Saturday, April 15, 2023

राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा.घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्यास दिली मान्यता.


मुबंई (प्रतिनीधी ) : राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यानंतर आता राष्ट्रवादीसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी आपल्या घड्याळ चिन्हावर लढण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.

निवडणूक आयोगाने पक्षाच्या विनंतीनुसार हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर कर्नाटक निवडणूक कोणत्या चिन्हावर लढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाला दिलासा दिला आहे.

मात्र हा निर्णय केवळ कर्नाटक निवडणुकीपुरताच मर्यादित आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचा कर्नाटक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष आर. हरी म्हणाले, राष्ट्रवादी कर्नाटकात ४६ जागांवर उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी कर्नाटक स्वबळावर लढणार आहे. भाजपचा विद्यमान आमदार आमच्या पक्षात आल्यानेपक्षाची ताकद वाढणार आह.
आता आम्हाला घडयाळ चिन्हावर निवडणूक लढता येणार आहे तसेच निवडणूक प्रचारासाठी शरद पवार यांच्या पाच ते सहा सभा आयोजित करण्याचा विचार सुरू आहे.

No comments:

Post a Comment