Saturday, January 9, 2021

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनीच औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा' शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी.

चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले, औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीवरुन उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर आनंद झाला. येत्या 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या जयंती दिवशी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे ही विनंती, असे शिवसेना नेते चंदक्रांत खैरे म्हणाले. राष्ट्रवादीचा याला विरोध नाहीच. कॉंग्रेसही विरोध करणार नाही. या मुद्द्यावरुन आघाडीमध्ये काहीही मतभेद होणार नाहीत. एमआयएमच्या विरोधाला आम्ही घाबरत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात यावे, यासाठी 4 स्मरण पत्र लिहिले आहे. त्यांची उत्तर देखील आली आहेत, असा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे...
सीएमओ टि्वटर हँडलवरून संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला असे विचारल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्याच्यात नवीन काय केले मी…जे वर्षानुवर्ष बोलत आलो आहे तेच केले आहे आणि तेच स्वीकारणार.' यावेळी त्यांना काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या नाराजीबद्दलही विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, 'औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे त्याच्यात औरंगजेब बसत नाही.'

चंद्रकांत खैरेंचा काँग्रेसला इशारा...
काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेस नेत्यांना एकप्रकारे इशारा दिला होता. 'बाळासाहेब थोरात नामांतरावर सहजच बोलले असतील. मी काँग्रेसच्या काही नेत्यांना विचारले, तुम्ही असे कसे बोलले? संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करा, आता तुमच्या घरावर दगडफेक होईल. कशाला विरोध करताय? तर असेच विरोध करतो असे काँग्रेस नेते म्हणाले. आता असेच बोलले म्हणजे त्यांना मुस्लीम मतांची अपेक्षा आहे. पण मला अनेक मुस्लीम लोकांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, असे सांगितले

No comments:

Post a Comment