कळंब (प्रतिनिधी परभणी येथील बलात्कार प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, एवढेच नाही तर या प्रकरणाचा तपास करणार्या यंत्रणेला मी कळंब येथेच घटनेच्या दिवशी होतो हे सिद्ध करणारे सीसीटीव्ही फुटेज दिलेले आहे. चौकशी अधिकार्यांना आवश्यक असणारे सहकार्य केल्यानंतर चौकशी संपवून त्यांनी मला सोडून दिलेले आहे. केवळ दहा लाख रूपये स्वीकारतांना चेअरमन अशोक जैन यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्या प्रकरणाचा बदला घेण्याच्या दृष्टीकोनातून मला फसवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचे आनंद बलाई, उद्योग कळंब यांनी सांगितले.
काही वर्तमानपत्रात आनंद बलाई यांच्यासह दोन जणांवर परभणी येथे बलात्कार झाल्याचा गुन्हा दाखल झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आनंद बलाई यांनी दुरध्वनीद्वारे झाल्या प्रकरणाचा एकुण खुलासा केला आहे. केवळ बदला घ्यायचा आणि मला फसवायचे हाच या मागे त्यांचा उद्देश असल्याचे आनंद बलाई यांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशी अधिकार्यांनी आपल्याला अनेक प्रश्न विचारले. तपासात माझा जबाब नोंदवला असून घटनेच्या दिवशी मी कळंब येथेच होतो असे सांगून त्यांना 50 पेक्षा अधिकचे त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज दिले आहेत. चौकशीनंतर मला त्यांनी सोडून दिले असून गरज पडल्यास पुन्हा मी सहकार्य करेल असे पोलिसांना सांगितल्याचेही आनंद बलाई म्हणाले. मला खोट्या प्रकरणात फसवायचा प्रकार केला जात असून मी निर्दोष आहे या प्रकरणाचा बोलविता धनी कोण हे लवकरच आपण स्पष्ट करूत असा इशाराही आनंद बलाई यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment