याची गुप्त माहिती सहा.पोलीस अधिक्षक धिरजकुमार यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून गुटखा घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या पकडल्या यामध्ये जवळपास 18 लाखाचा गुटखा सापडला. पोलिसांना एका गाडी चालकास जेरबंद करण्यात यश मिळाले मात्र दुसरा फरार होण्यात यशस्वी झाला.
वडवणी — तेलगाव रस्त्यावरून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक धिरजकुमा यांना लागताच त्यांच्या पथकातील कर्मचार्यांनी तेलगाव रोडवरील गजानन जिनिंगसमोर सापळा रचला. दरम्यान स्विफ्ट डिझायर गाडी क्र. एम.एच. 44 ओ 440 ही गाडीची तपासणी केली असता गाडीत मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. स्विफ्ट गाडी पकडल्याचे पाठिमागील गाडीच्या चालकास लक्षात येताच महिंद्रा गाडीच्या चालकाने गाडी घटनास्थळी सोडून पळ काढला. दुसर्या गाडीचा नंबर एम.एच. 17 ए.जे. 2217 एक्स यु व्ही 500 असा आहे. यातही गुटख्याच्या गोण्या आढळून आल्या. या दोन्ही गाड्यांमध्ये 17 लाख 72 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी स्विफ्ट गाडीचा चालक शेख राजू रा. सिरसाळा याला ताब्यात घेतले तर महिंद्रा गाडीचा चालक शेख आसिप रा. पात्रूड हा मात्र फरार झाला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment