Monday, January 11, 2021

नागापुर खुर्द च्या सरपंचांनी ठोकला शिवसेनेला रामराम, राष्ट्रवादीत प्रवेश.


आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत इन्कमिंग. 

बीड (प्रतिनिधी)-नागापुर खुर्द येथील शिवसेनेचे सरपंच मसुराम लक्ष्मण साळुंके यांनी निष्क्रीय पदाधिकार्‍यांमुळे शिवसेनेला रामराम ठोकत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ग्रामीण भागात मोठी इन्कमिंग होत आहे. 

बीड तालुक्यातील बहिरवाडी जिल्हा परिषद गटातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या नागापुर खुर्द येथील ग्रामपंचायतवर शिवसेनेचे वर्चस्व होते. याच भागात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहत असले तरी अनेक शिवसैनिक शिवसेनेला सोडचिठ्ठी देत आहेत. नागापुर खुर्द येथील सरपंच मसुराम लक्ष्मण साळुंके यांच्यासह इतरांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला. यावेळी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, माजी पं.स.सभापती विलासभाऊ आमटे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष भाऊसाहेब डावकर, दिलावर पठाण, अशोक कातखडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. 

No comments:

Post a Comment