बीड (प्रतिनिधी) : नैसर्गिक मानवनिर्मित अनावधानाने झालेल्या दुर्घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण महत्वाचे असून स्थानिक यंत्रणेसह नागरिकांनी असे प्रशिक्षण शिकुन घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मूधोळ- मुंडे यांनी आज येथे केले. आज के.एस.के महाविद्यालयामध्ये भूकंप आल्यावेळी स्थानिकांनी कशा पध्दतीचे उपाय योजना आखावी, यंत्रणेने आपली जबाबदारी कशी पार पाडावी याबाबतची मॉक ड्रील आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. ‘मॉक ड्रील’ दरम्यान के. एस. के. महाविद्यालयामध्ये भुकंप आल्याने काही विद्यार्थी त्यात अडकल्याचे चित्र निर्माण करण्यात आले यावेळी प्राचार्य यांनी समयसूचकता दाखवून स्थानिक जिल्हा प्रशासनाला दूरध्वनी केला ते पोहचेपर्यंत त्यांना शक्य असणा-या उपाययोजना असून अपघातग्रस्त विद्यार्थ्याना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जिल्हा प्रशासनाला माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाना, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, पोलीस, तालुका प्रशासन आग्निशामक,शिक्षण विभाग, उर्जा विकास माहिती विभाग यांच्याशी संपर्क साधून समन्वय घडवून आणून के. एस. के. महाविद्यालयामध्ये घडलेल्या ठिकाणी लोकांची गर्दी जमणार नाही, असामाजिक तत्व यासाठी यंत्रणा सज्ज केली आपत्ती व्यवस्थापन, राज्य आपत्ती व्यवस्थापन, केंद्र सरकारचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन जी मदत करते शक्य होईल ते करण्याचे प्रयत्न करुन कमीत कमी अपघातग्रस्त आणि संवेदनशील वातावरणाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याचे ‘मॉक ड्रील’ व्दारे दाखविण्यात आले.
‘मॉक ड्रील’होण्याआधी सोमवारी याविषयी तात्विक बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी करिष्मा नायर, निवासी उपजिल्हाधिकारी, शिवकुमार स्वामी, , उपजिल्हाधिकारी भूसंपादन जा. प्र. श्रीमती भारती सागरे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त, रविंद्र शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,राजदीप बन्सोड, शिक्षणाधिकारी प्राथमिक, नागनाथ शिंदे तहसीलदार, नरेंद्र कुलकर्णी तहसीलदार, गोविंदराव पेद्देवाड, तहसीलदार सुहास हजारे, के.एस. के. महाविद्यालयातील डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. दीपा क्षीरसागर, प्राचार्य डॉ.एस. व्ही क्षीरसागर, उप प्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर, उप प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, उप प्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेशक श्री. कोळेकर, एन. सी.सी. प्रमुख बी.टी. पोटे, आपत्ती व्यवस्थापनचे उपनिरिक्षक योगेशकुमार शर्मा सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दिपा मूधोळ- मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपतकालीन प्रशिक्षण आयोजित केले होते. एनडीआरएफचे निरीक्षक योगेशकुमार आणि सुजितकुमार पासवान यांच्या टीमने के. एस. के. महाविद्यालयाच्या प्रागंणात विविध यंत्राच्या माध्यमातुन भुंकप, महापूर, अचानक लागलेली आग आणि अपतकालीन परिस्थितीत अडकलेल्या जिवीत व मृत व्यक्तीला तसेच प्राप्त परिस्थितीत आपल्या जवळील उपलब्ध साहित्याचा जसे, चादर, शॉल, बेडसीट, बांबू, लाकूड याचा कशाप्रकारे उपयोग करुन त्या व्यक्तीला आपतकालीन परिस्थितीत सुरक्षित बाहेर काढायचे, एकटे असेल तर स्वत:चा बचाव कसा करायचा याचे प्रात्याक्षिक करुन दाखविले. यावेळी उपस्थित नागरिकांनी उत्स्फुर्तपणे या प्रशिक्षणाला प्रतिसाद दिला.
No comments:
Post a Comment