परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहरातील कोष्टी समाज बांधवांच्या वतीने श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण सोहळा गुरूवार दि.18 जानेवारीपासून सुरू असून या कार्यक्रमाची आज बाल कीर्तनकार ह भ प गौरी हरेगावकर यांच्या काल्याचे किर्तनाने आज गुरुवार दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 11 वाजता श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे. या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
परळीतील गुरूकृपानगर येथील श्री हनुमान मंदिर येथे असलेल्या श्री चौंडेश्वरी देवी देवांग पुराण पारायण सोहळ्याचे गेल्या सात दिवसापासून सुरू आहे. या कार्यक्रमात सकाळी 7 ते 10 या वेळेत श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराणाचे पारायण करण्यात आले होते. पारायणप्रमुख सौ.सोनाली हरेगावकर आहेत. दरम्यान उद्या सकाळी सहा वाजता होम हवन होणार आहे. अकरा वाजता बाल कीर्तनकार ह भ प गौरी हरेगावकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. नंतर श्री चौंडेश्वरी देवीची ढोल ताशांच्या गजरात दिंडी पालखी मिरवणूक निघणार आहे. गुरूवारपासून सुरू झालेल्या या सर्व धार्मिक कार्यक्रमास शहरातील महिला-पुरूष मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरशैव कोष्टी समाजातील महिला, पुरूष परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment