Monday, January 18, 2021

काकांच्या बाणाने पुतण्या घायाळ. बहुतांश ग्रामपंचायतवर मा.आ.जयदत्त क्षीरसागर यांचे वर्चस्व !


facebook sharing button
twitter sharing buttonबीड –(प्रतिनीधी)  विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सर्वात मोठ्या म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत काका जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्या आ संदिप क्षीरसागर यांना चांगलीच धोबीपछाड दिली आहे .बीड आणि शिरूर तालुक्यातील 35 पैकी 21 ग्रामपंचायतवर काकांनी वर्चस्व मिळवले असून पुतण्याला अवघ्या वर्षभरातच धूळ चारली आहे .

बीड विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतच्या झालेल्या निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी निवडणुकीचे मैदान जिंकले. शिवसेनेने बीड विधानसभा मतदारसंघात अभूतपूर्व मुसंडी मारली. ग्रामिण भागात शिवसेनेचे आणि जयदत्त क्षीरसागरांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. २९ ग्रामपंचायतीपैकी २१ ग्रामपंचायतीवर भगवा डौलाने फडकला.

निडणुकीपूर्वीच बीड मतदारसंघातील ५ ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर बीड मतदारसंघात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचे पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध झाले आहे. तसेच शिरूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ४ ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. यामध्ये रायमोहा, टाकळवाडी, व्हरकटवाडी, भानकवाडी यांचा समावेश आहे.

तसेच बीड मतदारसंघात मौज, ब्रम्हगाव, मौजवाडी, मैंदा पोखरी, तिप्पटवाडी, काटवटवाडी, कारळवाडी, निर्मळवाडी, कर्जणी, कोळवाडी, गुंधा, जिरेवाडी, पिंपळगाव घाट, वासनवाडी, वंजारवाडी, गुंदावाडी, वायभटवाडी, बाळसापूर, बेलखंडी पाटोदा, वरवटी, आहेरधानोरा, मानेवाडी, भंडारवाडी या २१ ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे.

No comments:

Post a Comment