* विभाग प्रमुखासह चार डॉक्टर होम क्वॉरंटाईन वाचनालय बंद .
अंबाजोगाई;- (प्रतिनीधी )अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मेडिसिन विभागात आयसीयुमध्ये कार्यरत असणार्या पंचेविस वर्षीय महिला डॉक्टर दि २० जुलै रोजी कोरोना पॉजिटिव आढळून आल्याने मेडिसिन विभाग प्रमुख यांच्या सह चार डॉक्टर होम क्वॉरंटाईन झाले असून येथील वाचनालय बंद करण्यात आले आहे.
सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील आयसीयुमध्ये मेडिसिन विभागात कार्यरत असणार्या पंचेविस वर्षीय महिला डॉक्टर यांना कोरोनाचे लक्षण जाणवत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. स्वा रा ती प्रशासनाने त्यांना पुढील उपचारासाठी कोरोना वार्डमध्ये दाखल केले. सदरील डॉक्टर ह्या आयसीयुमधील आपले काम संपल्यानंतर दररोज प्रमाणे येथील वाचनालयात जात असल्याने तेथे तात्काळ फवारणी करून वाचनालय बंद केले. स्वारातीमध्ये त्यांनी आपल्या वरिष्ठ डॉक्टरांच्या समवेत स्वत:ला उपचारासाठी दाखल करून घेतले. इतर रुग्णांची तपासणी करण्यासाठी राउंडमध्ये सहभागी झाल्याने त्यांच्या समपर्कमध्ये आलेले मेडिसिनचे विभाग प्रमुख यांच्यासह चार जण डॉक्टर होम क्वॉरंटाईन झाले असून स्वाराती प्रशासन अत्यंत संवेदनशील झाले असून येथील डॉक्टर नर्स कर्मचारी यांना पुढे कोरोनाची लागण होऊ नये म्हणून खबरदारी घेऊन पुढील उपाय योजना आखत असून रुग्णाच्या नातेवाईक यानी स्वाराती प्रशासनास सहकार्य करून डॉक्टरनी सांगितलेल्या उपाय योजनेचे पालन करावे असे आव्हान केले आहे.
No comments:
Post a Comment