Wednesday, April 19, 2023

शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचा छापा नऊ जुगारी पकडत तीन लाखाचा मुद्देमाल.


गेवराई (प्रतिनिधी) — गेवराई तालुक्यातील निपाणी रोड गडी फाटा येथे शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी दुपारी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा मारून केलेल्या कारवाईत नऊ जुगारी पकडत तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मंगळवार दि.18 एप्रिल रोजी दुपारी 16.15 वाजताच्या दरम्यान निपाणी रोड गढी फाटा तालुका गेवराई जि. बीड, येथे प्रदीप शहादेव ढाकणे यांच्या मालकीचे शेतात जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारला असता नऊ इसमांना जागीच पकडण्यात आले त्यांच्याकडून 21 हजार नगदी रक्कम तसेच 9 मोबाईल व जुगाराचे साहित्य 5 मोटरसायकल असे एकूण 3 लाख7 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच मिळून आलेले आरोपी रामप्रसाद वैजनाथ बोरुडे रा. भाटसांगवी ता.जि. बीड , विठ्ठल जीवन चौधार रा. मिरकाळा ता. गेवराई जि.बीड,लक्ष्मण आनंदराव गाडे ,रा.औरंगपूर ता. गेवराई जि. बीड, राम प्रभू अंकुश घोडके राहणार लोळदगाव ता.जि.बीड , विठ्ठल भगवान उबाळे रा. कांबी ता. गेवराई जि. बीड, किसन विश्वनाथ बोरुडे राहणार भाटसांगवी ता. गेवराई जि बीड, धाऊसाहेब झापा राठोड रा. पाचेगाव ता. गेवराई जि. बीड, सिद्धेश्वर रामभाऊ लोणकर रा. निपाणी जवळका ता. गेवराई जि. बीड प्रदीप शहादेव ढाकणे (क्लबच्या जागेचा,क्लबचा मालक) रा. वडगाव ता गेवराई जिबीड असे जागीच जुगार खेळताना मिळून आलेले 09 आरोपी, विरुद्ध कलम 12 (अ )महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये गेवराई पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब,अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख सपोनी विलास हजारे, तसेच पथकातील कर्मचारी पोलीस शिपाई सचिन काळे, शिवाजी डीसले, विनायक कडू, यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment