Friday, January 19, 2024

आण्णाभाऊ साठे नागरी वस्त्या मधील सुधारणा योजनेमधील कामात भ्रष्टाचार जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन. 26 जानेवारी पासून करणार उपोषण-अक्षय कोकाटे.

बीड (प्रतिनिधी) बीड नगरपरिषद सिओ  अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती मधील सुधारणा कामात भ्रष्टाचार या कामाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे थेट जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे चौकशीची मागणी. महाराष्ट्र शासनाने दिनांक 21/03/2023 रोजी परिपत्रक काढून बीड शहरासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्त्या मधील सुधारणा योजना अंतर्गत एकूण बजेट 14,11,43,940/- रुपये इतक्या रक्कमेची विविध कामे करण्याचा तांत्रिक मान्यतेसह मान्यता देण्यात आलेली आहे. सदरच्या कामाचे नियोजन व आयोजन बांधकामाची प्रत तसेच कोणते काम कोठे आणि किती व कसे करावयाचे आहे व सर्व नियम ठरवून दिलेले असतांना संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीने कामे दर्जाहीन केलेले निदर्शनास येत आहेत. उदा. सिमेंट, खडी कमी वापरणे तसेच सिमेंट हलक्या दर्जाचे वापरणे असे केलेले कामे हे टिकावू नसल्याने सदर कामे करून एक प्रकारचा भ्रष्टाचाराच होत आहे. तसेच वार्ड क्र. 4 मधील कामे, वार्ड क्र. 18 मध्ये काम केलेले आहे. वास्तविक वार्ड क्र. 18 मध्ये एकाही कामाची मंजूरी नसतांना वार्ड क्र. 18 मध्ये काम केल्याचे निदर्शनास आलेले आहे. अशा पध्दतीने अनेक ठिकाणची कामे शासनाच्या नियमानुसार नाही. वार्ड क्र. 18 मध्ये 1) आकाश गायकवाड यांच्या घरापासून ते संतोष जाधव यांच्या घरापर्यंत, 2) भाभी किराणा दुकानापासून ते लक्ष्मण गुंजाळ (गांधीनगर) यांच्या घरापर्यंत ही कामे हार्ड क्र. 4 ची कामे आहेत. परंतू सदर कामे वार्ड क्र. 18 मध्ये वळण्यात आलेली आहे. वरील कामे ही अगोदरच झालेली आहेत. परंतु नविन काभ दाखवून न कलेल्या माथ पैसे संबंधित कन्स्ट्रक्शनने बील उचलण्याच्या तयारीत आहे. सदरच्या भ्रष्टाचाराला अभियंता नगर परिषद, बीड यांचेही सहकार्यतसेच दिनांक 09/01/2024 रोजी मुख्याधिकारी साहेब, नगर परिषद, बीड यांना सोबतचे निवेदन दिलेले होते. परंतू संबंधित मा. मुख्याधिकारी साहेब, न.प. बीड यांनी माझ्या निवेदनाची कसलाही विचार केलेला नाही. त्यामुळे मा. साहेबांनी सदरच्या कामामध्ये जो अनियमितपणा, स्थळाची अदलाबदल, तसेच दर्जाहीन कामे, प्रभाग क्र. 4 ची कामे प्रभाग क्र. 18 मध्ये केल्याबाबत संबंधित कन्स्ट्रक्शन, अभियंता नगर परिषद, बीड व मुख्याधिकारी साहेब, न.प. बीड यांची तात्काळ चौकशी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. सदर सर्वच कामांची व संबंधित कॉन्ट्रक्टरची चौकशी करून कार्यवाही करून संबंधित अधिकारी यांचीही चौकशी करावी. तसेच सदरील कन्स्ट्रक्शन कंपनीवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर केलेल्या कार्यवाहीचा व चौकशी बाबतचे सर्व पत्रव्यवहाराची एक प्रत आम्हाला देऊन कळविण्यात यावे, निवेदनाद्वारे.सदरील कामाची चौकशी न केल्यास दिनांक 26/01/2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड समोर उपोषणास बसण्याचा इशारा रिपाईचे युवा नेते अक्षय कोकाटे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment