Wednesday, December 16, 2020

महाराष्ट्र राज्यातील पारंपरिक विटभट्टया केंद्रीय पर्यावरण विभागाच्या नियमांचे पालन करत नसल्यामुळे बंद होण्याच्या शक्यता.


भारतातील पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या संघटनानी न्यायालयात पारंपरिक विटभट्टयामध्ये कच्चा विटा भाजण्यासाठी रासायनिक  पदार्थाचा सरास वापर  केला जातो तसेच त्यापासून निघणाऱ्या धुरापासून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला हानी पोहचत  आसल्याचे पुरावे न्यायालया समोर त्यांनी सादर केले होते.पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या संघटनानी  दिलेल्या पुराव्यांची सत्यता तपासून न्यायालयाने केंद्राय पर्यावरण विभागास कच्चा विटा भाजण्यासाठी होणाऱ्या प्रदूषणावर उपाय योजना करण्यासाठी नियम बनवण्याचे  आदेश दिले होते.न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार केंद्रीय पर्यावरण विभागाने पारंपरिक विटभट्टयान बंदी घालून फक्त फिक्स चिमणी वीटभट्टीयाना परवानगी देण्यात यावी आशा प्रकारचे केंद्रीय पर्यावरण विभागाने १९९६ साली राजपत्र प्रकाशित केले त्या प्रकाशित केलेल्या राजपत्रानुसार महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई या कार्यालयाने दि.१८ फेब्रुवारी १९९७ साली महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाअधिकारी कार्यालयाना जो कुणी विटभट्टी व्यवसायीक फिक्स चिमणी वीटभट्टी बांधेल त्या वीटभट्टी धारकाने कच्चा विटा चिमणीच्या विटभट्टीत भाजाव्यात इतर पारंपरिक विटभट्टीयाना परवानगी देण्यात येऊ नये आसे परिपत्रक पाठवले आसताना सुध्दा जिल्हाअधिकारी कार्यालयानी ज्या वीटभट्टी व्यावसायिकानी माती उथखनन व वाहातूकीची परवानगी मागीतली त्या वीटभट्टी व्यवसायीकानी फिक्स चिमणी विटभट्टी बांधली आहे की नाही याची कोणत्याही प्रकारे खात्री न करता केंद्रीय पर्यावरण विभागाच्या नियमाना धाब्यावर बसवून पारंपरिक वीटभट्टी व्यवसायीकाना परवानगी १९९६ ते २०१६ पर्यंत लगबग विस वर्ष नियमात नसताना दिली गेली. भारतातील इतर कोणत्याही राज्यात पारंपरिक वीटभट्टीसाठी परवानगी नसताना महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील राज्य कार्यालयाने दि २४ आँगस्ट २०१६ रोजी पत्र क्र एसईएसी-२०१५/प्र.क्र.१८४/ता.क.२ महाराष्ट्र राज्यातील पारंपरिक वीटभट्टया (स्थान निश्चिती व उद्योग उभारणी) नियम २०१६ तयार करण्यात आले त्यातील दिलेल्या नियमानुसार १)पारंपरिक वीटभट्टीचे ठिकाणी हे एक हजार लोकवस्तीच्या गावापासून २०० मिटर अंतरावर असावे.
२) पारंपरिक वीटभट्टीचे ठिकाण हे राज्य मार्ग व राष्ट्रीय मार्ग यांच्या पासून २०० मिटर अंतरावर असावे.
३)पारंपरिक वीटभट्टीत कच्च्या विटा भाजण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक पदार्थाचा वापर करु नये हळू हळूहळू कोळशाच्या जागी शेतातील टाकावू पदार्थांचा वापर करावा.
४) पारंपरिक वीटभट्टीत कच्च्या विटा ९-४-३ इंच आकाराच्या एकाच वेळी ५०,००० विटा (छोटी विट) भाजण्यासाठी एकाच वेळी लावाव्यात.
५) पारंपरिक वीटभट्टीत ९-४-६ आकाराच्या कच्च्या ठोकळा विटा  २५,००० हजार भाजण्यासाठी लावाव्यात त्यापेक्षा जास्त मोठया कच्च्या वीटा भाजण्यासाठी लावावयाच्या आसतील तर केंद्रीय पर्यावरण विभागाच्या नियमानुसार झिकझाक चिमणी वीटभट्टी व्यवसायीकास बांधने बंधनकारक करण्यात आलेले आहे आसे नियम वीटभट्टीसाठी केंद्रीय पर्यावरण विभागाने केलेले आसताना वरील सर्व नियमाना वीटभट्टी व्यवसायीक धाब्यावर बसवून वीटभट्टी व्यवसाय गावाच्या बाजूला, राज्य मार्ग ,राष्ट्रीय मार्गच्या बाजूला व कच्चा विटा भाजण्यासाठी दोन ते तिन लाख विटा ऐकाच वेळी लावत आहेत पर्यावरण विभागाच्या नियमात बसणारे नाही हा संपूर्ण अहवाल काही पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या  संघटनांनी केंद्रीय पर्यावरण विभागास सादर केल्याचे समजते त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील पारंपरिक वीटभट्टीयासाठी मप्रनि मंडळाने तयार केलेले महाराष्ट्र शासन राजपत्र रद्द करण्याचे आदेश केंद्रीय पर्यावरण विभागाकडून कोणत्याही दिवशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment