Saturday, April 15, 2023

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना महिलांनी कार्यालयातच कोंडले आक्रमक महिलांपुढे सगळेच कर्मचारी हतबल.

केज (प्रतिनिधी): गेल्या 4 दिवसांपासून गावात लाईट नाही. त्यामुळं मुबलक पाणी असताना देखील पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने तांबवा गावातील महिला संतापल्या. तसेच संतापाच्या भरात त्यांनी चक्क महावितरण महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडले आणि हातातील हंडे एकमेकांवर आदळून संताप व्यक्त केला.
बीडच्या केज तालुक्यातील तांबवा येथील महिला मागील तीन दिवसांपासून पाण्यासाठी भटकंती करत आहेत. मुबलक पाणी असताना देखील वेळेवर लाईट नसल्याने पाणी मिळत नाही. लाईट बिल वेळेवर भरून देखील लाईट नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी गावातील महावितरणच्या कार्यालयावर जाऊन संताप व्यक्त केला.

विशेष म्हणजे येथील कर्मचाऱ्याला काही काळ कार्यालयातचं कोंडले होते. दरम्यान यावेळी महिलां नी भांडे आपटून महावितरणच्या ढिसाळ कारभारा विरोधात संताप व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment