Saturday, April 15, 2023

आष्टी तालुक्यास वादळी वाऱ्यासह गारपीठी चा तडाखा. फळबागांचे मोठे नुकसान.


आष्टी (प्रतिनिधी) - आष्टी तालुक्यास आज सायंकाळी अवकाळी पावसासह गारपीठीचा जोरावर तडाखा बसला. मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने शेतीपिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. 

आष्टी तालुक्यात आज अनेक ठिकाणी जोरावर पाऊस झाला. तर काही गावांत वादळी वाऱ्यासह गारपीठ झाली. यामुळे शेतातील कांदा, मका पिकांसह डाळिंब, संत्रा, शेवगा या फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिसरातील पाहणी करून त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकरी पोपट शिंदे, राजु रामगुडे, भाऊसाहेब आंधळे,राजु शिरसाठ, रामराव जाधव यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment