Sunday, December 13, 2020

अ.भा.वारकरी मंडळ शाखा परळीच्या वतिने खा.शरद पवार यांचा वाढदिवस व स्व.गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी.


*101 तोफांची सलामी; विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
अ.भा.वारकरी मंडळाच्या वतिने देशाचे माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तसेच लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त त्यांना प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
शेतकर्‍यांचे कैवारी, कृषी प्रधान भारत  देशाचे खंबीर नेतृत्व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा जानताराजा  शरदचंद्र पवार साहेब यांचा 80  वा  वाढदिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला तसेच  लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त साहेबांना अ.भा.वारकरी मंडळ मराठवाडा विभागीय अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा सेवासंघाचे संगम येथील अध्यक्ष  राजाभाऊ गिराम आण्णा, यशवंत चव्हाण, संगित विद्यालयाचे शिक्षक  सुरेश मोगरे सर यांच्यासह श्री उत्तरेश्वर गुरू माऊली संगित विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी  बोलतांना गिराम यांनी सांगितले की, या देशातील दोन दीग्गज नेत्यांची  आठवणी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी शरदचंद्रजी पवार  साहेब यांच्या वाढदिवसानिमित  राञी 12.01 वाजता 101 तोफांची सलामी दिली,तसेच माऊली संगित विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला तर स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब चौकात साहेबांना पुष्पहार अर्पण करून विनम्र  अभिवादन करण्यात आले.

No comments:

Post a Comment