परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः- परळी शहरातील नेहरु चौक (तळ) विभागातील आराम टी हाऊसचे मालक विठ्ठलराव (बापु) भोयटे यांचे आज रविवार दि.19 जुलै रोजी दुपारी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 62 वर्षे होते. नगरसेवक विजय भोयटे यांचे ते वडील होते.
विठ्ठलराव (बापु) भोयटे यांचे आज रविवार रोजी दुपारी 3.00 वाजण्याच्या दरम्यान श्री संत नरहरी महाराज मंदीर परिसरातील रहात्या घरी निधन झाले. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर येथील सार्वजनिक स्मशानभुमीत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टसींग पाळुन अंत्यसंस्कार करण्यात आले. कै.विठ्ठलराव (बापु) भोयटे यांच्या पश्चात नगरसेवक विजय भोयटे यांच्यासह तीन मुले, एक मुलगी, चार भाऊ, दोन बहिणी, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. भोयटे कुटुंबियांच्या दुःखात दै. कांतीकारी साथी परिवार व मगर परिवार सहभागी आहे.
राखसावडण्याचा निधी ः- विठ्ठलराव (बापु) भोयटे यांचा राखसावडण्याचा विधी मंळवार दि.21 जुलै रोजी सकाळी 7.00 वाजता होणार आहे.
No comments:
Post a Comment