* ९ फेब्रुवारी पासून पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार.
बीड (प्रतिनिधी) शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागांवर इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा ९ फेब्रुवरी पासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. तेव्हा पालकांनी जागृत पणे प्रवेश प्रक्रिया समजून घेऊन आपल्या पाल्याचे अर्ज दी.९ फेब्रुवारी पासून ऑनलाईन पद्धतीने दाखल करावेत असे आवाहन शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये शैक्षणीक वर्ष २०२१-२२ या वर्षाकरीता बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत गोरगरिब व गरजु विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची तरतुद केलेली आहे. या कायद्यानुसार खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा (अल्पसंख्याक शाळा वगळून) एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागावर आर्थिक दुर्बल व वंचीत घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे . दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ पासुन या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी २१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी पर्यंत आरटीई प्रवेशपात्र सन २०२०-२१ च्या Auto Forward केलेल्या शाळांचे आणि नविन शाळांची नोंदणी केलेल्या शाळांचे गटशिक्षाधिकारी यांनी Verification करण्याची प्रक्रिया करण्यात येईल .
समजतील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील गोर - गरीब विद्यार्थ्यांना श्रीमंताच्या मुलांच्या बरोबरीने चांगले शिक्षण मिळावे आणि शिक्षणातील विषमता दूर व्हावी यासाठी आपण मागील सात वर्षा पासून सातत्याने प्रयत्न करत आहोत. मात्र या योजनेत काही अपात्र पालक खोटे कागदपत्र दाखल करत आपल्या पाल्याचे मोफत प्रवेश करून या योजनेत मोठ्या प्रमाणात गैर प्रकार करत आहेत. असे प्रवेश करणाऱ्या पालकांना शिक्षण विभागाने आळा घालत कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. जेणे करून गोर - गरिबांच्या प्रवेशावर हे लोक डल्ला मारणार नाहीत. तसेच या प्रक्रिये अंतर्गत इंग्रजी शाळेत मोफत प्रवेशाचा लाभ घेण्यासाठी पालकांनी आपण राहत असलेल्या भागातील किंवा परिसरातील शाळांची निवड करत ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावेत. ज्या पालकांना आरटीई अंतर्गत आपल्या पाल्यांचे अर्ज दाखल करण्यास मार्गदर्शन अथवा समस्या असल्यास पालकांनी अधिक माहितीसाठी ८१४९५ ९२००५ या क्रमांकार संपर्क साधावा असे मनोज जाधव यांनी म्हंटले आहे .
*आरटीई प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्र.*
१)आरटीई प्रवेशपात्र सन २०२०-२१ च्या Auto Forward केलेल्या शाळांचे आणि नविन शाळांची नोंदणी केलेल्या शाळांचे BEO यांनी Verification करणे . दिनांक - २१/०१/२०२१ ते ८/०२/२०२१
२)पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे. दिनांक - ०९/०२/२०२१ ते २६/०२/२०२१
३)सोडत ( Lottery ) काढणे. दिनांक - ०५/०३/२०२१ ते ०६/०३/२०२१
४)लॉटरीद्वारा प्रवेश मिळालेल्या निवड यादीतील ( Selection List ) पालकांनी विहीत मुदतीत BEO कडे जावून कागदपत्रांची पडताळणी करणे आणि शाळेत जावून प्रवेश निश्चित करणे .दिनांक - ०९/०३/२०२१ ते २६/०३/२०२१
५)प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे . टप्पा - १
दिनांक - २७/०३/२०२१ ते ०६/०४/२०२१
६)प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे . टप्पा - २
दिनांक - १२/०४/२०२१ ते १९/०४/२०२१
७)प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे . टप्पा - ३
दिनांक - २६/०४/२०२१ ते ०३/०५/२०२१
८)प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे . टप्पा - ३
दिनांक - १०/०५/२०२१ ते १५/०५/२०२१
*प्रवेशासाठी खालील विद्यार्थी पात्र ठरू शकतात*
१ ) ज्या बालकांचे वय ५ वर्ष ११ महिने ते ७ वर्षे २ महिने आहे . २ ) खुल्या प्रवर्गातील ज्या पालकांचे वार्षीक उत्तपन्न १ लाखापेक्षा कमी आहे . ३ ) एसी / एसटी प्रवर्गातील विद्यार्थी . ४ ) दिव्यांग बालके ,अनाथ बालके , विधवा महिलांची बालके , घटस्फोटित महिलांचे बालके वरील सर्व या योजनेसाठी अर्ज करू शकतात .
*प्रवेशप्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे*
*रहिवासी प्रमाणपत्र , आधारकार्ड , मतदानकार्ड , वीजबिल , टेलिफोन बिल , घरपट्टी , वाहन परवाना वरीलपैकी कोणतेही ओळखपत्र नसल्यास आणि भाड्याने राहत असल्यास नोंदणीकृत करारनामा यापैकी कोणतेही एक .
*जातीचे प्रमाणपत्र ( वडिलांचे ) : तहसीलदार , उपजिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र .
*कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला : तहसीलदार , नायब तहसीलदार दर्जापेक्षा कमी नसलेल्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
*जन्माचा दाखला : ग्रामपंचायत , नगरपरिषद यांचा दाखला , एनएम रजिस्टरमधील दाखला , अंगणवाडी , बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला , आई , वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञपत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन .
*घटस्फोटित महिला : न्यायालयाचा निर्णय प्रत , घटस्फोटित महिलेचा / बालकांचा आईच्या रहिवासाचा पुरावा , बालक वंचित गटातील असल्यास बालकाची किंवा त्याच्या वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला .
न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला : घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा , घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा / बालकाचा आईचा रहिवासी पुरावा . बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांच्या जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला .
*विधवा महिला : पतीचे मृत्यू प्रमाणपत्र ,
विधवा महिलेचा , बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा . बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला .
* अनाथ बालके : अनाथ बालकाच्या बाबतीत अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरली जातील . जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र ग्राह्य धरले जाईल .
*दिव्यांग बालक: जर बालक दिव्यांग असेल तर जिल्हा शल्यचिकित्सक , वैद्यकीय अधीक्षक , अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र .
Attachments area

No comments:
Post a Comment