बीड जिल्ह्यातील ९ बाजार समित्यांच्या १६२ संचालक पदांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कडा बाजार समिती बिनविरोध झाली. त्यामुळे आता ८ बाजार समित्यांची निवडणूक येत्या २८ व ३० एप्रिलला होत आहे. यासाठी २२ हजार ५६२ मतदार बाजार समित्यांचे कारभारी निवडणार आहेत. त्यामुळे कोण कुठं बाजी मारणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
परळीत मुंडे बहीण भावांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर बीडमध्ये क्षीरसागर काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागलीय. यामध्ये सर्वपक्षीयांकडून जयदत्त क्षीरसागर यांनी चितपट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर गेवराईमध्ये राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित आणि भाजपचे आमदार लक्ष्मण पवार, शिवसेना नेते बदामराव पंडित यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. माजलगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
No comments:
Post a Comment